शब्दमाला   (...DEEPA)
413 Followers · 31 Following

Joined 25 September 2019


Joined 25 September 2019

तू आहेस उंच टोकाशी
झेप घे त्या उंच आकाशी
फिरून येवू नको या गावी
तुला इथे मी भेटणार नाही

-



गहिवरून उमलें गुलाब पाकळी
लाल हिरव्या गर्द जाळीतूनी

-



अथांगपणे व्यक्त होत राहते
आई शब्दकळांच्या भावगीतातून

बाप नावाचे शांत वादळ संयमित
बघत निहाळतं अंतःकरणास भारून

जीवन लहरींवर लहरी धडकती
नौका जन्मजान्हवीची ठेवतसे तोलून

स्वभावधर्म तो कठोर अव्यक्त जाणवत
पण आत्मप्रत्यय न होऊ देतेसे प्रकर्षूण

ज्ञानधारणा करण्यास प्रवास संकल्पित
मर्मज्ञ विद्यापीठ सामोरी उद्याला बघ याच दृष्टीतून

-



माळलेला गजरा तो तुझ्या हातांनी
शुभ्र पाकळ्या विणल्या हिरव्या कोवळ्याश्या देठांनी

जिवापाड जपलेला संसार तू ग राणी
साऱ्यातून स्पर्श भासे तुझा डोळ्यात ग पाणी

माती माती खेळतसे मी खोपा बनवूनी
मी इवलिशी तुझ्या खोप्यातली गं चिमणी

भातुकलीचा खेळ रंगे तू सजविशी दागिन्यांनी
जमेना काही मज तू खुणविशी मग दुरुनी

तुझं असणं ते पाठी पाठी पाहत असे वळूनी
धावत येऊन बिलगुन घेतसे तुला साडी पदरानी

रुजलेल्या शब्दांतूनी तुझ्या कळी येते उमलूनी
माळलेल्या गजराच्या सरीपरी आधार स्मरणांतूनी

-



व्हय व मंग मी काय म्हंती ...
आमरस करू की बासुंदी...

-



ना सांगे कुठले गोत्र पाणी
फक्त वाहे डोळ्यातूनी कहाणी

-



रंगरेषातुनी संस्मरण थवे

काही जिणे काही उणे
भासआभास दिवास्वप्न छलावे

काही जगले काही संपले
सदासक्तीत उदासीनता ही हिणावे

काही आक्रंद काही कंठ सुरात दाटले
सुर अंतरीचे किती अन् कसे जपावे

काही जपले काही न उमगले
बंद पाकळी देहावर काट्याची सहस्त्र घावे

काही सावल्या काही सूर्य तेजाचे पसारे
भेटीसाठी तुझ्या फक्त उरली आसवे

-



हातात हात सोबत तुझी साथ
सांग अजून काय हवंय आयुष्यात

-



काहीच आपलं नसतं
हळवं मन भाबड असतं
पालखीचा स्तंभ होऊनी हसतं
साऱ्यांपुढं नाचत राहतं
झालर किनार हेलावतं
जल्लोष चैतन्य दिशांत भरतं
रमत ध्यान रंगात
अस्वस्थ वास्तवावर तरंगतं
वाट वाट पाऊल चालतं
चढती श्वास जाती उतरतं
देह मन थरावर थर चढवतं
ऊन सावल्या अंगावर झेलतं
खोल खोल आत झिरपतं
सूर्य डोईवरला मावळी पश्चिमेत
गर्द सावल्यात क्षण विस्मृत
जल्लोष पांगला दूरात
टाळ स्वर एकला उरात
गाभाऱ्याचा कलश डोळ्यात
हुंदका दाटतो गळ्यात
मायमातीशी नतमस्तक ठेवत
जन्मोजन्माची संचित आठवतं
चिरंतन नसे कोणी सोबतं
इतकंच आता जाणवतं
आपलं काहीच नसतं

-



तु घनश्याम रे गोपी भुलती सख्यारे
मी नामस्मरणात तल्लीन तुला स्मरे

-


Fetching शब्दमाला Quotes