आयुष्य होईल कुरुक्षेत्र
सुदर्शन घेऊन श्याम बनावं
लंका बनेल अहंकार मग
धनुष्य घ्यावं अन् राम बनावं-
तो एक चाफा होता
माळावरती फुललेला
देऊन पाय छताडावराती
काळाच्या बहरलेला..
पानांची साथ सुटलेला
पाण्याशिवाय थकलेला..
मायेवाचून आसुसलेला
तो एक चाफा होता
माळावरती फुललेला
-
जाणतो हा किनारा
माझा मुक्काम नाही..
बांधलेली नाव इथे
तुझी भक्कम नाही..
नदीवरी प्रेम माझे
अनंत अनंत आहे
नदी जाते समुद्राकडे
मंद मंद आहे..
नदीलाही दुःख थोडे
थोडा हर्ष आहे..
पर्वताला सोडून
अंनत संघर्ष आहे..
-
प्रश्न संपलेच नाही..
उत्तर टाहो किती फोडी..
आयुष्य म्हणतात ते सोपे
सुटेना जगण्याची कोडी..-
गंधालळं आभाळ सारं…
गंधालळ्या दिशा दाही…
जरी बहरली रातराणी..
रात जाहलीच नाही…
-
तू स्वरा सरस्वी संत सारीका समोर सानिध्य सरगम समान
तू कुजा कौशिकी कनक कालिनी किरणरुप करमत कमान ।
तु प्रिशा पावणी परम परिष्णा प्रिना पर्णश्री प्रीत प्रमाण
तु गंजन गिता गिना ग्रंथना गुणित गज़ल अन् गीत समान ।।-
नको काव्य रे पूर्व हट्ट हा
पाहताच तिला झाला निगरगट्ट हा..
पूर्व श्रावणा.. पुन्हा भावना..
एक प्रतिमा पुन्हा दाव ना..
पुन्हा शब्द आणि पुन्हा कविता
एक नजर अन् पुन्हा घाव ना..
पुन्हा पर्ण अन् पुन्हा लेखणी
काळ लोटला .. पुन्हा देखणी..
वर्षे लोटली शब्दे गोठली
फितुर अदा मग नजर साठली..
एक साजणी एक साजणा
पुन्हा सोहळा पुन्हा साजरा !!
~ अमोल रसाळ-
कधी एकटा कधी वेगळा जगण्याच्या गर्दीत असतो मी
फरक मला ना पडतो तयांचा माझ्या तंद्रीत असतो मी..
कत्येक स्वप्ने विस्कटलेली कितीतरी बेचिराख झाली..
कित्येक दुःखे कवटाळून ही त्यांना परतीत असतो मी..
लाचखोर जग झाले आहे पण मला भावले ना कोणी
कित्येकानी पोशाख बदलले माझ्या वर्दीत असतो मी..
दुखण्याला ना घाबरतो आणि आजारांशी लढतोही
डोके थोडे दुखते माझे अन माझ्या सर्दीत असतो मी..
कित्येकांची चव बदलली कित्येकांचे ध्येय बदलले
पण ध्यासाला कवटाळून आहे माझा गंधित असतो मी..
चेहऱ्यांचे हे जग दिवाने ह्रदय पाहतो ना कोणी
मृगजळाच्या दुनियेत या माझ्या सुरतीत असतो मी..
सत्तेसाठी रडरड आहे सिंहासनाचा लोभ इथे
पण माझे मस्तक स्थिर आहे अन माझ्या खुर्चीत असतो मी..
दगडांना का पुजावे अन मानवतेची का विटंबना
ईश्वर अल्लाह मीच असेन तर माझ्या मूर्तीत असतो मी..
~अमोल रसाळ-
वाहिले मी स्वतःला माझ्याच या स्वप्नांमध्ये
पाहिले मी स्वतःला आज या दर्पणा मध्ये..
माझ्याच आकृतीशी मी राहिलो अज्ञात जरी
व्यक्तित्व आज दिसले मला माझ्याच या अर्पणामध्ये..
-
कृष्ण रंगात रंगण्याचा अट्टहास होता तिचा
कृष्ण भक्तीत गुंगण्याचा दृढ ध्यास होता तिचा..
-