श्रावण मास पंचमी
सण नागपंचमीचा
नागदेवता पूजुन
जपू ठेवा संस्कृतीचा
धूप दीप बेलपत्र
नैवेद्य दूध निष्ठांन्नाचा
करीतो अर्पण देवा
दे आशिष रक्षणाचा
मित्र तू शेतकऱ्यांचा
दे दान निर्भयाचा
झुला श्रावणाचा
सणं नागपंचमीचा
नागपंचमीच्या सर्वांना
हार्दिक शुभेच्छा... 💐💐🙏
~Madhuri P. Warwatkar... ✍️
-
🍀 हे जीवन सुंदर आहे ....
❤Reading lover..
🎵Music lover..
Birth da... read more
काळेभोर आकाश
थेंबावर थेंब सरीवर सरी
किती येशील रे बाबा
थोडा दम घे तरी
एक दिवस दोन दिवस
पुरे झाली तुझी वारी
व्याकुळ भुकेने पक्षी
घरट्यात चिव चिव करी
चिंतापूर बळीराजा
जीव अडकून दंडावरी
कसे असतील पीक
काळजी बोचत अंतरी
मन राजा तु तुझा
तुच मारी तुच तारी
वेध तुझ्या मनाचा
कुणी घेतला रे आजवरी
Madhuri P. Warwatkar... ✍️
-
ठाव ना पत्ता
ना सुगावा किणाऱ्याचा
तरी नावेस ह्या जीवनाच्या
ध्यास अविरत चालण्याचा
कुठे घनघोर वादळ
कुठे वारा सोसाट्याचा
बुझल्या साऱ्या दाणा
कसा गाठू घाट तिमीराचा
दाटला अंधार काळाभोर
डोळ्यासमोर प्रलयाचा
तोडण्या तार तार या देहाचे
खेळ हा सारा नियतीचा-
शब्दगंध
मनी दाटून आले घन
नि शब्द ओघळू लागले
शब्दांच्या त्या माळेतून
शब्दगंध ओथंबून आले
प्राशुन शब्दगंध दरवळ
ऋतू बरवा फुलला
बहरले काव्यसुमन वेलीवर
बघता देह हा सुखावला-
हे निसर्ग राजा
तुझे उपकार लई आम्हावरी
ऊन वारा पाऊस देनं तुझीच
किमया तुझी रं न्यारी
हिरवा झाला बघ शेतमळा
येता सरींच्या माळी
अंकुरली इवली रोप
सजल्या कपाशीच्या ओळी
तूच आम्हा शेतकऱ्यांचा दाता
पोट आमचं तुझ्यावरी
फुलू दे शेत पांढऱ्या सोन्यानं
हसव राजाला अमदातरी
~Madhuri P. Warwatkar... ✍️-
*माती*
कुठे काळी कुठे लाल
माती अमृताची साय
भाज्या फळे वनस्पती
घास भरविते माय //१//
माती कुळाले झोपडीच्या
थापून तोल सावरते पाय
बालगोपाळास तिची गोडी
ममत्वाला तिच्या तोड नाय //२//
~Madhuri P. Warwatkar... ✍️-
भक्तीत रंगली l अवघी पंढरी
येता पायी वारी l वाळवंटी ll
पावन स्पर्शाने l धन्य वारकरी
चंद्रभागे तीरी l स्नान करी ll
विठु दर्शनाची l ओढ ती लागली
भक्तांना माऊली l दे दर्शन ll
दुख: मनातले l घे जाणुन आता
दिनांचा तु दाता l झडकरी ll
तुच माय बाप l तुच पठिराखा l
सोबती तु सखा l माऊली तू ll
भक्त सारे तुझे l जात-धर्म नेक l
होऊनिया एक l आले भेटी ll
भेटीस व्याकुळ l ते आसुसलेले l
भक्त भुकेलेले l कैवल्याचे ll
दे आषिश असा l पुसोनिया क्लेश ll
नको मनी द्वेश l गा कानड्या ll
~Madhuri P. Warwatkat... ✍️
-
आठवीता ते क्षण
जिथे हरवून जातं मन
गोड त्या आठवणींचे
सुंदर ते बालपण
आनंदाच्या कल्लोळाने
भिजलेले ते प्रांगण
मखमली क्षणांची झालर
सुंदर ते बालपण
धुंद सुगंधी लाटातुनी
विहारत आनंदघन
चांदण्यांचे मधुबन
सुंदर ते बालपण
मृदगंध दरवळणारा
मृगधारांची शिंपण
अल्लड अवखळ ओढे
सुंदर ते बालपण
~Madhuri P. Warwatkar... ✍️
-
*भक्त पुंडलिक*
भक्त पुंडलिकाची पुण्याई
पुर भक्तांचा हा पंढरी l
भक्तांमंदी भक्त थोर
त्याचा महिमा हा भारी।//ध्रृ//
-
गंध मातीचा दरवळत
ती वाट दुर जाते...
भेटण्या सांजेला
आसुसलेली एकांत
ती वाट दुर जाते...
विसावण्या कुशीत निवांत
ती वाट दुर दुर ताते...
~Madhuri P. Warwatkar... ✍️-