मिळाला जन्म अंधारात हा आहे
उजेडाच्या इथे गोष्टी कशा सांगू?
-
विचारू नये ; कुणी, कुणालाच पत्ता घराचा राजे हो!
होऊ शकते, अजून तो त्याचे जुनेच घर शोधत असेल..
©समीक्षा भुसारी🖋-
सुरुवात सांगतो मी, शेवट नका विचारू
प्रेमात प्रश्न बाकी हलकट; नका विचारू
आनंद येत नाही तोंडावरीं कुणाच्या
आहे किती व्यथा ही बळकट; नका विचारू
गाळून घाम येथे होतो कुणी भिकारी
जुळते कुणापुढे हे मनगट; नका विचारू
झालेत फार वेळां पाठीत वार हल्ली
आहे तरी कणा का दणकट; नका विचारू
काट्याकुट्यात सुद्धा तो चालतोय सोबत
टळले किती तिचे ते संकट; नका विचारू
©समीक्षा भुसारी✍️-
Don't trust blindly to anyone!
Because,
Devil was once an angel.-
डोळ्यातल्या पाण्यासोबत कितीही हुंदके गिळले
! तरी, हृदयातली वेदना आटत नाही..
झरा दु:खाचा साठला जरी जगाला तो दाखवता येत नाही..
म्हणून म्हणते पाखरांनो!
जरा जपून निघा रे घरट्यामधून!
कारण,जखमी झाल्यावर नव्याने लगेच उडता येत नाही..
©समीक्षा भुसारी ✍-
बाहुल्यांचे खेळ खेळता खेळता...
कसं जिम्मेदारीच ओझं खांद्यावर आलं कळलंच नाही...
©समीक्षा भुसारी✍-
ये शहर तो मुझे मुश्ताक़ो दिखाई देता हैं...
जिसे देखूँ अपने आप में दर-ब-दर दिखाई देता हैं..
ना कोई ख्वाहिश, ना कोई आसमान दिखाई देता है।
उँचे मकान हैं यहाँ जहाँ से दरिया दिखाई देता हैं...
©समीक्षा भुसारी✍-
कुणास सांगू पाठीवर वार किती झाला..
डोळ्यांसोबत अश्रूंचा करार किती झाला..
भेटली जरी इथे माणसांना मी काही!
भेटण्याचा बघ अंतरी भार किती झाला..
©समीक्षा भुसारी ✍-
गोड ते सारे त्रास लिहिते..
कोंडलेले तर श्वास लिहिते..
जायचे आहे लांब आता !
हाच उद्याचा प्रवास लिहिते..
कविता, गझला, लिहिताना मी,
साजणाचा ही भास लिहिते...
फुलला मोगरा अंगणी जर,
पसरलेला तो वास लिहिते..
भुकेल्यांसाठीच केवळ!
तोंडातला मी घास लिहिते..
प्रगती खुंटली जर का इथे,
नंतर नव्याने ध्यास लिहिते..
दौलतीचा त्या माज नाही,
झोपडीला ही खास लिहिते..
©समीक्षा भुसारी✍
-
वो शजर के परिंदे अब शजर से निकल गये..
तुझे चाहने वाले ना जाने किधर से निकल गये..
महज़ तेरे आने से इतना कुछ बदल गया..
की,सफर में रहने वाले लोग भी सफर से निकल गये..
©समीक्षा भुसारी ✍-