सौभाग्याची ही गुढी,
आनंदाची ही गुढी,
प्रेमाची ही गुढी,
सुखी संसाराची ही गुढी,
गुढीपडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
( मराठी वर्षानुसार सर्वांना नववर्षाच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा )
💖💝 जय गजानन 💝💖-
नव प्रभात की नव बेला में नव- नव पुष्प खिलेंगे।
नव जीवन की नई डगर पे नए-नए मीत मिलेंगे।
नई नवेली गुड़ी पड़वा की नई शुरुआत खुशी से होगी,
नये वर्ष में, नई सी दुनिया नव- नव दीप जलेंगे।-
चैत्राच्या पालविने सुरुवात होते या हिंदू नववर्षाची
सणाचे पावित्र्य जपतो आम्ही गुढी उभारूनी
नाविण्य रूपी सजवू ही गुढी
नमन करू तिच्या पुढी
आनंद लहरी उठता मनी
तेज झळके प्रत्येक क्षणी
पाडव्याचा सण आज
गुढी चा मान आज
तिला साडीचा साज आज
नवचैतन्याची पहाट आज !-
ब्रम्हध्वज.
नूतन वर्षाचा पहिला सुर्य उगवला.
ब्रम्हध्वज नवचैतन्याचा गगनी उंचावला.
पितळी गढव्याचा ताज चढवला.
हळदी-कुंकवानं, सारा देह सजवला.
गळ्यात पुष्प,झेंडूचा हार बांधला.
सडपातळ अंगाला, शालू नेसवला.
कडुलिंबाचा हिरवा साज चढवला.
आंब्याच्या पर्णांनी शृंगार करवला.
पायाशी रांगोळीचा सडा पसरवला.
चाफ्याच्या फुलांनी भाव वाढवला.
पुरण-पोळीचा गोड नैवेद्य दाखवला.
गोड गाठीचा शर्करेचा प्रसाद भरवला.
नूतन वर्षाचा पहिला सुर्य उगवला.
ब्रम्हध्वज नवचैतन्याचा गगनी उंचावला.-
मराठी नववर्ष..
आणि
गुढीपाडव्यानिमित्त
सर्वांना
मनःपूर्वक शुभेच्छा..
💐🙏-
उभारली आज आनंदाची गुढी सर्वांच्या दारी
साखरेची गाठी, फुलांची सजावट ,रांगोळी भारी
नाकात नथ, केसात गजरा, नेसली नववारी
ईश्वर चरणी हीच प्रार्थना प्रेम ,सुख-समृद्धी लाभो सर्वांच्या घरी..!!! 🌸-
वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारु,
आला चैत्र पाडवा...
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 💐🚩🙏🏻
-
🌿 चैत्रप्रतिपदा 🌿
चैत्राची पहाट नव्या नवलाईचा क्षण
चैतन्याची लाट नव वर्षाचे आगमन
पावित्र्यात सजतो पावन दिन
सुख समृद्धीचा गंध मांगल्याचा सण।।१।।
तांब्याचा कलश निर्गुण कडुलिंबाचे पान
साखरेच्या गाठीसह चिंचेचा मान
दारी थाटून रांगोळी सजले अंगण
चौकटीस् बांधले आंब्याचे तोरण।।२।।
साडेतीन शुभ मुहूर्त चैत्रप्रतिपदेचे स्थान
रोवून कळकाची काठी इंद्रास नमन
विजयाची पताका गुढी टेकली गगन
मराठी परंपरा संस्कृतीचा अभिमान।।३।।
प्रेम भावना मनी नात्यांची वीण
होऊन पानगळ नव्या पालवीचं येणं
जागून आत्मविश्वास आशेचा किरण
सुरुवात सकारात्मकतेची सुखाचे जीवन।।४।।
-©शब्दांची पौर्णिमा...✍️
-