QUOTES ON #जगणं

#जगणं quotes

Trending | Latest
3 JUL 2020 AT 13:52

तुझ्यापासून दूर जाऊन मी जगायला शिकतेय,
ह्या निष्ठुर जगाकडे नव्याने बघायला शिकतेय...
तुझ्या नजरेत खोळंबल होत माझ जग सार,
पण या विस्तृत जगाकडे तुझ्या नजरेतून पाहायला शिकतेय...

-


1 MAY 2019 AT 18:37

चालता चालता कळालच नाही
आयुष्य कधी संपूण गेलं
स्वत:साठी जगायच होत थोड़
अन तेवढ्यात स्मशान आडवं आलं

-


10 NOV 2022 AT 9:37

किती अप्रत्याशित असतं जगणं... कोणत्या क्षणी काय होईल...
कोणताही नेम नाही... ठरवता काही घडतं भलतंच...
कल्पनेपलीकडे असतं प्रत्यक्षात जगणं... ध्यानीमनी नसताना अकस्मात घडून जातं काही... नित्यनूतन अनुभवांची मालिका असते सुरू...
सगळंच कसं आकस्मिक... कशाचीही, कुणाचीही खात्री देता येत नाही... आज आहे उद्या नाही... आयुष्याच्या क्षणभंगुरतेचा प्रत्यय मात्र पावलोपावली... जिथे कसलाच भरवसा नाही तिथे कशाच्या आधारावर, कुठल्या आशेवर जीवन प्रवास चालू आहे कुणास ठाऊक...
कशासाठी, कुणासाठी उमगत नाही अजूनही...नक्की जायचं, पोहोचायच कुठे, गाठायच काय उमजत नाही... आत्मशोध सुरू आहे निरंतर प्रत्येकाचा... शाश्वती नाहीच तरीही हे ही दिवस जातील म्हणत जगायचं...
मानवी जन्माची जाणीव ठेवून अखेरच्या श्वासापर्यंत जगत राहायचं आनंदाने... जमेल तेव्हढं कार्यशील राहून जगायचं
सकारात्मक, रचनात्मक, सृजनात्मक...
- © श्रीरुप
- Dr. Rupali

-


10 JUN 2021 AT 19:36

निखाऱ्यांवरच जगणं

निखाऱ्यांवरच जगणं आम्हचं, आम्ही अजून ही जगतच आहोत
चुलीतले कोलीत धूपत ठेऊन, निखाऱ्यांची वाट पाहतच आहोत

आम्ही स्वतःला नासरू करून, निखारे डोळ्यात साठवत आहोत
खंबीरपण भरलं आहे आम्हच्यात,धाडसान निर्णय घेतच आहोत

आम्ही अजून धूपत्या निखाऱ्याची,आग डोळ्यातून वाहवतच आहोत
मान प्रतिष्ठा साबूत ठेऊन, वाट्यात आलेला संघर्ष करतच आहोत

आम्ही अजून निखाऱ्याची ठिणगी, उडण्याची वाट पहातच आहोत
कमजोर समजून छेडू नका, निखाऱ्याच पांघरून ओढवूनच आहोत

-


14 MAY 2020 AT 13:46

जगणं

वाटत की संपलं आता सगळं
नाही रे मित्रा! जगायचं राहिल आहे ना अजून थोड

आईची इच्छा पूर्ण केली
बायकोची मर्जी सांभाळली
मुलांची हट्टे पुरवली
वाटत की ......

इतरांसाठी धावपळ केली
स्वतःसाठी लगबग केली
उगीचच इकडेतिकडे बघा बघ केली
वाटत की ......

सगळी कामे मार्गी लावली
सहकाऱ्यांना मदत केली
साहेबांची हाजिजी पण झाली
वाटत की ......

दिवसाची रात्र केली
प्रगतीची उच्चांकी गाठली
सरकारी तिजोरी पण भरली
वाटत की ......

नातेवाईकांची सरबराई केली
मित्रमंडळींची घशी ओली केली
पित्रांची पण सोय केली
वाटत की ......

थोडीशी तोडफोड केली
अभद्र बडबड केली
परिस्थितीशी तडजोड पण केली
वाटत की ......

आर्थिक नियोजन सांभाळली
राजनैतिक खेळी खेळली
सामाजिक आणि सांस्कृतिक कार्ये पण केली
वाटत की ......

बालपणीची छंदे जोपासली
तरुणपणाची जबाबदारी पेलली
उत्तरायनाची व्यवस्था पण केली
वाटत की ......

इच्छा अपेक्षांची पायमल्ली केली
आले गेलेल्या प्रत्येकाची प्रशंसा केली
अपमानाचा घोटच काय? पूर्ण वाटीच प्यायली
वाटत की ......

वाटेत घटका समोर आली
यमराजाची तजवीज झाली
म्हणे देवाची बरीचशी इच्छा अतृप्त राहिली
वाटत होत की संपलं आता सगळं
नाही रे मित्रा! मेलास खूपदा तू; जगायचं राहिल आहे ना अजून थोड
©अनिल कापुरे
14/05/2020

-


2 AUG 2021 AT 15:24

जगणे आता असे कंटाळवाणे झाले
भावनेच्या भासाचे नको झाले जिणे
कुठवर असे तिच्या मागे मागे पळायचे
मनाच्या मोराला तरी किती नाचवत ठेवायचे ?

-


2 OCT 2019 AT 0:37

खरंतर सौंदर्य मुक्कामात नसतंच..
प्रवासच असतो खास ..
मग जगून घ्यावं प्रवासालाच..
सोडून मुक्कामाचा ध्यास ...!

-



भोगलं सुख आनंदाने, दुःखही तसंच सोसलं,
एवढ सारं मोफत, मात्र जगण्याने शिकवलं !

-


30 APR 2019 AT 18:57

हे जगणं कधी तुझ्यासवे
माझ्यात ही असावं,
जगण्याच्या त्या सुंदर क्षणी
तुझ्याचसाठी बहरत रहावं...
हे जगणं कधी ,
तुझ्या प्रेमात,तुझ्या सवें
पुन्हा पुन्हा यावं....
ही ओढ तुझी
जगतांना आयुष्याच
निमित्त व्हावं...
हे जगणं कधी
शेवटच्या श्वासात ही
तुझ्याचसाठी रहावं,
हे जगणं कधी
प्रत्येक जन्मी
तुझ्याचसाठी यावं....

-


28 FEB 2022 AT 8:11

जगण्याची आस असणं
हेच तर जगणं हायं
क्षणांचे साऱ्या
तेच तर म्हणणं हाय

-