राग नव्हताच तू विचारलेल्या प्रश्नावर
प्रश्न उठला पुन्हा माझ्याच उत्तरावर
मोकळं आकाश वारा ही सुसाट होता
विश्वास हवा होता स्वतःच्या पंखावर
भेटण्यासाठी तुझ्या गावी निघालो मी
तुझ्या गावाच नावच नाही नकाशावर
माणुसकी उरली ना माणसांत आता
कसा भरोसा ठेवावा दुसऱ्या कोणावर
अडकत चाललो तुझ्यात अजून खोल
ताबा राहिला माझा या वेड्या मनावर
जाताना आठवण काहीतरी असावी
एक कथा निघावी माझ्या आयुष्यावर
– स्नेहा....-
https://pratilipi.app.link/DAtJscuBzVb
भारतीय भाषेतील अमर्याद साह... read more
प्रत्येकाजवळ आवडीची एक राणी असावी....
जगाच्या वेगळी दोघांचीही कहाणी असावी....
कोण,कुठली याने काहीच फरक पडत नाही....
जपानी,इराणी किंवा ती अफगाणी असावी....
फिरत असतो तो कामानिमित्त कुठे कुठेही....
जिथे जाईल तिथे मग ठिकठिकाणी असावी....
तिला पटवण्याची कला जमत नाही कोणा....
डोळ्यात प्रेमळ भाव नी गोड वाणी असावी....
तू गरीब असलास म्हणुन काय होईल राजा....
तुझी होणारी बायको मात्र राजघराणी असावी....
नवीन नवीन सगळं छान आणि नंतर गुंता....
म्हणूनच शिकलेली नाही अडाणी असावी....
– स्नेहा....-
आज तुझी अली आठवण बाकी काही नाही....
किती मोठ होतं संभाषण बाकी काही नाही....
अजूनही सुटला नाही तो नात्यांचा गुंता मला....
कधी समजेल का समीकरण बाकी काही नाही....
मीच म्हणते का खूप सुंदर होते क्षण सोबतीचे....
जपले आहेत मी कणकण बाकी काही नाही....
खुश रहा तू मी नसेन तुझ्यासोबत इथूनपुढे....
नसेल बोलणे अन् भणभण बाकी काही नाही....
सगळं घे फक्त एक वस्तू राहूदेत माझ्याकडे....
धनदौलत नाही हे काकण बाकी काही नाही....
जाऊदे सगळं करू नवी सुरुवात जमेल तुला....
कायमच विसर हे भांडण बाकी काही नाही....
– स्नेहा....-
एवढेच हवे तुझा माझ्यावर राग नको....
स्वच्छ नातं त्यावर कोणता डाग नको....
शक्यता आहे पुन्हा भेटण्याची आपण....
फक्त भेटण्याचा वेगळा विभाग नको....
काही चुका माझ्या काही तुझ्या आहेत....
इथून पुढे मात्र कशातच सहभाग नको....
जपाव्या तुझ्या आवडी नी मित्रमैत्रिणी....
पुन्हा माझ्यासाठी कोणता त्याग नको....
त्रास होतो म्हणून विसरू जुन्या गोष्टी....
शांत झोपू दे रात्री नव्याने जाग नको....
स्नेह तुझ्या आयुष्यात कायक रहावा....
डोळ्यात अश्रू देणारी दुःखाची बाग नको....
– स्नेहा....
-
मला एकांत हवा पण दिवसा हवा होता
ती लाजवट तिला अंधारसा हवा होता
कोणाच्या सांगण्यावर विश्वास का ठेवा
गुंता नको आपल्यात आरसा हवा होता
राजकुमार कसा पाहिजे प्रश्न केला मी
तिला स्वप्नात पाहिला तसा हवा होता
मी ही करुन दाखवू शकतो मोका हवा
निरंतर चालू ठेवण्यास वारसा हवा होता
प्रेमाने सगळ्या गोष्टी होतात आशा होती
तिला बरी व्हायला अडुळसा हवा होता
– स्नेहा....-
सांग कसे फेडू मी तुझे उपकार आता....
