काळजात असे जरी खोल दरी
रोज अनेक जरी तो स्वप्न गिळतो
हृदयात साठवुन ते सारे वेदांत
जगास सौम्य तो जाणवतो
स्वतःच रडतो स्वतःच सावरतो
जणु वाटसरू निर्जन स्थळातील
स्मीत रोखुनी ईर्ष्येस खांब देती
जड जखमी पोलादी अश्रृ नयणातील
वाट पाहणे पाहत राहणे
मिळतो का यात स्वप्न कधी
पण आस ती लोचणाची संपणार कशी
ओघळणाऱ्या अश्रृंची ती एक वाहती नदी
Madhuri P. Warwatkar
-
खोल काळजाच्या दरीत
गडद दाटला काळोख आहे..
हाक इथे मारू कुणास
टपले सारे जाळण्यास आहे..
हात देण्या कुणी ना जवळी
सारे मूग गिळून आहे...
भंगलेल्या स्वप्नांचा इथे
लोटला महापूर आहे...
इच्छा आकांशा बंदिस्त बासनात
निजल्या त्या शांत आहे...
आठवांचा धूर अजुनी
स्त्रवतो नेत्र आहे...
गतकाळाचा गुंता सुटता
अडकलो त्यात पुरता आहे...
काळजाच्या खोल दरीत
पुरता मी डुबलो आहे.... Savita BK-
तर ती स्वच्छ विचारांनी भरून काढ..
ती रिकामी ठेऊ नको कोणीतरी असेलच जो ती दरी पोखरण्याचा प्रयत्न करेल..-
चुकतो गं माझ्या
काळजाचा ठोका...
जेव्हा मिळत नाही मज
तुला भेटण्याचा मोका...
-
काळजात असे खोल दरी
जखमांच्या वेदनांनी भरलेली..
वरवर हसू जरी चेहऱ्यावरी
कोसळत्या नयनी अश्रूंच्या सरी..
मनात साठलेल्या बंदिस्त जरी
भावनांचा सागर दाटे उरी..
स्मरणी त्या नित्य एकांती
तुफानी नाव कशी नेऊ पैलतीरी..
काळजातली दरी भासे
का अशी मृगजळापरी..
हसू नी आसू च द्वंध्व
चाले नित्य जीवन वाटेवरी..
-छाया वांगडे (सावली)
-
त्यात गुंतलेली विचारांची खळीं
तेथे दुःख दाटले जंगली, वृक्षा परी
सुख तेथून पळवाट काढूनी पळी
दगड ठेवता नाजूक काळजा वरी
काट्या प्रमाणे ते हृदयात सळी
क्षणो क्षणी खोल होई ,ती दरी
पण, हृदयात खुलते कुठेतरी उमंग कळी-
काळजात असे खोल दरी
कळेना तिची खोली
खोली शोधताना तिच्यातच अडकले
माघारी परतण्याचे विसरुनच गेले .-
काळजात असे खोल दरी !
हिंडतो आहे मी जिच्या किनारी !!
घालून पालथ्या कड्याकपारी,
शोधण्याला हरवलेल्या माझ्याच आत्म्याला,
माझ्याच अंतरी !!!-