हे कान्हा...
कातरवेळी उनाड वाहे हा सांजवारा
आठव येता तुझी माधवा
थरथरून देह होई सावळा सारा...-
कित्येक दिवस
बंद मनाचं
कुलूप आज फोडलं
दडवून ठेवलेल्या शब्दांना
उनाड वाऱ्यासंगं
खेळायला सोडलं..!!-
मैत्रीच्या उनाड वाटा
धुंडाळून पाहाव्या जरा
मैत्री असो खरी वा खोटी
वाटा मात्र खऱ्या.-
उनाड मनाला ह्या
समजावून किती
वाट पाहिली कितीही
तरी बहरत नसते वाळकी काटकी-
वाटते मज होऊनी उनाड जगावे
न देखिल्या ज्या वाटा त्या चालावे
होऊनी भटकं नित्य भटकत राहावे
दूर दूरच्या चाली रितींचे ज्ञान घ्यावे
भटकावे कधी उंच डोंगरात
टेकावे मस्तक कधी मंदिरात
हरवावे कधी गर्दगार झाडांत
विसरावे स्वतःस निसर्गसहवासात
पहावा हर नजारा नव्या नजरेने
साठवावा तो नव्या आठवणीने
घ्यावा बोध घडलेल्या दर कृतीने
आयुष्य जगावं बेभान आपल्या मर्जीने...-
उनाड पाऊस....
येऊन निघून जातो....
त्याला काय माहीत की
मनातला कल्लोळ...
थांबतच नाही....-
शाहिर तुमच्या उनाड मधील कवितातील
प्रत्येक शब्द खरा ठरतोय...
मुकद्दर महाराष्ट्र भर पोहचवण्यासाठी
प्रत्येक शिवाजीलोक दिवस-रात्र एक करतोय...-
उनाड पक्षी
मुक्त विहरतो उनाड पक्षी
तोलीत हिरव्या रानाची नक्षी
सुसाट धावे निळ्या जळावरी
बंध मुक्त जिवन स्वच्छंदी ...
फांद्यावरले मस्त झोके
मधुर रसाळ गोड फळे
स्वैर विहरणे त्यास नडले
पाऊल पिंजऱ्या माजी अडले...
गजांच्या आडून गवसतो
आभाळाचा निळा तुकडा
नेहमीच मग सतावतो
अफाट आकाशाच्या गाभा...
कधी मनाशी चंग बांधुनी
घेऊ पाहते ऊंच भरारी
स्वप्नवत भासे ते कितीही
मनात आशा भोळी भाबडी...
सुषमा...
-
अंतर....
जगता आयुष्य सुखाचं अस. गोड प्रसंग येऊन जातात
आठवणी भल्या मोठ्या काही मनामध्ये देऊन जातात
येता अंतरे नात्यामध्ये नाती सगळी संपून जातात..
प्रवास होता थोडाच काही असा प्रश्न देऊन जातात..
अंतराच्या ह्या खेळामध्ये विजय माझा नेहमी होता
ठरवणारा चूक मला माझा च कोणी आपला होता..
स्वार्था च्या जगामध्ये प्रेम करणारे कमी होतायत।।
अंतर आणून नात्यांमध्ये पळून जाणारे भरपूर होतायत...
अंतर असतील छोटी काही पण असतो डोंगर दुःखाचा..
सुखाच्या त्या खेळाचा .. आपल्यानी च दिलेल्या त्रासाचा..
अंतरावर अश्या काही जास्त मी बोलत नाही.. असेल अंतर नाशिबिच माझ्या म्हणून जास्त बोलत नाही..
उनाड मन......
◆ पवनकुमार कांबळे-