दिसू लागला आयुष्यास आकार आता....
गुण दोष कसे तराजू सारखे असतात....
कसाही असलो तरीही स्वीकार आता....
वाईट वाटेल म्हणून नको कळलं का....
मनापासून मिळावा तुझा होकार आता....
एक चूक माफ सगळ्यांना असते अन्....
नको करू इतका माझा तिरस्कार आता....
अजून किती थांबू सांग तयार आहे मी....
उघड तुझ्या घराचे नी मनाचे दार आता....
सगळ्यांनी पाट फिरवली हरकत नाही....
तूच आहेस एकमेव माझा आधार आता....
– स्नेहा....-
जगुन बघ कधी आयुष्य माझ्यासारखे....
वागले माझ्याशी आपले परक्यासारखे....
प्रेम शब्दाचा अर्थ दूर गेल्यावर समजला....
जगले आयुष्य सारे एकटी पोरक्यासारखे....
दोन मुखवटे लावून प्रत्येक माणूस येतो....
मला मात्र चेहरे हवे होते आरशासारखे....
माफी मागूनही नाही माफ केले कोणी....
मन दुखावत गेले सारेच सारखे सारखे....
सगळे वाईट असतात असं नसते मुळी....
संकटात काही धावून आले देवासारखे....
विचार येतो मनात निघून जावं दूर कुठे....
भेटेल का पुन्हा प्रेम दुसरे तुझ्यासारखे.....
– स्नेहा....-
वेळ नाही म्हणे सध्या वाढले काम..नको सांगू....
घराबाहेरच होतात सारखे मुक्काम..नको सांगू....
आठवणीत राहत नाही काहीच खरं की खोटं....
रोज खातो महागडे भरपूर बदाम..नको सांगू....
मला त्रास द्यायला काय मजा येते सांग जरा....
कळून चुकलं सगळं करतो मुद्दाम..नको सांगू....
नकोच मला काही तुझ्याकडून यापुढे कळलं....
मीच देते अशा नात्याला पूर्णविराम..नको सांगू....
प्रेम केले म्हणूनच गृहित धरतो प्रत्येक वेळी....
बनवून ठेवले आहेस मला गुलाम..नको सांगू....
जाऊदे सगळं आता एकच ऐकणार का सांग....
नसेल तुला वेळ तर घे जरा विश्राम..नको सांगू....
– स्नेहा....-
हात हाती तिचा मलाच नको होता....
माझ्यामुळे त्रास उगाच नको होता....
माझे दुःख सांगता तिचे डोळे भरले....
हा विषय मी सांगायलाच नको होता....
जो तो फक्त माझ्यावर दया दाखवतो....
मदतीचा हात मात्र असाच नको होता....
डोळ्यांना ही धोका होऊच शकतो....
आरोप नुसता चुकीलाच नको होता....
कशी ओलांडवी बंधने समाजाची....
बंधन नावाचा उंबराच नको होता....
एकमेकांच्या डोळ्यात जग दिसलं....
दोघांच्या मध्ये आरसाच नको होता....
– स्नेहा....
-
गुंतने,अडकणे, प्रेमात पडणे हे असेच होणार....
नंतर मात्र एकट्यानेच रडणे हे असेच होणार....
थांबते ना कोणासाठी कधी चक्र निशिबाचे....
कधी जवळ,कधी लांब जाणे हे असेच होणार....
म्हणतो आपण हळूहळू सवय होते सगळ्याची....
एक गेल्यावर दुसऱ्याने वाट बघणे हे असेच होणार....
हजार जण येतात दुःखावर फुंकर मारायला....
भोगणे वेगळे अन् नुसते सांगणे हे असेच होणार....
कधीतरी समोरासमोर येणं होतंच एकमेकांच्या....
बघून ही समोर त्याला न बघणे हे असेच होणार....
कोणी थांबतो त्याचं क्षणांत अडकून कायमचा....
कोणाचे त्याच्याशिवाय पुढे जाणे हे असेच होणार....
– स्नेहा....
-