तहानलेले हे मन
आणुनी डोळ्यात प्राण
सरतो रे एकेक क्षण.....l-
Vidya khamkar 27 feb
शब्द च माझा श्वास.😍
छेड ना तू मल्हार माझ्यासाठी खरा,
अंगणात माझ्या बरसू दे हा आषाढ जरा....-
जरासा गावात पाऊस काय पडला......
.....कुणी नशेत बुडून गेले..
कुणी उचकित न्हाहून गेले...-
तसं तुझं माझं संभाषण
नेहमीच कोर,
पण डोळे बोलून जातात
भलतच बरं....-
पापण्यांना पेलते तेवढेच स्वप्न पहावे,
नाहीतर निष्पाप आसवांना मनसोक्त वाहू द्यावे...-
रात सारी पिऊनी झिंगले मी स्वप्नांची मस्त मधुशाला,
हाय नशिबा..चंद्र माझा तो आज भूपाळीतच का आला?.-
वैशाखाचा वणावाही मलमली वाटे.
चल सख्या प्रितीलाही उधाण आले मोठे..-
थांब सखे पायात रुततील ते बोचरे काटे,
करीन काळजाची ओंजळ मी तुझ्याच वाटे...-
हाय,मलमली नजरेतील ती नशा आगळी
झिंगणाऱ्या त्या मनातील इजा वेगळी..-