हल्ली वेळ नाही,काम आहेत
अशी बरीच कारणे तुझी माझी आहेत,
दिवस उजडता होतो प्रवास चालू
हे राहील,ते राहील
मग जीवाची रेंगारेग चालू…
माहीत आहे उद्यासाठी झटतो आपण
बोलणं धाबंवून पळतो आपण,
इथे कोणाला करियर तर
कोणाला का जगायचे? प्रश्न आहेत,
रोजची घालमेल अन
नेहमीचेच उत्तर आहे…
पुढे जातांना मागे पाहिलं तर
नको रे बाबा,पुन्हा तेच करणे आहे
जगणे थोडे अन मरणे जास्त
तुझे माझे तेच गाऱ्हाणे आहे....
-रोहिणी नखाते
-
Being CIVIL Engineer
HBD_12Aug
आठवणीत तुला बरच मी लिहिलंय
आता आयुष्यात तुला लिहा... read more
नको तितके आघात झाले
रोज जगणे असाह्य झाले,
इथे पाचशे तर तिथे तोंनशे
मरणाचे हिशोब तोंडबंदी झाले,
रोज विठ्ठलापरी उभा आपल्यास
डॉक्टर, पोलीस देव झाले,
गुदमरलेला श्वास अन पाखरांचे
उडणे बेभान झाले,
नाही म्हणता म्हणता
बऱ्याचेंच जगणे आनंदाचे झाले…
सोडून गावमाती अन दिखाव्याचे
जगणे पुन्हा मातीत आले…
नको तितके आघात झाले
रोज जगणे असाह्य झाले…
-रोहिणी✍️🌸
-
नाही मोजिले अंतर तुझे माझे
पण प्रेम प्रीतीचे बहरले,
चांदण्या समक्ष आठविले तुजला
अन चंद्रास आपले नाते सांगितले…-
तीच खिडकी,तीच गाणी
आज तो आला होता,
हळूच आठवणींच्या कोपऱ्याला
थेंब गारवा लागला होता…
कित्येक किस्से आठवले
कित्येक कविता राहून गेल्या,
कित्येक डायरीच्या पानावरल्या
अधुऱ्या सरी कोसळून गेल्या…
पुन्हा जमली मैफिल
आता श्रोते अनेक होते,
विजा,वारा अन पाने फुले
सोबत कोकिळेचे गाणे होते…
पहिला पाऊस जुन्या आठवणी
गुन्हे हजार घडून गेले,
कोसळणाऱ्या पावसासम
आठवणींचे पसारे राहून गेले…
-रोहिणी🌸
-
ही सांज रेंगाळलेली.....
मनात गुणगुणते गाणं तुझं
छटांच्या नजरेतल रूप तुझं,
स्पर्शून जातो वाऱ्यासम तू
नवीन भासतो जुनाच तू
कवितेचे नवे पिसारे
तुझे माझे नवे किनारे,
शब्दांची घालमेल जशी
तुझे माझे गीत मिनारे,
घायाळ ही तुझीच सजणी
रोज तुझ्याचसाठी सजली
आठवणीत मी तुझ्याच रमलेली
अन ही सांज रेंगाळलेली…
-रोहिणी🌸
-
बरेच अंतर तुझे माझे
आणि बऱ्याच आठवणी सुद्धा,
आजून बरच आहे आठवणीत
आणि बाकी आजून बरच बरं का?
-
भरून आलेलं आभाळ
अन् अंगावर शहारलेली मंद वाऱ्याची झुळूक,
तुझ्या आठवणींची नशा पुन्हा पुन्हा रेंगाळते,
कधी हळूच तुझे भास रंगतात
तर कधी आठवणींचे आभास खेळवते....
-
Wish you happiest birthday tushar 💐🎊
May you are all dreams come true with lots of love and happiness😊
......आजून खूप लिखाण कर👍👍
पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा🎉🎉-
साद घाली मन माझे
आजही मी तिथेच उभी,
स्पर्शून जातो तो वारा
अन मी वेडी तुझे भास करी......
ये कधीतरी न विचारता
जरा मला ही बोलायचं आहे,
चार फोटो तुझे माझे
अन भेटीचे क्षण मला जगायचे आहेत....
आठवणीतला चेहरा रोज असतोच
माझ्या श्वासात ही ,डोळ्यात ही,
जरा विसवणे होऊ दे
कधीतरी तुझ्यात मला पाहू दे.....
-