ती स्वतःला सांभाळून नाती जोपासण्यामध्ये निपूण आहे.
तिच्या अस्तित्वामुळे सारे घर बांधून आहे.
तिच्या फक्त असण्याने घराला घरपण आहे.
तक्रार न करता संसाराचा गाडा ओढणारी अशी ती गृहलक्ष्मी आहे.
न डगमगता सांसारिक आणि व्यावहारिक ही दोन्ही चाके सांभाळून ती उत्तुंग भरारी घेत आहेशुभेच
अशा या स्त्री व्यक्तीमत्वाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
-
वक्त के साथ लोग जीना सिखा देते हैं
अगर उस वक्त को गेहराईसे समझ के लिया जाए|
-
अकेले ही आये थे ज़िंदगी के इस सफर मैं
अकेले ही जाना हैं ये सफर को छोड़के,
जहाँ अंत मैं खुदका शरीर खुदका नही हो पाता
वहाँ खुदके चेहरे पे घमंड करके क्या साबित करोगे?
-
कुठे थांबाव हे कळण्यापेक्षा परत नव्याने कशी सुरुवात करावी हे कळाल, की आयुष्याच्या प्रवासात वाट न बदलता त्याच वाटेवर जेव्हा नव्याने जगायला शिकतो तेव्हा आयुष्याचा प्रवास सुखकर होतो.
-
पहिल्यांदा जेव्हा गुलाबाचे फूल तू मला दिले,
तेव्हाच आपल्या नात्याचा नवीन प्रवास सुरू झाला.
खर तर ह्या गुलाबाच्या फुलाने आपल्या नात्यात,
त्या फुलाला असलेल्या काट्यासमान काही टोचणारे
क्षण तर त्याच्या सुंगधाप्रमाणे आंनदाचे क्षण देखील
दाखवले आणि आपल्या दोघांना आपल्याला एकमेकांना समजून घ्यायला शिकवले.
असेच आपल्या नात्याला गुलाबाच्या फुलाच्या सुंगधाप्रमाणे पसरवूया आणि असेच सोबती राहुया.
— % &-
ओढ तुझ्या प्रेमाची मला तूझ्या आठवणींमध्ये रमवते,
तु सोबत नसता मला मात्र तुझेच भास घडवते.
प्रेमाने जपवूनि हे जिव्हाळ्याचे नाते आपल्यातले प्रेम असेच वाढवूया,
आणि तुझ्या माझ्या नात्याला एक सुंदर ओळख देऊया.
आयुष्याच्या ह्या नव्या प्रवासात साथ तुझी मला अशीच देउनी,
माझा साथीदार होऊन साथीला माझ्या असशील ना?
-samruddhi chavan.
— % &-
मित्र तो असतो ज्याला आपल्या आधी सारे काही उमगलेले असते,
जो मनातले नुसत्या बोलण्यातून समजून घेतो.
मित्र जो फक्त सुखात नसून दुःखात पण
सोबती असतो,
जो काय करू आणि ते कुठपर्यंत हे सांगणारा सखा असतो.
ज्याला फक्त आपला दोस्त आनंदाने राहावा इतकेच वाटत असते,
दुः खात बाकी कोणी नसलं तरी तो असावा असे नेहमी वाटत असते.
आयुष्याच्या महत्वाच्या क्षणात अगदी हक्काने वावरणारा असतो,
नेहमी सोबत असनारा आणि उगाच हसवणारा भाबडा मित्र असतो.
प्रत्येक गोष्ट सांगणारा आणि जेव्हा गरज असेल तेव्हा मदतीचा हात पुढे करणारा हक्काचा माणूस असतो.
माहीत नाही, कळत नाही बोलल्यावर सर्वात आधी मनातलं समजून घेणारा असा तो सहचर असतो.-
डोळे उघडून तर बघ किती सुंदर जग आहे!
ऊन सावलीशी कसा बिलगला आहे!!
पक्षी आकाशात बिनधास्त होऊन उडत आहेत!!
डोंगर दऱ्यांमध्ये हवेचा सुळसुळाट ऐकू येत आहे!
आकाशामध्ये ढग एकामागून एक प्रवास करत आहेत!!
पक्षांचा किलबिलाट मनाला शांती देत आहेे!!
रात्रीच्या काळोखात चांदण्या किती सुंदर दिसत आहेत!!
एकदा डोळे उघडून तर बघ हे जग खूप सुंदर आहे!!!
-
मुलीना नाही हो करता येत
जे आहे त्यात घुपचुप् शांत बसून
फक्त हो ला हो आणि नाही ला नाही करायच,
किती तो जीवाचा त्रागा करून सगळ सगळ्यांच करायच
आणि शेवटी मात्र एका शाबासकीसाठी सुद्धा वाट बघत रहायच.-
हमे प्यार तो करना नहीं आता
पर जबसे करने लगी हु तबसे तुमसे ही किया हैं
-