जिनके दिल सच्चे होते हैं...
वो अपने जीवन में शामिल....
हर रिश्ते की जिम्मेदारियां...
पूरे मन से निभाते हैं...
बावजूद इसके,
दुखी भी सबसे ज्यादा वही रहते हैं..
और अंत में उनके लिए...
सच और झूठ का निर्णय करना भी...
बहुत मुश्किल हो जाता है...
सत्यता और उपयुक्त समर्पण के साथ..
जुड़ा व्यक्ति आखिर में ठगा सा रह जाता है...
यही इस दुनिया की रीत है।।-
आयुष्यात कदाचित सगळे निर्णय हे
आपले नसतात..
काही निर्णय हे वेळ आणि परिस्थितीचे
हि असतात...!-
प्रश्न ....?
फार वेळा काय होत.. प्रश्न कोड थोड अवघड होत..
कोणी नदीच्या काठावर.. कोणी शांत ओठावर..
शांत पाण्याच्या लाटेवर, खोल मनाच्या घाटावर..
पण जोर नेहमी मनावर..
मग हा शोध कसला कोणावर..?
फक्त आणि फक्त मनावर..
एक अश्या वेड्या मनावर..जोर ना त्याचा कोणावर..
भावना मात्र ओठावर.. शांत बोलक्या डोळ्यांवर..
आता प्रश्न एक त्याच्यावर..?
शांत पणा हा तुझा सारा.. का ? कश्यासाठी? कोणावर?
एका मागे एक प्रश्न. रोज नेहमी त्रस्त करतात..
शोधतो जेव्हा उत्तर मी.. प्रश्ना मधेच व्यस्त करतात..
विचार करून नेहमी मी .. छोटा एक प्रयत्न करतो..
शोधेन आज ही उत्तर म्हणून.. नवीन प्रश्न घेऊन येतो..
प्रयत्न माझे नेहमी असे चालू आणि चालू च असतात..
बंद पडली उत्तर जरी.. प्रश्न मात्र चालू च असतात..
फार अश्या या प्रश्नांवर मी आता एक तोडगा घेईन..
सोडून अपेक्षा जगण्याचा मी मार्ग थोडा वेगळा घेईन..
विचार करून चाललेली वाट.. फार काळ टिकत नाही..
रस्ता असतो मानतच.. पण मार्ग त्याचा मिळत नाही..
विचार करून चालन अस , फार काळ टिकत नाही..
प्रश्नांच्या च्या ह्या जाळ्यामधून , उत्तर माझं सुटत नाही..
प्रश्न उत्तरांची ही स्पर्धा बाक्की, आज पर्यंत संपली नाही..
सोडून अपेक्षा जगलो जेव्हा.. तरीही प्रश्न सुटली नाहीत..!
- पवनकुमार कांबळे•
-
वाटलं लिहावं काहीतरी कित्ती दिवस झाले
मन भरून आलं असे कितीतरी पाऊस गेले
भरून आलं मन तरी ते पावसाबरोबर वाहिलं नाही
असे म्हटलं तरी चालेलं कारण पाऊस सोडून, त्याला कोणीच पाहिलं नाही
तो पडतो जेव्हा धोधो तेव्हा काळजाचा ठाव घेतोच
आठवणीतलं मनातलं तो आपल्याबरोबर नेतोच
रिमझिम टपटप धोधो आणि सरसर
कित्तीतरी रूपं त्याची सारी तशी सुंदर
मला मात्र भावतं त्याचं धोधो पडणं
हातच काहीच नं राखता थेट जाऊन भिडणं
त्याच्या येण्याबरोबर जाग्या होतात साऱ्या स्मृती
आठवतात काही जोडलेली तर काही पुसट होत गेलेली नाती
वाफाळलेला चहा, कधी सोबत कवितेचं पुस्तक
तर कधी नुसत बसून त्याला न्याहाळायचं एकटक
गरम भजी वडा आणि मित्रांसोबत केलेली धमाल
तर कधी गाणं ऐकताना त्यावर सहज धरलेला ताल
उडालेली तारांबळ कधी जवळ नव्हती म्हणून छत्री
तर आठवणीतली संध्याकाळ कुणासोबातची जवळ एकच होती जेव्हा छत्री
कित्येक क्षण दिलेत त्याने भरभरून जगण्याचे
