चांदण्यांच्या शृंगाराने
रजनी मनोहर होऊन जाई,
गुंफता शब्द भावनांना
अपूर्ण मी पूर्णत्वास येई.-
भाव होता मनी जेव्हा अमर्याद सुखदुःखांचा
पुसता कोणी दुरुन सांगायला जे अवघडले,
समोर बसूनी पुसले तेव्हा अश्रूंचा आला ओघ
प्रहर गेला निघूनी तरी त्यास शब्द अपुरे पडले !!-
वक्त ने कुछ दास्तान
ऐसे बदल दिये
मंजिल गुमनाम करके
सफर आसान किये-
आहे हाती कर्म ते ते
करावे निरपेक्ष
होई कायम विजय ज्याचा
सत्य आहे पक्ष
होती वेदना ही जेव्हा
ढळू नये ध्यास
हाती धरुन जगावे
कर्तव्याची कास
आरंभाचा अंत होणे
स्वाभाविक धर्म
वेळ हाती आहे तेव्हा
जाण जगण्याचे मर्म
क्षणिक मोह साधण्याकरिता
नको करु अनर्थ
मानवतेला जपून राहणे
देई जीवनाला अर्थ-
आयुष्याचा कोरा कागद
हाती स्वाभिमानाची लेखणी
रचेन काव्य स्मरुनी सारी
भविष्याची स्वप्न देखणी-
गमावलेलं सगळं
हरवलेलं सगळं
तरी वाटलं होतं
दुरावलेलं सगळं
बिथरलेलं सगळं
तरी वाटलं होतं
आशेचा सूर्य केव्हाच मावळला
अन् अंधारलेल्या दाही दिशा
तरी वाटलं होतं
आणि मग काय
प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी
फक्त आणि फक्त
ते वाटलचं होतं !-
जो सुलझासा था हमेशा
अब क्यों उलझने लगा है |
वक्त का यह मोड कैसा
जो अतीत की पहेलिया बुझाने लगा है ||-
रिते आभाळ
रिते अरण्य सारे
रिते मन अन्
रिते शब्द सारे
रिते नव्हे ते तर
खोल असतात
जाणून घे एकदा
किती अबोल असतात-