QUOTES ON #आपण

#आपण quotes

Trending | Latest
11 JAN 2020 AT 9:59

"आपण " शोधलं पाहिजे स्वतःला,
जीवनात तुझ्यापासून, ते माझ्यापर्यंत.
आपण शोधलं पाहिजे स्वतःला,
माझ्या डोळ्यातील, तुझ्या नजरेपर्यंत.
आपण शोधलं पाहिजे स्वतःला,
माझ्या मनातील, तुझ्या विचारापर्यंत.
आपण शोधलं पाहिजे स्वतःला,
माझ्या अश्रू पासून, तुझ्या हसण्यापर्यंत.
आपण शोधलं पाहिजे स्वतःला,
माझ्या कल्पनेतील, तुझ्या प्रतिमेपर्यंत.
आपण शोधलं पाहिजे स्वतःला,
माझ्या हातातील, तुझ्या रेषेपर्यंत.
आपण शोधलं पाहिजे स्वतःला,
माझ्या हृदयातील, तुझ्या भावनेपर्यंत.
आपण शोधलं पाहिजे स्वतःला,
माझ्या कवितेतील, तुझ्या शब्दा पर्यंत.
आपण शोधलं पाहिजे स्वतःला,
माझ्या पुस्तकातील, तुझ्या पानापर्यंत.
खरच, "आपण" शोधलं पाहिजे
एकमेकांना... 😊😇





-



तुला नाही
मला नाही
'आपण' दोघांना
शक्य नाही,
असे जगात
काही नाही.

-


11 JAN 2020 AT 9:46

आपण असणे हीच आपुलकीची जाण खरी
माणूसकीला शोभुन दिसते "आपण" कमान बरी

मी मी करण्यापेक्षा आपण म्हणने बरे
पहा कसे सहजच फ़ुटतिल आपुलकीचे झरे

मी म्हटले त्याने गर्व संचयित केला
स्वताजवळ त्याच्या फ़क्त स्वाभिमान वाचला

जगलॆ स्वतासाठी मी तर जगलॆ मी काय
दुख कुणाचे न समजने ती संवेदनाच नाय

उचला खऱ्या आता आपुलकीच्या मशाली
ना जात ना धर्म सांगू ,सांगू भारतीय ओळख आपली

-


11 JAN 2020 AT 12:10

आपण सर्व yq वरचे मित्र,मैत्रीण
एकदा सहलीला जंगलात जाऊ..
सकाळचा नाश्ता एकत्र केल्यानंतर
दुपारचे जेवण वाघ,सिह बरोबर करू..
😂😂😂😂😂😂😂😂😂

-



आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार,
स्वतःला कमी लेखण्याचा करू नका कधी विचार,
कारण प्रयत्न आणि सरावाने प्रत्येक,
स्वप्नं करू शकतो आपण साकार...
सुरेंद्र बाविस्कर...✍️✍️

-


12 AUG 2020 AT 9:12

प्रीत तुझी माझी अशी असावी जणू
अग्निज्वाळांनी आपण अंतरिक्षात
अखंड लिहीत राहावी

-


11 JAN 2020 AT 17:38

आम्ही दोघ 👫
तो 👨‍💼 आणि 👩‍💼 मी
दोन 💖 वेगवेगळी 💖 मनं
पण दोघांच शब्दांवर ✍ 😘 प्रेम मनापासुन
स्वर, 🎵 संगीत 🎶 दोघांचा जीव कि प्राण ♥️
जुळले विचार, कवितेतून जुळलं मन 💞
तो 👨‍💼अन् मी 👩‍💼
क्षणात दोघांचे 👫 झालो आपण. .💏

-


11 JAN 2020 AT 11:23

ज्या उदरातून जन्मतो।त्यात तिलाच मारतो।
दोषारोप मात्र करतो।मानव आपण।।

माणुसकीला लाथाडतो।वैशिहैवन बनतो।
अब्रूची लक्तरे टांगतो।मानव आपण।।

सुजनाचा आव आणतो।अंतरी कावा रचतो।
सैतानाचे रूप घेतो।मानव आपण।।

बंधने सारी घालतो।वर्चस्व त्यावर गाजवतो।
शूद्र साऱ्यांना लेखतो।मानव आपण।।

सृष्टीचा ऱ्हास करतो।मृत्यूची संकटे ओढवतो।
दैवास कोसत राहतो।मानव आपण।।

मानवता धर्म विसरतो।दिन,दुबळ्यावर हसतो।
मदतीचे ढोंग करतो।मानव आपण।।

-


11 JAN 2020 AT 11:16


आपण मध्ये मीपणा नसतो
म्हणून आपण असतो त्यात मीपणाचा लोप असतो

आपणात सामावत विश्व
मीपणात असतं विष गर्वाचं

आपण आपल्या जगाचे शिल्पकार
मीपणात असतो अहंकाराचा दर्प फार

आपण शब्दातून एकात्मतेचा गंध येतो
मीपणात शब्दांवरचं बांध येतो

आपणात होतात एकमेकांचे उणे दुणे नजरंदाज
मीपणात होते तिरीमिरी फार

आपण आपल्यांमध्ये आपुलकीन राहू
मीपणाची कात आता टाकून देऊ

आपण आपल्यांच्या भावना फुलवूया
मीपणाची कशाला कोंडी करूया Savita BK

-


11 JAN 2020 AT 13:25

तू नी मी कुठे वेगळे एकच ना आपण...
का वेगळे क्षितिज आपले ...
का असे वेगळे नभांगण...
तू नी मी कुठे वेगळे एकच ना आपण...
घाला घातला कोणी कधी ..
दिपज्योतीचे उडतील तेजा:कण...
कणाकणातून आपल्या उजळेल ते नभांगण ...
तू नी मी कुठे वेगळे एकच ना आपण ...
दुःख पचवून ही सुख पेरले ...
आघात जिव्हारी किती लागले...
अनुभवांची त्या काव्य झाली ...
हळवा सुर नी सोशिले घाव जणू घन...
तु नी मी कुठे वेगळे एकच ना आपण ...
माझ्या दुःखात अश्रू का तुझे झरती ...
तुझ्या सुखात येई समाधानाला भरती...
तू नी मी कुठे वेगळे एकच ना आपण ...
नाव तुझेच ओठावरती..
दिप हृदयीचे तुझ्यासाठीच तेवती...
केला मी हृदयाचा हिरा ...
तुज चरणी अर्पण ...
तू नी मी कुठे वेगळे हे एकच ना आपण ...
एकच ना आपण...

-