हृदयाच्या पलिकडे   (हृदयाच्या पलिकडे......!!)
145 Followers · 109 Following

Joined 26 March 2022


Joined 26 March 2022

आज पुन्हा आठवांनी तूझ्या अस्वस्थ केलं
वेळ काळ सगळं चुकतो पूर्ण बेशिस्त केलं

किती व्यापलेस तू तुझ्याशिवाय काही नाही
तुला डोळ्यापुढे ठेवत स्वतःला मार्गस्थ केलं

जखमांवर चोळत गेलो मी रोजच तुझे प्रेम
वेदनांना तूझ्या प्रेमनशेने असं मदमस्त केलं

तू दिलास हात हाती नि मी लढलो जगाशी
हर एक चाली रीतीला मी मग परास्त केलं

तिच्या प्रेमास सुध्दा कधीतरी भरती यावी
जाणून तिच्यासाठी स्वतःचाच सूर्यास्त केलं

-



मी सारीच बंधने झुगारले होते
या जगापुढे तुला पुकारले होते

तू प्रेमाने दिलंस घट्ट हात हाती
हर एक दुःख माझे वारले होते

तुटून गळून विखुरलो होतो मी
नव्याने तूने मला सवारले होते

रंग गंध फुले आता विशेष नाही
प्रेमाने तूझ्या इतके भारले होते

माझ्या बाहुपाशात कोण हा चंद्र
बघून तारका नभी थरारले होते

गंधाची चर्चा रंगविली केवड्याने
मी मग कस्तुरी तुला उद्गारले होते

-



तूझ्या रेशमी प्रेमाचे बंधन हवं फक्त
तूझ्या ह्रुदयात माझं स्पंदन हवं फक्त

पुजेन आपलेपण आपल्या नात्याचे
तुळस माझं नि तुझं अंगण हवं फक्त

तय्यार आहे आजीवन चाकरीसाठी
मखमली मिठीचा मानधन हवं फक्त

श्वास गंधित होणार नाही या फुलांनी
तूझ्या मोहक स्पर्शाचं चंदन हवं फक्त

हर एक भेट फिकीच तूझ्या भेटीपुढं
या ओठांवर ओठाचं कुंदन हवं फक्त

भाळ होईल माझेही खरंच भाग्यशाली
तूझ्याच सहवासाचं औक्षण हवं फक्त

-



माझ्या या आसमंती तूच आहेस
या दिलाची पसंती तूच आहेस

तूझ्या नावाने ओळखल्या जातो
माझी खरंच महंती तूच आहेस

तुझ्यासवे तूझ्या इर्दगिर्द फिरतो
माझी सारी भ्रमंती तूच आहेस

तूझी प्रेम फुंकर नि बहरणे माझे
माझी गोड फुलवंती तूच आहेस

श्वास श्वास माझा केलंस गंधित
माझी रंगीत शेवंती तूच आहेस

असो गवळणी कृष्णाच्या हजार
या नलाची दमयंती तूच आहेस

-



तूझ्या आठवांना रोज नव्याने चाळत असतो
मी लपून एकट्यात प्रेम अश्रू गाळत असतो

भेट बहुदा आपली पुन्हा कधीच होणार नाही
मी स्वप्नीच तूझ्या केसात गजरे माळत असतो

श्रावणात तिच्या रोज नव नव्याने भिजणे होते
आठवांच्या गारव्यात स्वतःला जाळत असतो

शिणले डोळे आता तुझी पायवाट बघत बघत
तूझ्या भास आभासांना आता टाळत असतो

अनोळखी नजरेने चुकवून सहज टाळतेस तू
मी तुला अजूनही का आशेने ओवाळत असतो

उरलेच नाही आता काही तूझ्या या प्रेमा नंतर
भंगले स्वप्न सारे तरी मी वचने पाळत असतो

