मनाच्या तळाशी असलेला प्रेमाचा डोंगर तु आहेस....
माझं हसणं माझं रडणं तु आहेस...
माझं सुख माझं आनंद तु आहेस...
माझं आयुष्य माझं विश्व तु आहेस...
मी नि माझं असणं तु आहेस...-
तुझं निखळ हास्य...
तुझं संमोहन शस्त्र आहे...
रागावर नेहमी माझ्या
मात करणारं अस्त्र आहे....-
शेकडो नाते जपत ती घर सुध्दा सांभाळते....
"स्त्री" आहे ती....
मन तिच्या बद्दल अभिमान बाळगते....-
क्षणांचं काय आहे ते येणार आणि जाणार....
येणाऱ्या प्रत्येक क्षणात तू हवीस नि...
जाणाऱ्या प्रत्येक क्षणात बस आपल्या गोड आठवणी.....-
वो मेरे ख़्वाबों को खुद के ख़्वाब समझता है
उसके चाहत को अब दिल भी रूह से सजदा करता है-
केवळ भावनांचा रोष असतो हा प्रेम...
आंधारात सावल्यांचा पाठलाग करण्याचा खेळ असतो हा प्रेम...-
बोलक्या डोळ्यात तुझ्या हरवुन
अबोल भावना माझ्या गहिवरतात....
रेशमी स्पर्शाने तुझ्या श्वास माझे दरवळतात.....-
तु बरस ना प्रेमाची सरीता बनुन...
नि चिंब भिजव ओसाड माझ्या भावनांना...-
तुझ्यासोबत घालवलेले प्रत्येक क्षण सुखावत असतात...
माझ्या हृदयाच्या कंपणांना अलगद संथ करत असतात...-
तुझ्या प्रेमाची खोली मापने मला शक्य नाही
तरीही....
माझ्या चेहऱ्यवरील आनंद नि डोळ्यातील भाव
या वरून काही कळतं का तुला बघ जरा...-