Tejaswini Mhatre   (...तेज...⚡)
49 Followers · 23 Following

read more
Joined 27 April 2020


read more
Joined 27 April 2020
21 JAN AT 18:11

धडपडलो कितीही चालताना तरी
कोणाची वाट न बघता सावरावं लागतं
आपल्या अपेक्षा, आपलं मत, अन
आपल्या विचारशक्तीला आवरावं लागतं

-


21 JAN AT 17:56


अबोल भावना हाताळताना
मन मारून झुरत जगताना
कुठेतरी मनात खुणावते
ही पुन्हा जगण्याची आस

आपले परके ओळखताना
आपणांकडूनच दुखवताना
कोणीतरी मनात जागवते
ही पुन्हा जगण्याची आस

विचारांच्या गर्दीत हरवताना
अंधार भवताली दाटताना
मध्ये अचानक सापडते
हे पुन्हा जगण्याची आस

-


16 JUL 2024 AT 20:25

चैतन्याची प्रचिती येते पांडुरंगा ठाई
नजरेत साठते रूप विठ्ठल रखुमाई
विठ्ठलाची ओढ साद आर्त अंतरी जाई
रामकृष्णहरी गजर गाजला दिशांत दाही

तुझ्या कृपेने राहो घरदार सुखी
तुझ्याविना आहे सारा संसार दुःखी
तुझ्या भक्तीची ओढ ही अनोखी
माऊली तुझे नाम सदा राहो मुखी...

-


26 MAY 2024 AT 14:06

पुन्हा जगण्याचं कारण सापडले
कदाचित म्हणून मन इतके बावरले
गुंतण्यात तुझ्यात इतके सरसावले
आधी तू की मी माझे मीपण विसरले

माझ्यासवे तुझं असणे आवडू लागले
मन उगाच तुझ्याभोवती घुटमळू लागले
तुझ्या असण्याने मन माझे उभारले
तुझ्यासोबत जगण्याचं कारण सापडले...

-


7 MAR 2024 AT 9:26

कोरी राहू लागली वही
सुचेनाच आता काही
शब्दांत भाव उरले नाही
मनात ही खंत सतत राही

कोरी राहू लागली वही
मनाचा ठाव कोणास नाही
यात अन त्यात गुंतत राही
प्रवाहा सोबत वाहत जाई

-


25 JAN 2024 AT 9:53

माझं भाग्य समजू की तुझी पुण्याई
आजच्या दिवशी लाभलीस तू मला आई
मला जन्म देताना तू किती कळ सोसली होतीस
पहिल्यांदा माझ्या रडण्याने तू हसली होतीस!

तुझ्या असण्याने होते घराला घरपण
आठवते सतत तुझ्या सोबत चे बालपण
तुझ्या आशीर्वादाने आज घडले मी
सांग कसे फेडू आई पांग तुझे मी!

या जगात "आई" हे आहे एक वरदान गं
पण माझ्याच वाट्याला का अधुरे हे दान गं
खरं तर खूप काही करायचं राहून गेलं तुझ्यासाठी
पण वाटते...
तू आजही जिवंत आहेस माझ्यात माझ्यासाठी...🥺

-


13 DEC 2023 AT 7:39

कमीत कमी शब्द आणि मनभरून भाव
मिळेल का कधी माझ्या भावनांना वाव
कधी कळेल का माझ्या मनाचा डाव
कधी गवसेल का मला स्वप्नानांचं गाव..||

कमीत कमी वेळ आणि स्वप्न मोठी
स्वप्नांना साकारायची ही कसोटी
गर्दी विचारांची अन वाट छोटी
व्हावे सारे मनाजोगे ही आस मोठी||

कमीत कमी एवढं तरी कळावे
माझे मन माझ्याजवळच रहावे
गुंतता भावनात वळून फिरावे
माझ्याच जगण्यात मी हरवून जावे ||

-


3 NOV 2023 AT 23:56

नसे घरट्यात पिल्लू
होते बावरे पाखरू
सांग ना ग आई तुझ्याविना
मी कसे मज सावरू...

नसतेस जेव्हा तू घरात
नजर होईना ग शांत
तुला हाक मारायची
ईच्छा होते ग आर्त

तुझ्या सहवासाची
ओढ वाटते ग खूप
तू गेलीस मात्र दूर
दाटला अंधार गुडूप

नाही करता आले मला
आई तुझ्यासाठी काही
तुझ्या अपूर्ण स्वप्नांसाठी
मन माझे मलाच खूप खाई

आजही जाणवते तुझी कमी
मला त्या प्रत्येक क्षणाक्षणाला
तु नसतेस तिथे माझे लाड करायला
कसं सांगू काय यातना होतात मनाला...🥺

-


3 JUL 2023 AT 18:36


गुरु शिवाय ज्ञान नाही
ज्ञानाशिवाय मार्ग नाही
मार्गाशिवाय लक्ष्य नाही
लक्ष्याशिवाय प्रगती नाही
प्रगती शिवाय संपत्ती नाही
संपत्ती शिवाय मान-सन्मान नाही
सन्मानशिवाय समाजात नाव नाही
नावाशिवाय तुमच्या कार्याला वाव नाही
वाव नाही तिथे तूमच्या असण्याला किंमत नाही
अन असं निरस आयुष्य जगण्याला काही अर्थ नाही...
🙏🏻........शेवटी गुरु शिवाय काही नाही......🙏🏻

-


26 JUN 2023 AT 18:45

भेटीस तुझ्या पांडुरंगा
जीव हा आसूसला
ओढ लागली मनाला
तुझा हा रंगे सोहळा

रूप तुझे दिसे चराचरी
मी तुझी भक्त बावरी
करते तुझी मनात वारी
माऊली तुझ्याविण कोण तारी

-


Fetching Tejaswini Mhatre Quotes