रोजच्या व्यापातून स्वतःला थोडं वेगळ काढून बघण्याचे
काही म्हणा तो आहेच वेगळा नाहीतर असतातच कि हिवाळे अन उन्हाळे
पण अनुभव किती हे सांगायलाही म्हणतातच ना " मी पाहिलेत इतके पावसाळे"-
पाऊसात भिजताना पाऊस बनून जावं
आपण कितीही कोरडे असलो
तरी पाण्यासारख वहाव
वाहून न्याव्यात कधी कागदाच्या बोटी
बरसण्यासाठी मिळतात नाणीही खोटी
कधी असच छोट्या सुखासाठी झगडावं
पाऊसात भिजताना पाऊस बनून जावं
अंगणी चिखल होतो कधी कधी
पण त्यामुळेच बहरतात पेरलेली दाणी
कधी येतो पूर, कधी वाहून जातात गायी
पण समतोलासाठी कधी अस पण करावं
पाऊसात भिजताना पाऊस बनून जावं-
जिन्दगी वही के वही खडी है,
किसी के कीसी की कुछ नही पडी है,
कुछ हसीन पल आते है एहसास जताने ने के लिए,
प्यार के नाम पर विश्वास जताने के लिए,
खत्म हो जाता है एक पल मे जब रीश्तों का व्यापार हो जाता है,
कीसी पे जताया हुवा विश्वास जब अहंकार मे बदल जाता है,
हमे लगता है की शायद ये जिन्दगी की सबसे बुरी घडी है,
फीर एहसास होता है की जिन्दगी वही के वही खडी है,
किसी को किसी की कुछ नही पडी है-
बाकी सगळ मस्त आहे...
स्वच्छ निखळ मन असा.. आज थोड ..
गंभीर आहे..
प्रश्न आहेत त्याचे च काही.. ज्याच उत्तर काहीच नाही...
सोडले विचार.. सारे जरी.. भावना मात्र सुटत नाहीत..
भावनांच्या ह्या गोंधळाला.. वळण नवं भेटत नाही..
सोडल्या जरी भावना साऱ्या.. बाक्की थोड ठीक आहे..
पण पाहिजेत भावना जागेवर ह्या.. नाहीतर..
बाकी सगळ मस्त आहे....
रोज नव्या विचाराने.. नवीन एक गोंधळ उडतो..
विचारांच्या या लढाईत.. मीच माझ्या मनाला भिडतो..
मिटला जरी गोंधळ सारा.. लढाई ही संपणार नाही..
भिडतील विचार पुन्हा मानला.. खेळ हा संपणार नाही..
माझ्याच माझ्या विचारांनी आज मी अस्वस्थ आहे..
सोडले जर मी हे विचार तर. बाकी सगळ मस्त आहे..
तयारी ही माझ्या मनाची .. फारतर थोडी गंभीर आहे..
सोडली जर तयारी तर.. मन पण मोकळं मंदिर आहे..
सोडल्या जरी भावना साऱ्या.. बाक्की थोड ठीक आहे..
पण पाहिजेत भावना जागेवर ह्या.. नाहीतर..
बाकी सगळ मस्त आहे....
-
जन्म हा थोडा चुकल्यासारखं वाटतो
गणगोत इथला परकाच वाटतो..
चुकीची मी मागून क्षमा..
स्वतःच मोठा लाचार वाटतो..
मी त्रस्तो, दुखावतो, आणि पडतो.. पण त्यातून च नवीन पुन्हा घडतो...
पडून घडण आणि घडून पडण फारस आता जमत नाही..
खुश राहण्याच नाटक मला जास्त आता जमत नाही..
उमले हसू ओठांवरती.. अतरंगी ही मी फार वाटतो..
खऱ्याखुऱ्या जगात मात्र, फैल एक कलाकार वाटतो..
लाचार हे आयुष्य बेकार मज वाटते
कन्हत रोज जगणे आता नको नको वाटते
मी चालोय एक प्रवासी, रस्ता तो चुकीचा वाटे..
मुकाम जे लाभले तो गाव एक उपकार वाटे..
आधार मी शोधला ते घर मला बंधिस्त वाटे..
अस्वस्थ ह्या वाटा जणू आणि मी एक मुसाफीर च वाटे..