-



मला तुझा सुगंधित सुवास हवा
तुझ्यासवे जीवनाचा प्रवास हवा

मुक्ततेशी घेतले कधीचेच वैर मी
सहवासाचा तूझ्या कारावास हवा

तय्यार आहे होण्यास तुझं कुंपण
प्राजक्त बनण्या तुझा प्रयास हवा

भेट पुन्हा खुल्या आभाळाखाली
पुन्हा बघून तो चांदवा उदास हवा

दे पुन्हा गंध माझ्या रीत श्वासांना
श्वासात केवड्याच्या आभास हवा

फितूर होणे प्रेमात जमलेच नाही
तूझ्या प्रेमाचा मलाही कयास हवा

-



हा देह तुझा वाटते जादूने मंतरलेला आहे
नभिचा चंद्र जणू आज अवतरलेला आहे

भिजली धरणी अन् फुलल्यात कैक बागा
तूझ्या येण्याने किती मन बहरलेला आहे

पौष माघ श्रावणही तूझ्या पाठोपाठ आले
पानगळी मध्ये माझा ऋतू बदललेला आहे

इंद्रधनू ने तूझ्या रंगात सप्त रंग मिसळवले
फाल्गुनात शेष फक्त श्वेत राहिलेला आहे

कूठे सूगंध उरले अन् कुठे उरली रातराणी
माळलेस एक फुल श्वास गंधाळलेला आहे

विभक्त विलग होणे आपले शक्य नाहीच
आत्मा आत्म्यात असा विरघळलेला आहे

-



हे आकाश चंद्र तारे बोलते तिच्याशी
हे प्रेमाचे गोड इशारे बोलते तिच्याशी

तिच्या निखळ हसण्याची जादु बघा
सभोवतालचे नजारे बोलते तिच्याशी

चाल अशी की सागरास ओहोटी येते
प्रेमलाटा सवे किनारे बोलते तिच्याशी

नटली जरा तर चंद्र ही ढगाआड होतो
काळोख्या राती सितारे बोलते तिच्याशी

तिच्या स्पर्शाचा सुगंधाची दरवळ किती
रंगीबिरंगी फुलपाखरे बोलते तिच्याशी

-



तुझे प्रेम माझ्यासाठी तरंगासरखे वाटते
उंच नभी उडालेल्या पतंगासारखे वाटते

सोडले वाचणे मी गीता श्र्लोक न स्तोत्र
जपणे नामाचे तुझे अभंगासारखे वाटते

सहवास तुझा हा जसं अलौकिक घटना
वर्णने न संपणाऱ्या प्रसंगासारखे वाटते

किती कासावीस अन् किती हतबल मी
तुझ्याविना जगणं निवडुंगासारखे वाटते

मी करतो बहाल पूर्ण आयुष्य तुला माझे
तुझं अस्तित्व हृदयाच्या रंगासारखे वाटते

किती निर्मळ निश्चल प्रेमभावना आपल्या
आपलं प्रेम नातं स्वच्छ गंगेसारखे वाटते

-



आयुष्य किती बहरलं तुझ्या प्रेमात पडल्यावर
दुःख सारेच विसरलो तुझ्यात जीव जडल्यावर

या ग्रिष्मातही किती ओलसर गारवा भावनांचा
कित्येकदा अनुभवले तुझ्या मिठीत शिरल्यावर

अचानक असे कसे दाटले असेल ते आसमंत
कळून चुकले सर्वच तुझ्या निखळ हासल्यावर

पाकळ्या सारखे नाजूक गुलाबासारखे लाल
झाले श्वास सुगंधी ओठांशी ओठ भिडल्यावर

शिल्लक ना उणे राहीले कुठेच काही नाही
पूर्णत्वच मिळालं तुझा सहवास लाभल्यावर

तूझ्या प्रेमाची किमीया की भावनांची ओहटी
अजून आहे जिवंत तुझ्यात श्वास संपल्यावर

-


Fetching हृदयाच्या पलिकडे Quotes