गारांचा मारा, अवकाळी पाऊस धारा.
खट्याळ वारा, झोपवला शिवार सारा.
भर दिवसा अंंधारानं सजली धरणीमाई.
काळ्या ढगांनी लपवला चमकता तारा.
-JITU/G2/GG-THE MIND SEEKER.-
अवकाळी पावसाचे ऊमाळे
मधे मधे हुंदके देतच राहतात...
नको त्या वेळी येवुन
नेहमी सावध राहण्याचा इशारा देवुन जातात...
ते तरी काय करतील
दु:ख ते किती सावरतील...
भरुन आलेले डोळे
किती काळ अश्रृ आवरतील...
-
धन्य झाली देवा तुझी
काय खेळ मांडीयेला!
तोंडापाशी घास आला
तोही तू ते हिरावला!-
थांबविण्या अश्रु,
सुटला सुतकी वारा।
गरजती आज अवकाळी,
पाहुनी बिभत्स विनाष सारा।।
ओंजळ आतुर नाही,
आज चिंतातुर आहे।
नाजुक भावनांचे वरदान तुला,
तरी बाप माझा रडताना पाहे।।
करूनी ऱ्हास सृष्टिचा,
जन जगती आलबेली।
निष्पाप्यास सत्वपरिक्षा,
जरी सेवा निसर्गाची केली।।-
सुरु झाला ढगांचा खेळ
तुफान सुटलाय वारा
कडाडली सौदामिनी
आल्या अवकाळी धारा
वाजत गाजत गर्जत
धो धो पाऊस पडतोया
नासधूस झाली रानाची
मनी बळीराजा रडतोया.
वासा मोडला गोठ्याचा
पालं उडाली गरीबाची
हवालदिल माझा शेतकरी
दैना देखवेना जनावराची.
नाही कसं म्हणू तुला
तुच आमचं जीवन
रागे ये नाहीतर प्रेमात
सारं करीन मी सहन
कवी किसन आटोळे सर
9404639537
-
अवकाळी पाऊस कसा अचानक येतो..
तप्त वसुंधरेवर सरीवर सरी बरसतो...
पण बळीराजाचा हुंदका दाटून येतो...
वरूणराजापुढे बळीराजा हात टेकतो...
पण वरुणराजा तरी काय करणार?...
दाटलेल्या अश्रुंना तो किती वेळ आवरणार?....-
अवकाळी पाऊस
धरणीला बिलगला
सुगंध तिचा लुटून नेला
तापलेल्या धरणीला सुखावून गेला
-
पावसाळ्यात नाही येत तो
हिवाळा असो की उन्हाळा
कधीही अचानक येतो तो
अवकाळी पाऊस असतो तो
उभ्या पिकांचं नुकसान करतो
शेतकऱ्यांसाठी संकट असतो
त्यांचं स्वप्न धुळीस मिळवतो
त्यांना आणखी कर्जात बुडवतो
अवकाळी पाऊस असतो तो-
या अवकाळी पावसानी
नास केला ओ पिकाचा
हाती आलेली कपाशी
पावसाने केला नास शेतातील पिकाचा ...
-
Padto asa,
Peeka sheta naxtt karto kasa,
Pavsa re pavsa,
Avkadi eu naka.-