Sushama Vernekar   (सुषमा)
42 Followers · 7 Following

Joined 3 April 2019


Joined 3 April 2019
10 JUN 2021 AT 21:32

थेंब टपोरे झेलीत हासे
पानावरल्या सतेज रेषा
तयावरुनी सहज धावे
दवबिंदूंच्या मौतिक माला...

सुषमा...

-


10 JUN 2021 AT 17:08




सखे सोबती ते
आप्तबंधु जीवाचे
अवेळी सुटती
हे बंध रेशमाचे....४

गळाभेट नाही
दृष्टीसही पारखी
चालली एकाकी
आयुष्याची पालखी....५

सुषमा....


-


10 JUN 2021 AT 16:54

ऑनलाईन शिक्षण कठीण फार
रात्र होई थोडी नी सोंगे अपार ||

स्मार्टफोनसाठी करती धडपड
वंचित जीवांची होतेय तडफड
समान शिक्षणाची लागली वाट
निरोगी जीवनाची फुटेल का पहाट
सामाजिक आर्थिक दरी अपार....
रात्र होई थोडी नी सोंगे अपार ||

बंद खोली एकटेपणाचे ओझे
एकाग्रतेची तर उणिव भासे
मन कधी रमले तर जाते लाईट
वायफाय नाही तर हवा टाईट
मर्यादित डेटापॅकची झंझट अपार....
रात्र होई थोडी नी सोंगे अपार ||

आदान प्रदानाचे अपुरे ज्ञान
नियोजन पध्दतीचा पुरता अभाव
समजलं किती काही उमजत नाही
शंका समाधानाला वेळ उरतच नाही
बनून एकलव्य घ्या कष्ट अपार....
नव्या मंत्राचा करुया अंगिकार ||

सुषमा...


-


28 MAY 2021 AT 20:12

तू असता तर गीतांना या अर्थ लाभला असता |
उन्हाळ्यात मग श्रावण मेघ बरसला असता ||

तव हातातूनी हात अचानक नसता सुटला
संकटातही हासत हासत मार्ग काढला असता ||

तू इतक्या सहजी हार मानली नसती तर का
नवे सूर छेडीत नव्याने डाव मांडला असता ||

मौना मधले दुःख तुझ्या जर का कळले असते
चक्रव्यूह तो नियतीचा लिलया भेदला असता ||

उमजे अर्थहीन जरतर धागे तरी विणते
दैवगतीचा फेरा जर का थोडा चुकला असता ||
तू असता तर गीतांना या अर्थ लाभला असता ....

सुषमा...
(२७ / ०५ / २१)

-


30 APR 2021 AT 12:40

शोध लागेल स्वानंदाचा
नव्या प्रश्नांच्या उत्तरांचा
स्वतःची नवी ओळख पटण्या
झाड आनंदाचे लावायचे दारी
संघर्षात असते गंमत न्यारी..

सुषमा...
( झाड आनंदाचे १४/१०/२० )

-


8 JAN 2021 AT 20:12


गरज आहे माणुसकीची
मायेच्या ओलाव्याची
आपुलकीच्या ओढीची
हळूवार फुंकर धीराची...

सुषमा...

-


21 DEC 2020 AT 17:10



curiosity create your imagination
with various colours,
magically fabulous wings ,
emotional sounds
whisper music
become fantastic
deep thoughts
sorow & happiness
mood swings
depending our
experience shows
like a lovely movie
which one where you
played various roles
that's why the
curiosity makes movie

Sushama...

-


20 DEC 2020 AT 21:05



मराठीच्या गोडव्यात
नादावतो परिसर
भावनांच्या कुपीतले
शब्द शिंपीते अत्तर...

मायबोलीचा नखरा
लय सांभाळीते अर्थ
स्वरतालांनी सजतो
भाषेतला गर्भितार्थ...

सुषमा...

-


6 DEC 2020 AT 17:53



क्रांतीचा दीप अवेळी विझला
अन वेदनांचा गाव मागे राहिला ॥

शीतल वाऱ्याची वाट वेगळी
करारी बाणा जिद्द ही निराळी
तिमीरातल्या या वाटेवरती
लाविल्या असंख्य नूतन ज्योती
जगण्याची उमेद देता देता
सक्षम सेवेचा वसा हरपला .....
अन वेदनांचा गाव मागे राहिला ॥

नव्या दमाची पल्लवित आशा
निराशेच्या का गर्भात लोपली
उदात्त ध्येय उत्तुंग भरारी
घेता छाटते पंख का नियती
प्रश्नांकित गहिवरली मने
बोलती ध्रुव तारा निखळला....
अन वेदनांचा गाव मागे राहिला ॥

सुषमा...

-


28 NOV 2020 AT 20:48

कल्याणकारक असे पावनी
गुणकारी आरोग्यदायीनी
अशी प्रिय सखी संगीनी
फुलारली माझीया अंगणी....

कृष्णमंजीरी पवित्रगंधा
अनेक नामी हरीप्रिया
सांजवात लाऊनी वंदिते
संस्कृतीच्या अचररूपा.....

सुषमा...

-


Fetching Sushama Vernekar Quotes