QUOTES ON #नजरानजर

#नजरानजर quotes

Trending | Latest
8 APR 2022 AT 8:23

मनात भेद दडले होते खूप काही
पण शब्दातून कधी रिक्त झाले नाही...
समोर येवूनही खूपदा
नजरानजर कधी घडली नाही...
दुरावा हा मनाचा मनातच विरघळला तरी
ओलाव्याची ती झीरपण नजरेला कळलीच नाही....

-


8 APR 2022 AT 11:52

नजरानजर तू
ती नेहमीच टाळतोस
सांग रे सख्या सजना
का असा छळतोस ?

-


8 APR 2022 AT 10:07

क्षणाची नजरानजर
करी बेजार
उत्तरे नसलेली
प्रश्न हजार
नवाच रोग
करी हजर
लाही लाही जीवाची
जणू जहर
कुठली ही व्यथा
कसला हा कहर
काय करून गेली
क्षणाची नजरानजर
श्रीपद्मा— % &

-


8 APR 2022 AT 9:31

त्याची अन् माझी नजरानजर
हृदयातून व्हावी थेट
ना ती पाऊलवाटे यावी
ना पाऊलवाटे जावी ..

-



दोन मनांची नजरानजर,
डोळ्यांआधी घडली...
भावनांची पापणी,
काळजांत रुतून बसली...

नजर भावनांची हळूहळू,
प्रेमाकडे वळली...
मिठीतल्या प्रेम रंगाने,
नजर खाली झुकली...

लाज येता चेहऱ्यावर,
नजरेला नजर नाही भिडली...
स्पर्शापुढे तुझ्या.. माझी,
नजर अपुरी पडली...

कधी व्यक्त, कधी स्थिर,
कधी अबोल राहिली...
दोन मनांची नजरानजर,
नयनांनी कैद केली...

-


22 JAN 2021 AT 13:17

केसांची शोभा वाढावी
म्हणून माळला होता गजरा
मला कस कळणार सांग..!!
माझ्यावरच साऱ्यांच्या नजरा..!!!

-


13 APR 2022 AT 14:20

व्यक्त करायचं होत मनातलं प्रेम, माझ्या मनातच राहिलं😒
कारण आज त्याने मला शिटी वाजवताना पाहिलं 😬🤭

काल ही डोळा मारायचा इरादा नव्हता माझा..
पण नजरानजर झाली आमची अन्
डाव्या डोळ्याच्या पापण्या बिचकल्या बघताच त्याला 😉🤭
💗— % &बताने थे जज़्बात, पर बात मेरे दिल में ही रह गई
क्योंकि उनसे आज मैं सिटी मारते हुए पकड़ी गई 😬🤭

कल भी आँख मारने का इरादा न था मेरा मगर
देखते ही उन्हें मेरी बाएं आँख की पलके झपक गई 😉😜— % &

-


8 APR 2022 AT 8:03

काही क्षणापुरते गुंतवले होते त्याने डोळ्यांमधे डोळे..
बोलण्याने बोलणे वाढेल म्हणून त्याने बोलणे टाळले होते..!

-


8 APR 2022 AT 15:51

उमललेल्या फुलाची झाली
फुलपाखरा बरोबर नजरानजर

उडतं आला तो पंख फडफडत
अलगद उतरला पाकळ्यांवर

दोघेही मग असे रंगात रंगले
मग हळुचं मधुकण टिपले गेले

निसर्गातले हे असे प्रेम निराळे
आज अचानक बघायला मिळाले

-



नजरानजर होताच ती हळूच लाजली....
खाली मान करून गलातचं गोड हसली....

झुकलेली नजर खूप काही बोलत होती....
माझ्यावरच्या प्रेमाची कबुली देत होती....

डोळ्यांनीच आज खूप काही बोलली....
तिच्या मनातील भावना मलाही कळली....

शांत,सुंदर,प्रेमळ काहीच न बोलणारी....
आपल प्रेम आतल्या मनातच लपवणारी....

भेटली आणि झाली पहिलीच नजरानजर....
मनात माझ्या करून गेली आयुष्भराच घर....
- स्नेहा....

-