जन्मापासून साथ देणारे...
कधी सुखात हसणारे,तर दुःखात रडणारे...
कोंडलेल्या भावनांना ऊजागर करणारे...
"ते अश्रू"
कधी पुसायला भोवती सगळे...
कधी पुसायचे आपणच आपले...
खंबीर बनवतात मनाला...
ते अश्रूच असती निराळे...
"ते अश्रू"
कोणासाठी तरी, कोणाच्या डोळ्यातून गळणारे...
हृदयाला भिडणारे,मनाला जागवणारे...
माणुसकी शिकवणारे,जग बदलवणारे..
"ते अश्रू"
मरणानंतर निरोप देणारे....
-
रक्ताच्या थारोळ्यात पडले
ते भारत भूमीसाठी...
घरदार,संसार,मोह,माया त्यागले
होते त्यांनी या भारत मातेसाठी...
Valentine साजरा करायचा
होता त्यांना भारत मातेच्या कुशीत...
पण त्या नराधम दहशतवाद्यांना
नाही पाहवले असे खुशीत...
शहिदांच्या एक एक थेंब रक्ताचा
द्यावा लागेल शत्रूला मोबदला...
त्यांना न्याय दिल्याशिवाय न
शांती लाभेल आत्ता या आत्म्याला...
वीर शहीद जवानांनी भारत भूमीसाठी
मृत्यूला दिले असे आलिंगन...
त्यांच्या या अमर आहुतीसाठी सदैव
माथा आमचा होईल हो त्यांच्यासमोर लीन...
🙏🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
-
#ते तसंच राहून गेले!!
😇मनातलं बोलायचं होत,
पण कधी हिम्मतच झाली नाही
आणि ते तसच राहून गेलं !!!
दुरावलेली विरहाची गाडी नीट चालावी वाटलं होतं,
पण accelator दाबायची हिम्मतच झाली नाही कधी
आणि ते तसचं राहून गेलं!!♥️-
ते दिवस....
भुर्रकन उडून जातात ते दिवस लहानपणाचे
जेव्हा ओझे असते जबाबदारीचे पेलतांना!
रोजच नवीन जखम मिळते
सुखाचे मौल्यवान एक एक क्षण शोंधताना!
नाती गोति सगळी खोटी पाहिलि
साथ सोबत न् सांगतना!!
थकुन् गेलो बोल लोकांचे ऐकतांना
तहान तहान करतांना!
झुंज घेत राहिलो माझी लढाई
यश दिसत नसतांना!
पुन्हा पुन्हा मिळावी क्षमा
कळत नकळत चुकांना!
शेवट मैत्री च नातं सोबत होत
रक्ताचं नातं नसतांना!
अनओळखी या जगात वावरतांना
आपलसं कुणी सोबत नसतांना!
_@shu.k--
तुमचे ते चार ओळीचे पत्रही,
मला खूप दिवस वाचावयास पुरत होते...
कारण तुमच्या त्या चार ओळी,
माझ्या प्रेमाचे चार समुद्र वाटत होते...
तुम्ही वेडे आहात काय हो?
भराभर कसे लिहून पाठवता...
प्रेमाची भाषा ही त्रोटक असते,
आणि तुम्ही त्याला प्रेम म्हणता...
खरं प्रेम असते ना हो!!!
तेव्हा पत्रसुद्धा असं कोरंच असते...
आणि ते तितकं कोरं असूनही,
तेव्हढच भावदर्शन करीत असते...
खरं प्रेम कधीच विटत नाही हो,
प्रिय वस्तूही त्यास नवीनच वाटते...
कारण सूर्योदय किंवा सूर्यास्त,
बघितले काय!!!कधी कंटाळते?
मला ना तुम्ही फक्त एक ओळ लिहा,
तरी फार बरं वाटेल...
पण ती तुम्ही नियमित लिहा,
बघा कसे प्रेम फुलेल...-
नऊ महिने गर्भाशयात धारण करून जन्म देते
एका निरागस बाळाला ती आई असते !
बाळाने केलेल्या छोट्या छोट्या नटखट लीलांमध्ये
आनंद मानते ती आई असते!
शाळेच्या पहिल्या दिवशी हात धरून शाळेत सोडणारी ती आई असते!
परीक्षेच्या वेळी आणि परीक्षा संपेपर्यंत जिला सर्वात जास्त चिंता असते ती आई असते!
मुलाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मिरवणारी ती आई असते!
आई ही अशी व्यक्ती आहे
जी सर्व गोष्टीत आनंद मानून समाधानी असते!
त्यामुळे ते सुंदर जग म्हणजे आई असते!
-Samruddhi Chavan-
तलाशिए उन लोगों को जिंदगी में जो हाल पूछने पर आपके ठीक हूं कहने के बाद नहीं रुकते सीधे घर चले आते हैं
-
ते चार दिवस...
ते चार दिवस आहेत खूण,
कळीचे फुल झाल्याची।
ते चार दिवस असतात शाश्वती,
स्त्रीच्या आई होण्याची।
ते चार दिवस असती सोहळा,
बाईच्या स्त्रीत्वाचा।
ते चार दिवस म्हणजे,
वेदना आणि हळवेपणा।
ते चार दिवस म्हणजे,
स्त्री शरीराची झीज।
ते चार दिवस म्हणजे,
पुन्हा नव्याने उभारण्याची जिद्द।
ते चार दिवस करतात,
साथ तिची यौवनात।
ते चार दिवस राहतात,
सोबत तिच्या आईपणात।
ते चार दिवस बनतात,
मग आठवणी तिच्या।
ते चार दिवस जपतात,
तिचे बाईपण पुढच्या पिढीत।-
होते गुलमोहरी हवा तेव्हा,,
मधाळ हसत तो खोल डोळ्यात बघतो जेव्हा!!!-
पती-पत्नीच नात हे फक्त बंद खोली पर्यंत नसतं
तर, त्या नात्याला चार चौघात पण जपायच असतं-