QUOTES ON #त्या

#त्या quotes

Trending | Latest
7 FEB 2020 AT 23:51

त्या शेवटच्या क्षणी.......

क्षणभर विश्रांती
त्या शेवटच्या क्षणी
क्षणभंगुर आनंद
त्या शेवटच्या क्षणी

अलबेल मन
त्या शेवटच्या क्षणी
संयमाची घालमेल
त्या शेवटच्या क्षणी

बंधनांची मोकळीक
त्या शेवटच्या क्षणी
संवेदनशील हास्य
त्या शेवटच्या क्षणी

आठवणींशी सलगी
त्या शेवटच्या क्षणी
आणि मग
सापडलेला तो क्षण
त्या शेवटच्या क्षणी. .







-



लहान असो वा मोठी, प्रेम भरभरून करते,
खरंच बहिणीची, मायाच वेगळी असते...!

घर असो वा बाहेर, भावाचीच स्तुती करत असते,
भावाने चिडवले जरी, तरी त्याचीच side घेत असते...
भावाच्या चुकीला नेहमी, आईबाबांपासून लपवत असते,
खरंच बहिणीची मायाच वेगळी असते...!

बाबाने जर, आणले काही खायाला,
भावाशिवाय ती, एक घास ही खात नसते..
भाऊ उपाशी असेल, म्हणून तीही जेवत नसते,
खरंच बहिणीची मायाच वेगळी असते...!

हिला लागले जरी काही, तर सहन करेल म्हणते,
आणि भावाला लागले, की स्वतःच रडत बसते...
पुन्हा असे करायचे नाही हं, म्हणून ओरडत असते,
खरंच बहिणीची मायाच वेगळी असते...!

लहान असेल तर खोडी करते, मोठी असेल तर लाड करते,
जवळ असो वा दूर, प्रेम भरभरून करत असते,
आईचं ही दुसरं रूपच असते,
खरंच बहिणीची मायाच वेगळी असते...!

-


18 SEP 2020 AT 19:10


गत स्मृतींना उजाळा मिळावा !
होतास किती जवळी तू ,
तोच तू , आज परका का भासावा .....

नको इतुके अंतर राखू ,
वेदना होतात ह्या मनाला !
घालू नको शब्दांना बांध तुझ्या ,
पोचू दे ना भावना, कळू दे ना मला ....

भेट तुझी नाही ,
परी शब्दांना तरी भेटव तुझ्या...
आसवांना ह्या थोपटण्या ,
शब्द तुझे कामी येतील माझ्या .....

आरती....✒️



-


22 MAY 2021 AT 17:49

ये कश्ती भी बडी अजीब है
मुसाफिरोन को छोड खुद अकेले चलती है.

-


26 DEC 2019 AT 23:26

माझ्या 'बालपणी 'च्या त्या वळणावर...
एक आजोबा राहत होते। ☝️
माझ्या अल्लड खोड्या मधे
ते जणू स्वतःला पाहत होते।।

चेहर्‍यावर तेज 😎असे कि तरूणाईला वाटे लाज।
कालपर्यंत सोबत होते ,का कुठे हरविले आज?🤔

थरथरणारे जीर्ण हात, अन् सोबत एक काठी।
ते उत्तरांचे पुस्तक📖, अन् माझी प्रश्नांची ❓दाटी।।

आजही उत्तर शोधण्यासाठी त्या काठी कडे पाहते।
रस्ता चुकला आयुष्याचा कि, पुन्हा त्या वळणावर जाते,
त्या वळणावर जाते...।।
✳️✳️❇️✳️✳️

-


28 SEP 2019 AT 23:17


त्या एका क्षणाला

त्या एका क्षणाला भेटलास
जणू सारी स्वप्न जिवंत केली.
नाजुक हळव्या भावनेने
तुझ्याकडेच बघु लागली.

बोललास त्या एका क्षणाला
वाटलं सार काही इथेच थांबव.
वार्‍याचा ही आवाज नको आता
सार काही स्तब्ध व्हावं.

हसलास त्या एका क्षणाला
जणू पाऊस अंगी स्पर्शनारा.
तुझ्यासह जोडीने भिजताना
वारा बेभान वाहणारा.

हसवलं त्या एका क्षणाला
डोळ्यातील पाणीच उडून गेल.
तुझ्या मायेच्या शब्दांनी तर
दुःखही विरुन गेल.

न होता ही माझा च आहे तू
दूर असूनही जवळ आहे तू
ओठी नसला तरी मनी आहे तू
गंध नसलेल्या नात्यातला गुलाब आहे तू
म्हणुनच काटे असूनही हृदयात आहे तु.

-


9 APR 2022 AT 14:37

त्या तीन चांदण्या रोज पाहतात मला,
अन मी हि फक्त त्यांनाच पाहते...
त्यांना पाहता पाहता,
नकळतच मी तुझ्या आठवणीत हरवते..
त्या तीन चांदण्या रोज तुला पाहू शकतात...
मी नाही तुला पाहू शकत...
पण त्यांचं येऊन रोज मला तुझी खबर सांगतात..
कधी ते दिसले नाहीतर,तुझ्या काळजीने मन विचलित होत ..
हो त्याचं चांदण्यात दिसतो रे तुझा चेहरा मला,
अन कळतच नाही कधी,
डोळ्यात साचलेले पाणी,
गालावरून ओघळू लागते...तर कधी गालावार गोड हसू देऊन जात...
त्यांना ही कळतो आपल्यातला हा दुरावा .. म्हणुन तर येतात रोज आपल्या भेटीला ..
तू दूर असून पण ते नेहमी तू जवळ असल्याचं पुरावा देऊन जातात ....

-


30 MAR 2020 AT 10:27

मन उगाच नेते मजला त्या वाटेवर
ज्या वाटेचे उघडते दार तुझ्या हृदयातून
मी लिहिण्या बसतो ओळी तुझ्यावर
तू लाजून हसते, हळूच बघते मोहरुन

-


10 AUG 2019 AT 16:54

तू माझी झाली नाही तर काय झालं,
मी तर तुझाच आहे...
तुझं जे प्रेमाचं गाव आहे,
त्या गावाला माझंच नाव आहे...

-


9 MAR 2021 AT 18:39

दर्पणातही सजतो कधी,कधी कल्पनेतही रुजतो..
कधी फुलतो मंद स्मिताने,तर कधी अलगद लाजतो..
त्या वाटेवरचा मोगरा,का या हृदयास छळतो..

कधी आगतिक ओशाळतो,तर कधी पुसट पाणावतो..
कधी डोलतो वाऱ्यावरी,तर कधी उंचावर शहारतो..
त्या वाटेवरचा मोगरा,का या हृदयास छळतो..












कधी वेधतो जाळ्यात,तर कधी डोळ्यात खुपतो..
कधी रमतो उन्हात,तर कधी सावलीत खिळतो..
त्या वाटेवरचा मोगरा,का या हृदयास छळतो..

कधी वसतो उरात,तर कधी दूर होतो..
विसरली जरी का वाट,तरी आठवणींत असतो..
त्या वाटेवरचा मोगरा,का या हृदयास छळतो..

-