पुन्हा तुझं नावच घेणार नाही
शपथ घेवून ती फसली l
अन् लग्नाच्या बोहल्यावर
माझंच नाव घेवून बसली ll
© Sanket-
जेव्हा जेव्हा पत्नीचं
माझ्यावरच प्रेम वाढतं l
बजेट त्या महिन्याच
आपोआप कोलमडतं ll
© Sanket-
घे उंच उंच भरारी
पादाक्रांत कर तू शिखरे सारी l
यशोदिप कर्तृत्वाचा तेवावा अंगणी
जगावे बेधुंद तू स्वतःत रंगूनी ll
तुझी सारी स्वप्ने पुर्ण व्हावीत हीच इच्छा l
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ll
-
अनेक रस्ते असेही होते
जे तुझ्या पावलांनी दरवळून यायचे l
तू येवून गेल्याचे मग
आपसुकच मला कळून यायचे ll
© Sanket-
श्रीमंताघरचं पोरगं
जेव्हा तिला पाहून गेलं l
माझं शेणाचं घरटं
त्याचदिवशी वाहून गेलं ll
© Sanket-
माझं नाव जेव्हा
तुझ्या नावाशी जुळून आलं l
माझ्या नावातील सौंदर्य
अधिकच खुलून गेलं ll
© Sanket-
आजही तुझं नाव रेखाटण्याची
सवय काही जात नाही l
अन् ही सवय आहे तोवर
माझं वय काही होत नाही ll
© Sanket-
स्पर्श तुझा झाला अन्
देहाचा विणा थरारुन गेला l
फुले भावनांची उमलून आली
हृदयी वसंत जणू बहरुन आला ll
© Sanket-
आहेस तिथे सुखी आहेस
म्हणून मी शांत आहे l
तशी सलण्याकरिता मनात
तेवढीच एक खंत आहे ll
© Sanket
-