.........
-
किती चांगला, कितीसा वाईट
कसा किती मी आहे भावूक
निर्जीव असल्या या भिंतींना
सार सार आहे ठाऊक...-
चातकासारखे जगणे झाले
वाट पाहणे संपत नाही
अडकुन राहीले धागे मनाचे
गाठ सोडणे जमत नाही...😞-
दिवस आठवणीत जातो सखे
राञ माझी सरत नाही
तु नावसुद्धा विसरुन गेलीस
मी क्षणदेखील विसरत नाही.....-
मी उन्हाळ्याची मोठी सुट्टी
तु शाळेचा पहीला दिवस प्रिये
मी तारुण्याची रांगडी मस्ती
तु बालसुलभ ती हौस प्रिये...
मी जुणेपुराने भग्न शिवालय
तु गजबजलेला गाव प्रिये
मी खोल नदीतील बुडता खलाशी
तु पैलतीराची नाव प्रिये....-
तु संध्याकाळ, तू फुलमाळ
कवितेमध्ये वसते माझ्या
शब्दासवे तू सर्वकाळ....
तुपासारखी साजूक तू
काचेसारखी नाजूक तू
सदा मनाला मोहवते
मोरपंखी मोहक तू...
तू पुष्पगंध, तू मकरंद
तू एक छंद, तू मर्मबंध...
तू गंधतुलसी, तू मुक्त पक्षी
तू हवीहवीशी, तू चाफ्याजैसी...-
एकमाञ आठवण म्हणुन
रुमालच तेवढा राहीला सखे
शेवटच्या त्या भेटीचा
मी शेवट जपून ठेवला सखे...-
आताशा सगळेच सांगत असतात
विसरुन जा तिला, किती आता झुरायच
पण मनाला माञ प्रश्न पडतो,
तुलाच विसरुन गेलो तर
आठवणीत काय ठेवायच...😄😄-