Karthik Hajare   (Karthik hajare)
55 Followers · 20 Following

karthikhajare@gmail.com
Joined 11 June 2019


karthikhajare@gmail.com
Joined 11 June 2019
24 NOV 2023 AT 19:02

Karvate leke yadon ki,
Din gujar rahe hai...
Kal tak they apno me,
Aaj paraye ho gaye hai...

-


19 NOV 2023 AT 14:21

Nami aankhon me kitni bhi aayi,
Fir bhi kinaro se juta Raha...
Koshishein to tamam ki,
Fir bhi sahilo se tuta Raha...

-


15 NOV 2023 AT 0:47

Kitna bhi karlo,
kinaro se Aitbaar...
Yakeen maano,
Tanhai lahro se aage badhi hai...!!!

-


13 NOV 2023 AT 19:48

Kitni bhi sune hum,
kinaro ki dasta...
Vaqt dikha hi deta hai,
Uska lahro se vasta...

-


5 JUN 2022 AT 15:09

आठवणीत तुझ्या सखे,
चिंब चिंब भिजायचं आहे...
आता तरी बरस अभ्रा,
हेच तुझ्याकडे मागायचं आहे...

-


3 JUN 2022 AT 19:13

विसावा मिळेल या आशेने,
खूप दूरवर मी आलो...
वळून बघितले मी जेव्हा,
स्वतःच्याच सावलीला पाहलो...

-


31 MAY 2022 AT 19:15

आठवणीच्या रात्री सखे,
अजूनही अंधार दाटला होता...
मुसुमुसू का होईना,
पण चंद्र आजही एकटाच रडला होता...

-


28 MAY 2022 AT 22:21


काळोख दाटला होता,
तरी चांदण्यांची सोबत होती..
रात्र भिजली असतांनाही,
चंद्राची कमी जाणवत होती...

-


26 MAY 2022 AT 20:31

गाठून अचलाला नभ,
भागवतो तहान वसूंधरेची...
डोळी ओल्या पुसट करुनी,
साद नेहमी आठवणींची...
हा पाऊस मला जगायला मदत करते...

लखलखाट होतो आकाशी,
त्या मिठीची चाहूल उमगते...
बघुनी दारात ओथंबत्या सरी,
डोळ्यांच्या सरींनी पाऊल खिळते...
हा पाऊस मला जगायला मदत करते...

रिमझिम,रिपरिप सुर अलगद,
स्वर हे पावसाचे मनास छळते...
ओल्या आठवणी जरा कोरडल्या,
की पुन्हा पाऊस त्या ओल्या करते...
हा पाऊस मला जगायला मदत करते...

दरवेळचं हे खट्याळ पाऊसगाणं,
नकळत डोळी रडवून जाते...
उजाडताच हसतो इंद्रधनू,
आणि अचलाला नवं रूप देते..
हा पाऊस मला जगायला मदत करते...

-


26 MAY 2022 AT 14:23

खूप काही असते उरी,
तरी चेहरा हा लपवत असते...
सगळंच काही असते बरोबर,
तरी तुटक भास उरत जाते...

वेध हे काळजाचे कसे सुटत जाते,
नकळत आसवांनी पापणीही पाणावते...
कसल्या ह्या यातना काही कळत नाही,
पण माणसांत असूनही जग बदलत जाते...

खूप येतो द्वेष स्वतःचा,
मग अलगद दुःख विरून जाते...
कधी एकांती संध्याकाळी,
परत अस्ताशी खिळून जाते...

अबोल असतात ह्या भावना,
तरी नकळत जगणं शिकवून जाते...
उरांशी बाळगलेले नाते,
हृदयाच्या एका कप्प्यात साठून जाते...

काय असते दोष या देहाचा,
कधीच मात्र कळले नाहीत...
डोळे आठवणी पुसट करतात,
क्षण मात्र कधीच थांबले नाहीत...

आज एकांत नभासारखा दाटतोय,
आसवांचा पाऊस क्षण सजवतोय...
कसले दुःख अजूनही कळले नाही,
पण हृदयाचा महापूर अतोनात छळतोय...

-


Fetching Karthik Hajare Quotes