दाटलेल्या मनाला सावरुन
आजही निष्ठेने जगते ती..
जनव्यापी तिरस्कृत स्वभावात
स्वतःचे सामर्थ्य बघते ती..
रोज बघणाऱ्या घृणास्पद
नजरेला स्वतः अनुभवते ती..
या असुरक्षित जगात
टीकेत न्हाहते ती...
काय रे तिचा दोष, कुणाची
बहिण, आई ,पत्नी, मुलगी ती..
एक निर्दोष स्त्री तरी
बलात्काराचे रूप बघते ती..
खरचं स्वतंत्र आहे का ती...?-
कळून ही ना, कळली मला ती
कोडी बनून, पडली मला ती
एकच प्याला, झाला आता तर
इतकी कशी, चढली मला ती
मिटता मिटं ना, सुटता सुटं ना
सवयी जशी, जडली मला ती
ती म्हणाली पुन्हा, भेटू नको, पण
स्वप्नात येऊन, धड़कली मला ती
एक उचकी ही आता, मला येत नाही
इतकी कशी, विसरली मला ती-
माझ्या कवितेतली ती व्यक्ति
माझ्या हास्याचा PASSWORD
आणि नैराश्याचा CROSSWORD
तिच्याभोवती घुटमळता हा श्वास
बेधुंद स्पंदनांचा हा ध्यास
म्हणजेच माझ्या कवितेतली ती व्यक्ति
अबोल शब्दांना बोलक करणारी
माझ्यातल्या मला वाव देणारी
उलगडताना मलाच निःशब्द करणारी
माझ्या कवितेतली ती व्यक्ति
होय, तीच व्यक्ति...-
तिच्या वर्णनासाठी
माझे शब्द ही खुंटले ,
"ती"ला पूर्णपणे शब्दांकित करणे
मला आज ही नाही जमले...-
मुख सुखी करण्याची भिन्न धमक
भेगाळलेल्या हाती 'तिच्या',
अविरत राबायची तयारी 'तिची'
बरसवण्या सरी सुखाच्या...
स्वयंपाक घरंच हक्काचं स्थान 'तिचं'
चार भिंतीत वसलेलं विलक्षण नगर,
'ती' स्वतःच त्या नगराची सम्राज्ञी
म्हणूनच निर्मळतेला फुटलाय बहर...
नगरी या मोल न कसले
अलंकार ना अहंकाराला,
साधं लुगडं, बांगड्या,कुंकू
आणि 'तिचं' बहुमोल हास्यच सोबतीला...
भाकरी थापून हस्त 'तिचे' अलगद
थापलेल्या भाकरीला तव्याच्या स्वाधीन करतात,
चटक्यांची दहशत पेलवत भाकरी भाजते 'ती'
टोपल्यात भाकरी जाता नयनपाकळ्या 'तिच्या' आनंदी होतात...
भाजी-भाकरीचा तृप्त घास
शिणलेल्या मनास लाभलेलं मौल्यवान धन,
तत्क्षणी पूर्ण होई 'तिची' इच्छा
होती धडपड केवळ "पाहण्यासाठी ते समाधानी मन"...-
................तीचा जागर होऊदे.............
*ती मायेचा पाझर, प्रसंगी होऊन कठोर*
*स्नेहमयी ती घागर, तिचा जागर होवू दे।।धृ।।*
सदा माय ती घराची, सान-थोरही साऱ्यांची
सामर्थ्य ती वाहतसे, होऊनी ढाल उंबऱ्याची
सुश्रुषेचा गहिवर सारा, प्रेमळ झरा हा वाहू दे
*स्नेहमयी ती घागर , तिचा जागर होऊ दे।।१।।*
दिन-रात जागे मनं, तीचे लेकराच्यासाठी
संकटकाळी ऊभी माय, देखा तिच्या पिल्लासाठी
कर्तव्यदक्ष जननीचा दरवळ, घरा-घरात वाहू दे
*स्नेहमयी ती घागर, तिचा जागर होऊ दे।।२।।*
रंग-रूपा पलिकडे, अढळ ध्रुवासमान
नभांगणातील तारकांचे, भासे लखलखते स्थान
घरादाराची मांगल्यज्योती,देव्हारी अशीच तेवू दे
*स्नेहमयी ती घागर,तिचा जागर होऊ दे।।३।।*
स्व-स्वप्नांना सारून बाजूला, रूप त्यागातही सजले
अडथळ्यांना देऊनी मात,अस्तित्वाचे ठसेही जपले
ओढा-ताणं, फरफट तिच्या जीवाची, यश गुढी तिची उंच उभारू दे
*स्नेहमयी ती घागर, तिचा जागर होऊ दे।।४।।*
तिच्या नात्यांचीही विणं,साक्षात भगवद् गीता
तिच्या कर्तृत्व ऋणाने आज, सागरही झाला रिता
अगणित मायेचं हे लेणं, घराघरातं लेवू दे
*स्नेहमयी ती घागर,तिचा जागर होऊ दे।। ५।।
Deepali V. Mathane................-
संस्कृतीचा पदर सावरत
अधुनिकतेची पैंजण चढवणारी
रुढीची बंधने तोडली तरी
माणुसकीची स्पंदने जपणारी....
आजची ती
नाविन्याचा आसरा घेतानासुद्धा
परंपरेचा गजरा माळणारी
आभाळासारख भव्य ललाट घेउन
त्यावर सौभाग्याच सिंदुर जपणारी....-
भाकरी भाजताना भाजल्या बोटांमध्ये
आता बंदूकही स्थिरावली
अपार कर्तृत्व तुझे नारी
लेखणीलाही तलवारीची धार आली
-
रुसतेय, भांडतेय, अपेक्षा ठेवतेय,
हक्क गाजवतेय, भरभरून बोलतेय ,
तोवर ती तुमची आहे,
हे सर्व संपून जेव्हा ती फसव हसेल ,
पण व्यक्त व्हायचं टाळेल ,
विश्वास बाळगा तुम्ही तिला गमावलंत..
इतकी सोपी असते 'ती' समजायला.
-
जेव्हा सीमेवर तो डोळ्यात तेल घालून जागायचा...
तेव्हा तीसुद्धा जागरण करत होती,
दिव्यातले तेल संपेपर्यंत...
शरीराने दूर पण मनाने
काश्मीर नि घरापर्यंतचे अंतर एका झटक्यात पार करून हितगुज करायचे ते दोघे...
गंमत झाली एकदा...
त्याने पाठवली चिठ्ठी त्याच्या प्रियेसाठी...
आणि मग काय,
तिला लागली चाहूल मिलनाची...
उंबरठ्यावर चिमूटभर मीठ
व त्यावर ठेवलं फुलपात्र उपडे...
दारावर किंचाळणारऱ्या
कावळ्याच्या कर्कश आवाजात जणू तोच
देत होता त्याच्या येण्याची चाहूल...
आणि आला तो एक दिवस तिच्यापाशी
तिरंग्यात लपेटलेला...
पण अजूनही ते फुलपात्र तसंच उपडे ठेवलेले आहे....
पूर्वीसारखंच....
-