प्रेमाचा सुगंध पुन्हा एकदा मातीतून यावा
प्रेमाचा पाऊस आज माझ्यावर हि पडावा
प्रेमाच्या पावसात मीही व्हावी ओलेचिंब
प्रीतीचा मिळाला आज मला एक नवा रंग
माझ्यावर प्रेम करा असं म्हणता येत नाही.
कारण म्हटल्याने असं काही होत नाही….
मागून नाही मिळत प्रेम, प्रेम वाटावं लागतं …….
ध्यानी मनी नसताना अचानक भेटावं लागतं………
माझ्या गीतांमधे तुझा सुर असावा..
माझ्या आश्रुंना तुझ्या स्वप्नांचा बांध असावा..
प्रेम तर काय सगळेच करतात,
प्रेम जगणारा असावा..-
👑👑Only RCB👑👑 play bold
A big fan of virat kohli 💫
माझे बाबा,
वडील , शिक्षक , संशोधक, मुलगा, भाऊ पती एवढ्या जबाबदाऱ्या पार पाडत आज उंच शिखरावर आहेत . जबाबदारीचे ओझे सर्वांच्याच डोक्यावर असते... but your are special one pappa....तुम्ही बाबा असता तेव्हा जगण्याचे धडे देता.. तुम्ही शिक्षक असता तेव्हा ज्ञानाचे धडे देता.. पण ज्यावेळेस तुम्ही आमचे मित्र बनता तुम्ही आम्हाला आयुष्यातील सर्वात सुखी आणि आनंदी क्षणांची ओळख करून देता.. माझं आयुष्य शेवटच्या क्षणाला असताना तुमच्या जिद्दीने माझी विझलेली ज्योत पुन्हा पेटली. मला काही होणारच नाही तुमच्या या विश्वासाने जणु काही मला नवा जन्म मिळाला. 24 वर्षे जपलेली लेक जेव्हा सासरी जात होती तेव्हा तुमच्या डोळ्यातील अनावर झालेल्या अश्रुंना माझ्या हृदयाने पाहिले होते. आयुष्यात काही नाही जमले तरी चालेल पण तुमच्या सारखं बनायचं आहे. तुमच्यासारखच दुःख आणि आनंद यांना एकत्र घेऊन जगायला शिकायचंय...-
My birthday partner 😍😍
My twin sister..
Part of my life..
Happy birthday to my dear sister NITA
and God bless you
And also happy birthday to me🤪🤪
20/05/2005-
मैत्री
जिच्याकडे मिळतो मायेचा आधार,
त्या मैत्रीचा कधीच होत नाही भार.
अशीच एक दिवस मिळाली गायत्री,
तिच्यामुळे खुलली आमची मैत्री.
मैत्रीतून घ्यावी प्रेरणा असे म्हणता म्हणता मिळाली एक प्रेरणा,
तिच्यामुळे अर्थ मिळाला मैत्रीच्या भावनांना.
मैत्रीची फुले बहरत असताना मिळाली एक पूजा,
तिच्यासोबत मैत्री फुलवायला सोबत आली ॠतुजा.
या प्रवासात आधीपासूनच सोबत होती ती म्हणजे निता,
काहीही म्हणा पण मैत्री म्हणजे आयुष्याचा अर्धा वाटा.-
माझ्या असण्याचे सगळ्यात मोठे कारण तुझा आत्मविश्वास..
माझ्या आयुष्यातील प्रत्येक वळणावर तुझा आत्मविश्वास सर्व संकटांना पुरून उरलाय...
एवढी शिकलेय पण तरीही अडाणी बनतेस आणि एक पोळी मागितली की दोन देतेस...
कधी रागवतेस , कधी ओरडतेस, पण जे काही करतेसना ते सगळे प्रेमाने करते..
आयुष्यात आयुष्य बदलून जाईल अशी अनेक वळणे आली ,पण तु होतीस म्हणून मी आहे.
असो,
शेवटी आई ईश्वराचेच रूप मग आपण कोण ईश्वराबद्दल लिहणारे....
आई पुन्हा एकदा वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!
भेटूया आज....
-
आत्मविश्वासाच्या पंखांमध्ये,
गरूडाएवढी शक्ती असावी.
कल्पनेच्या गगनभरारीला,
विचारांची ओढ असावी...💯💯-
आने वाले साल के हर
पल special नही हांगे|
अन्हे special बनाना होगा |
सिर्फ special नही बनाने है ,
बल्की वो पल जिने भी है |
नए साल की नई बधाईया।
सिर्फ़ खुशीसे नही दिलसे भी
Have happy new year💐.....
-
आज पावसाला पण मस्त रंग चढलाय,
जणू काही तोही कोणाच्या तरी प्रेमात पडलाय..-
And... the end of the special golden era ..
We truly misses you abddd..-