फुलांची दिसत आली तरी -
ती वाट सोपी नाही.
फुलाच्या आत दडलेले
काटे कधी दिसत नाही.
दगडाच्या आत दडलेला तो
लाकडाच्या आतही असतोच.
घर्षण झाल्यावर कसे मग -
जाळ 'अचानक' भडकतोच.
-
7083777808
तुझ्या प्रत्येक पावलावर मी होतो
जरा आठवून बघ.
तुला हवे तेव्हा,
मीच सोबत होतो.
जरा आठवून बघ.
जेव्हा समजले मला,
मी दूर हवा आहे तुला ....
मी किती दूर राहिलो ,
जरा आठवून बघ.
तुला हवं म्हणून सोबत राहिलो.
तुला हवं म्हणून दूर राहिलो.
माझं असं कधी नव्हतंच मुळी ...
तुला हवं म्हणून केलं,
जरा आठवून बघ.-
चिऊ काऊचा घास तुझ्यासोबत घेतला
दोघींच्या नात्याचा हर्ष होता दाटला
अचानक काळाने झडप ती घातली
नात्याच्या प्रीतीची दोरीच कापली.
सतरा वर्षे काय सतरा जन्म झाले तरी,
तुझी आठवण मिटणार नाही.
तुझ्यासारखी बहीण प्रीती ,
मला कुठे मिळणार नाही.
देवाकडे एकच मागणे मागते आहे,
प्रत्येक जन्मी तूच बहीण मिळावी.
तुझ्या माझ्या नात्याची ,
उरलेली सारी कसर भरून जावी.-
कुणावाचून काही अडत नाही म्हणत
माणसाला माणसाची किंमत नाही.
कुत्र्याला मारून बघा कुत्र्यांमध्ये ,
दुसरी कुत्री भुंकल्याशिवाय राहत नाही.
माणसालाच काय झालंय कळत नाही ,
इतक्या खालच्या पातळीवर गेला तरी
माणूस म्हणून जगायला तयार नाही !-
किती तरी वर्षे सोबतचा प्रवास केल्यावर
अचानकपणे
एकट्याने परतीचा प्रवास करावा लागला
तर ....
सांग सखे ! दुःख नाही का होणार ???-
कुणावाचून कुणाचे अडत नाही....
व्यवहाराला हे पटते
पण ,
भावनांना नाही पटत.
ज्याचे अडते त्यालाच कळते.-
स्वतःला सोडून बाकी साऱ्यांना सांभाळणे
आधी फार आवडायचे पण ....
आवड आहे पण ....
हा 'पण' जिथे येतो ....
दुसऱ्याचा विचार जिथे येतो ....
समजून जा - संसार सांभाळला जात आहे.-
सोडायचे पण तूच
तोडायचे पण तूच
आणि मग नंतर -
तक्रार पण करायची तू ....
हे असे कितीदा चालनार ?
मीच स्वतःला कितीदा सावरणार..
आता एकदाचे अंत करू या
माझा मी आणि तुझी तू राहू या .
कितीदा तरी वाटले , तू भेटशील पुन्हा तशीच ..
जशी आधी भेटायची अगदी तशीच .
पण
आता वाटते,
भावनांचा , आठवणींचा अंत करू या
माझा मी तुझी तू राहू या .-
समोरची व्यक्ती जेव्हा, Call/ msg / रिप्लाय....
करायची स्वतःहून बंद होते न,
तेव्हा
समजून जायचे की,
तुमची गरज संपली आहे.
उगाच वाट बघण्यात,
वाद घालण्यात, कारण शोधण्यात,
रागावण्यात, काहीच अर्थ नाही.
कारण -
ती व्यक्ती काही तुमचा राग दूर करायला येणार नसते.
तुम्ही स्वतःहून दूर जावं,
अशीच तिची इच्छा असते.
आणि तिची इच्छा पूर्ण करणे,
एवढेच तर तुम्हाला जमत असते!!!-
"मला तुला गमवायचं नाही",
असे म्हणत मला भेटणारी तू...
आणि -
आता कमवलेलं सारं काही,
गमावणारी तू....
यातली कोणती खोटी अन
कोणती खरी तू.?????-