उसकी वफाओं को ढूंढने
आज भी चली जाती हूं,
उसी मोहब्बत के शहर में बार बार,
जहा उसके दिल का दरवाजा बंद
हमारे लिए कर दिया है...-
बीते सालों में सब भुला दिया उस शख़्स ने
जो बात बात पर वादे साथ देने के करता था...
एक बार भी याद नही आए हम उसे कभी भी
जो ग़ज़लें सारी हमारे नाम लिखा करता था....
उसने ख़ारिज कर दिया जिंदगी से हमें अपनी
जो कभी हमें अपनी जिंदगी कहा करता था...
बेवफाई का देकर चला गया वो इल्ज़ाम हमें
जो जिस्म में धड़कन बन धड़कता करता था...
आज भी है वही बेपनाह मोहब्बत उससे हमको
वो जिसे बार बार बेदर्दी से झुठलाया करता था....
-
क्या इतने बुरे है हम जितना
एहसास कराए जा रहे हो...
क्या मानते नही हो इश्क हमारा
जो इतनी नफरत किए जा रहे हो...
हर मोड जिंदगानी का क्यों
किस्मत में जोड़े जा रहे हो....
क्या कसूर तुम्हारा कुछ भी नही
जो गुनहगार साबित हमें किए जा रहे हो...-
है कितनी तकरारें दिल में
फिर भी तुम्हे ही सोचती हूँ...
हर खामोशी का हो सवाल तुम
हर जवाब में तुम्हें ही पाती हूँ....
तकदीरें भी कैसी है देखो ना
बवाल पर बवाल कर जाती है...
मोहब्बत है बरकरार फिर भी
तुम्हे न कभी भूला पाती है....-
परिस्थिती माणसाला
खूप काही शिकवते
आपल्या परक्यांची
ओळख जवळून घडवते...
नको नको म्हणताना
सत्य पुढ्यात मांडते
आंधळ्याला ही डोळस
किती सहज बनवते....
मुका ही ईथे बोलतो
अन् बहीरा ही ऐकतो
गोष्ट एक खरी खोटी
आपलाच कोणी सांगतो....
दाह तो एक वास्तवात
का कोण जाणे पेटतो
येऊन वारा तो आशेचा
मनास फुंकर मग घालतो....
प्रणाली शैलेश....✍️
-
स्त्री मनाच्या वर्तुळाचा
परीघ केवढा असणार
त्रिज्या त्याची किती अन्
व्यास केवढा असणार ??
चौकोनाला चारच बाजू
तिचे जग सिमांतर असणार
भविष्याचे ती सुख पाहते
वेगळे काय हो असणार...
त्रिकोणी तिचे हे जीवन
प्रमेय येथे ही असणार
सासर अन् माहेरात गुंतते
काटकोन मनाचा असणार..
आयात रूपी आशा साऱ्या
स्वप्नात सारख्या असणार
एकरूप हो या आयुष्याला
या आकृत्या कशा असणार....
साधी रेषा उमटेल जेव्हा
तेव्हा ही अपेक्षा असणार
श्वासांची ती कहाणी हो सारी
अवलंबून या रेषेवरच असणार...
प्रणाली शैलेश....✍️-
ती काय मागत असेल तिच्या प्रार्थनेत
ती काय बोलत असेल तिच्या शांततेत
तिच्या ही मनाला असतिल ना कंगोरे
सुख दुःख अन् कठोरतेच्या जाणिवेत
समजावत असेल वेड्या मनास ती ही
रुपेरी स्वप्नांना दूर सारून वेड्या भावनेत
आयुष्यात येणाऱ्या संकटांशी लढून ती
जगत असेल ना रोज खोट्याच आशेत
अगदी आयुष्यभराची कमाई काय माझी
विचार न करता मुक झालेल्या तिच्या वेदनेत
प्रणाली शैलेश...✍️
-
जीवनाच्या ह्या वाटेवर
काट्यांची मैफिल सजली
फुलांना तिथे जागा नाही
सुगंधाची कमी भासली....
खंत व्यक्त करण्या गेले
माणसे ही न आपली वाटली
उगाच का कोण जाणे
मनात वेदनेची गर्दी साठली...
पाहिलेली सारी स्वप्ने
एका क्षणात सारी तुटली
जणू काच एक भली मोठी
एका झुळूकेने सहज फुटली....
झुळूक ती उगाच आली
सारेच उद्ध्वस्त करून गेली
उराशी बाळगलेली खोटी आस
तिने सत्यात उतरवून ठेवली....
उगाच प्रारब्धाला कोसता
प्रारब्धाला ही वाचा भेटली
" कोणी नाही कोणाचे इथे "
जीवनाने ही गोष्ट हळूच सांगितली....-
एखाद्यावर आरोप करत असाल तर
एकदा स्वतःला ही पडताळून पहावे,
समोरच्याने काय काय भोगले आहे
हे त्याच्या वेदनेला जाऊन विचारावे...-
हमारा प्यार जताना उसे शायद पसंद नही था ग़ालिब
तभी तो हाल ए दिल बताना हमने आजकल छोड़ दिया...-