आयुष माझे मला आता शत्रू समान झाले आहे..
आयुष वाटणारा देव तो कुठे तरी चुकला आहे..
गुंडाळून मी पाप माझं .. कसा जाऊ समजत नाही..
होऊन असा लाचार मी कसा जगू समजत नाही..
प्रश्न पडणाऱ्या देवा मला . थोड तरी समजव रे..
चुकलेली ही वाट माझी...,तुझ्याकडे वळव रे.. तुझ्याकडे वाळव रे..!
घेऊन तुझ्या जवळ तरी.. तु मला समजव रे..
वाटताना तु आयुष्य खरच कुठे चुकलास का..
आयुष्य देऊन मला तु.. खरच कुठे चुकलास का ?-
शांत निळ्या आकाशाला गडद उन्हाळा कसा सोसतो..
दिवसा लख्ख प्रकाशात चंद्र कुठे लपून बसतो..
लपून बसलेला चंद्र हा.. रात्री कुठून हळूच निघतो..
लख्ख त्याचा प्रकाश घेऊन.. पाहून तुला हसत बसतो..
तो भगतो.. तो निखरतो.. समजून सारी कहाणी तो..
गप्प मध्ये रुसून बसतो.. वेळ गेला की निघून थोडा,
पाहून तुला हसत बसतो...
रम्य अश्या सायंकाळी.. सोबत तुझी हवी वाटते..
असलीस सोबत तु म्हणजे.. सायंकाळ धुंद वाटते..
हात हातातले सोबत जणू.. जसा भकम्म सेतू जणू..
मळलेल्या या वाटेवर मग, सोबत तुझ्या चालव वाटत..
राहून नेहमी सोबत तुझ्या.. प्रत्येक सायंकाळ जगावं वाटत..
सायंकाळ ची ह्या जणू , खुप च वेगळी गोष्ट आहे..
सोबत असतेस जेव्हा तु.. त्यात आपले पणाची चव आहे.
राहून निरंतर सोबती तुझ्या. प्रत्येक स्वप्न पूर्ण करीन..
शेवट दिवसाचा गोड म्हणून, एक सुंदर सायंकाळ करीन..
प्रत्येक अशा सायंकाळी.. सोबती तुझा होऊन जगीन..
पंती होऊन तुझ्या साठी.. प्रकाश देऊन जळत राहीन..
वाटला कधी अपूर्ण दिवस तर.. मरून तुझी सायंकाळ होईन...!-
खरच आपलेपण असता का रे.....
देव होऊन तु दगड रुपी रोज थोडा तु झिजतोस रे..
चालव ून सारा संसार गाडा.. तु का नाहीस थकतो रे..
विचार कर तु थोडा थांबून.. जो तु गाडा हकतोस रे..
दगडा सारख्या मनाला तु माणूस म्हणून भगतोस रे..
संसाराच्या गाडी ला तुझी म्हणे साथ आहे..
माणूस काय मग कामाचा स्वार्थापोटी गाठ आहे..
अश्या स्वार्थी मनातून निष्ठा तुझी काढून घे..
का घेतो मनावर तु चेष्टा तूझी मानून घे..
बस देवा थोडा शांत हो.. मोहातून तु लांब हो..
मोह एका मनाचा.. मी पणातल्या पणा चा..
माणसाकडून माणूस देवा.. खरेपणाची अपेक्षा ठेवतो..
बघ एकदा पडताळून.. स्वार्थ पोठी तुझा मान करतो..
मतलाबाच्या दुनियेत देवा .. तु कशाला रस घेतोस..
पाहून सार वरून काही.. चिंते चा तु श्वास घेतोस..
चल देवा मनाकडे.. भरपूर बोलो मानवा कडे..
बघ देवा मना मध्ये किती मोठा बाजार असतो..
असतात बर आपलेच सगळे.. पण मना मनाचा व्यापार असतो...
व्यापारात ह्या भल्या मोठ्या .. स्वार्थी भावना विकतात म्हणे
स्वार्था समोरच देवा .. स्वार्थी भावना खपतात म्हणे..
स्वार्थी अश्या बाजारात माणूस पण असत का रे..
जगात कुठे तरी कोपऱ्या मध्ये ..
आपलेपण असत का रे.. आपलेपण असते का रे..
-