झाडे लावू झाडे जगवू
वसुंधरा करू स्वर्ग
पर्यावरण रक्षण
हाचि शाश्वत मार्ग ...
पर्यावरण दिनाचा संकल्प
झाडांचे करू जतन
हवा सावली फुले फळे
झाडे आपुले जीवन ..
कवी : ह.भ.प. किसन आटोळे सर
🌲🌳🌲🌳🌲🌲🌳-
आयुष्य हे सुंदरच आहेत. एकमेकांना ... read more
हे भगवंता तू दयाळू कृपाळू
तुझीच सत्ता या जगतावर
प्रत्येकाला सुखी आनंदी ठेव
अशीच सर्वांवर कृपा कर
🌲राम कृष्ण हरी 🌲
-
ना किसी को वक्त है
ना कोई किसकी सुनता है /
पास रहकर भी
ना किसी का बनता है /-
निसर्ग त्याचा खेळ खेळत राहतो
मनुष्य फक्त अंदाज बांधत असतो
निसर्गाची लीला अनुभवायची असते
हसत हसत परिस्थिती स्वीकारायची असते ..
🌲कवी ~ किसन आटोळे सर 🌲
-
मान्सूनच्या आधी अवकाळी
भर उन्हाळ्यात डरकाळी
सर्वत्र पाऊस पाणीच पाणी
हा पाऊस आहे उन्हाळी ...
कवी ~ किसन आटोळे सर
-
वादळ वारे संकटे झेलले
तरी मोडला नाही कणा
ज्याच्यात हिंमत त्याला किंमत
स्वतःच स्वतःला लढ म्हणा ....
नाही करणार कोणी मदत
नाही पडणार पाठीवर हात
आपणच आपल्या पाठीवर
द्यायची शाब्बासकीची थाप ...
🌲ह.भ.प. किसन आटोळे सर 🌲
-