जगत मी आलो असा की, जसा जगलोच नाही
अडकुण तुझ्यात मी तुला कधी विसरु शकलोच नाही
तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही
दुःख मनातले चेहर्यावर कधी दाखवु शकलोच नाही
खोटे हसु दाखवुन चेहर्यावर डोळ्यातल पाणी अडवलेच काही
रडलो असा की मी पुन्हा कधी हसलोच नाही
एकदाच पडलो प्रेमात की असा काही
पुन्हा कधी हृदयाने ठाव घेतलाच नाही
बांधीत गेलो तुला शब्दात मी असा काही
पुन्हा कधी सोडवु शकलोच नाही— % &-
नाही माहीत मला
तुझ्याशिवाय माझं काय होईल।
मला नाही वाटत
मला कधी श्वासाविना जगता येईल ।।-
मागे वळून पहायला,आता काही उरलेलच नाहीये,
ज्या वेळेस तु ह्रदय तोडून गेलीस,
तुझ्या शिवाय ह्या प्रेमाला काही अर्थच उरला नाहीये।-
न बोलता मी कशी राहणार तुझ्याशिवाय....
पहाटेच स्वप्न कशी पाहणार तुझ्याशिवाय....
क्षणा क्षणाला ओठांवर तुझच नाव असत....
मनातल कोणाला सांगणार तुझ्याशिवाय....
नको राहूस माझ्यापासून दूर कधीही तू....
मला जवळ कोण घेणार तुझ्याशिवाय....
राग अनावर होतो मन नाही ताब्यात....
प्रेमाने कोण समजवणार तुझ्याशिवाय....
एकटी मी कुठवर चालणार या रस्त्यातून....
आयुष्यभर साथ कोण देणार तुझ्याशिवाय....
कोणतीच गोष्ट होत नाही कधीही पूर्ण....
अपूर्ण नेहमीच मी असणार तुझ्याशिवाय....
शब्दच नाहीत माझ्याकडे काहीच बोलायला....
मोकळे पणाने कोण बोलणार तुझ्याशिवाय....
- स्नेहा....-
मन झालयं आज
खूप खूप उदास...
तुझ्याशिवाय काहीच
वाटत नाही रे खास...
तू समोर असता
हसू येते हमखास...
तुझ्याविना मात्र जीवन
वाटते बकवास...
का वाटतो इतका
हवाहवासा तुझा सहवास...
काय ही जादू तुझी भुरळ
घालते माझ्या मनास...
तुझ्याविना खायला
उठतो हा एकांतवास...
माझे हृदय झाले आहे रे
तुझे कायमचाच दास...
तुझ्याशिवाय..।-
थांबुन जरा विचार केला
काय उरलं आहे....❤️
तुझ्याशिवाय आयुष्य वाटलं
पुर्ण शुन्य आहे....❤️-
तुझ्याशी बोलणं झालं नाही म्हणुन वाटतंय दिवसची सुरुवात आज झालीच नाही किंबहुना आज दिवसच उगवला नाही....
-
प्रिय सख्या,
तुझ्याशिवाय, मी अपूर्ण।
तुझ्याशिवाय, मी शून्य।
तुझ्याशिवाय, मी अस्वस्थ।
तुझ्याशिवाय, मी शांत।
तुझ्याशिवाय, मी अबोल।
तुझ्याशिवाय, मी काहीच नाही।-