मन मनाचे संयमी मनाशी बोलणे बाकी होते.
मन मनातल्या शब्दांना उलघडणे बाकी होते.
मन मनाचे हे अश्व सैरा वैरा चौफेर धावताना
मन मनाला सागरी किनारी थांबणे बाकी होते.
मन मनाची लिहून झाहली ग्रंथ कांदबरी चरित्र
मन मनाची शेवटीची पाने लिहिणे बाकी होते.
मन मनाचे छाटून पंख मी अंतरी बंदिस्त करता
बोल अंतरीचे शब्द मनाला भेटणे बाकी होते.
भटकत वणवण मी केले सोहळे सुखाचे शेवटी
चितेवर हसर्या मनाला दुःख मागणे बाकी होते...!!
-
कृष्ण सदा सहायते💚🌼
स्वतःमध्ये हरवलेली
शब्दाशी खेळणारी ... read more
आयुष्याच्या तप्त वणव्यातला बहर होशील का. ?
मला आवडणारा नाजूकसा तू चाफा होशील का ?
फुल होऊन चरणावरती मी तुझ्या सदा दरवळेन
सांग ना माझ्या आयुष्यातील कान्हा होशील का ?
मी छेडूनी एकतार विणेची मैफिलीत भैरवी गाता
तू मंत्रमुग्ध सुखावणारा तमोधुन नाद होशील का ?
नको चंद्र ,तारे नको कौस्तुभ अन् माणिक , मोती
फक्त माझ्या कवितेतील तू एक ओळ होशील का ?
देईन साथ सुख दुःखात चालेन वाट ही मी खडतर
हसवूनी अश्रूंना फक्त ओठावरचे हास्य होशील का?-
मराठी राजभाषा आमची
महाराष्ट्राची शान मराठी
साहित्य समृद्ध ज्ञान मराठी
महान इतिहास जगते मराठी
प्रेमळ सुंदर रसाळ मराठी
तना मनात गर्जेते मराठी
सदा गर्व असे मी मराठी
-
कोण बोलत की वेळ थांबत नाही..जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडले तेव्हा सार जग थांबल होत माझ्यासाठी🥺🙂
-
कुछ ख्वाहिशेए हैं मेरी अधुरी
तुम आकर पुरा कर जाओ ना..
बेरंग सी हो गई हैं दुनिया
आकार तुम प्यार के रंग भरो ना
अब शाम भी ना सुहानी लगती
तुम आकर शाम सुहानी कर जाओ ना..
अकेली पडी दुनिया की भीड मैं
तुम आकर सहारा बन जाओ ना...
साथ मिलकर सपने है देखे
उन सपनो को सच कर दो ना..
बहुत दिन गुजारे तुम्हारे इंतजार मैं
अब तो आ जाओ ना..
मेरे हमसफर बनने आ जाओ ना..
कुछ ख्वाहिशेए हैं मेरी अधुरी
तुम आकर पुरा कर जाओ ना..
-
तुम दिन हो तो मैं शाम बन जाऊ
तुम रात हो तो मैं ख़्वाब बन जाऊ
तुम लफ्ज़ हो तो मैं बात बन जाऊ
तुम आसु हो तो मैं हसी बन जाऊ
तुम राह हो तो मैं मंजिल बन जाऊ
तुम नफ़रत हो तो मैं प्रेम बन जाऊ
तुम दिल हो तो मैं धडकन बन जाऊ
तुम कागज़ तो मैं कलम बन जाऊ
तुम श्याही हो तो मैं अल्फाज़ बन जाऊ
तुम लय हो तो मैं सुर बन जाऊ
तुम कान्हा हो तो मैं रुक्मिणी बन जाऊ
तुम जीवन हॊ तो में तेरी जिंदगी बन जाऊ
-