लाजून चूरर झाली.....
रातराणी
सजली नव्याने,
डुलुनी दरवळी सुगंध
जवळ तुझ्या येण्याने।।
शीतल मंद वारा
काटा आनी गारवा,
सूत आकाशी चांदण्यांचे
हेरतो भान एकाकी काजवा।।
जागरण कोजागिरीचे
चंद्रमा नैवैद्य दुधाचा,
आठवी माय हिरकणी
कसा पाजला तिने लेकरास पान्हा।।-
माझे धन ही माती,अभिमान माझा तिरंगा
सांभाळेल देश माझ्या आईला,विश्वास शहीद होताना वीराला
१६५२ भाषा,होतात जातीवरून दंगे
उधळतो एकीचे रंग-गरजेत मदतीला,दर सनाला
सहभाग दर शोधात-प्रयोगात,अखंड विश्वात विस्तार सारा
सप्तसुर इथे वास करती,गनितास शुन्य इथुनच मिळाला
पाहुना अवतार देवाचा,जाता त्यास शिजोरी
ओढ इथल्या संस्कृतिची परदेशी,दिले आयुर्वेदाचे ज्ञान जगाला
पाउल हरएक क्षेत्रात,इतिहास अशक्य प्रयत्नांचा
निरोगी जीवनाचे रहस्य,योगाचा उदय इथुनच झाला
असा माझा देश,देने आमची परंपरा
जैश्यास तसे उत्तर शत्रुराष्ट्रास...,
झेलतो त्यांच्या संकटाला
काही मिटले मातीत,काही नदीतून वाहले
मानवंदना त्यांस देऊन आज..,
सलाम देशाच्या जवानाला-अस्तित्व राखणाऱ्या प्रत्येकाला-
कोसळुन त्याचे घर
मातीचा नागोबा करा,
प्रार्थना तुमच्या रक्षणाची
मिटवून त्याचा निवारा।
बिनगुन्ह्याची कैद जबरदस्ती
छळुन आज पुजायला,
काढून त्याचे विष,करुण निशस्त्र
येईल कसा तो रक्षणाला।।
आहे जर देव
का घाबरता,मारता त्याला,
जपावे त्याचे अस्तित्व
दुर वनात सोडावे त्या जिवाला।।
दाखवावा नैवेद्य,दूध-ल्हाया,
आशीर्वाद दुरुनच घ्यावा।
आज श्रावनशुक्ल पंचमीस
हा नवा आदर्श घडवावा।।-
कधीतरी बोलाव,
विचारावा प्रश्न मनाला।
दडलेल्या मनाच्या आरशात...
पाहावं आपल्या अंतरंगाला।।
शोधावे दोष त्यात,
नवे वळण घ्यावे।
त्याच आरशात बघुन,
नवे स्वप्न पहावे,पूर्ण करावे।।
लागला जर डाग आरशाला...
अनुभवाच्या फडक्याने पुसावा,
पाहुन त्यात पुन्हा नव्याने,
संग प्रयत्नांचा वसावा,जोपासावा।।
अश्या ह्या मनाच्या आरशात,
स्वतःला मी सजवतो, नवे वळण देतो,
स्वप्न पाहतो, हरवून जातो,
एकटाच हसतो,अश्रुही वाहतो,
समजेनासे काही होई तेव्हा...
मनाच्या आरशात बघुन,
मी कौल मनाचा घेतो।।-
गरज ना शोधाची,
ना हाकेची तिला।
स्वार्थी दुनियेच्या वाळंब्यात,
निःस्वार्थी ग्वाही तिची,
माझ्या स्वप्नाला,प्रयत्नाला।
आधार मज तिचा,
वाट चुकताना-काळोख दाटताना।
निर्मळ अभिमानी मन तिचे,
माझे भविष्य घडताना,यश गाठताना।।
स्वतःला शोधताना,परत हरवताना,
दुखात रडताना,सुखात हसताना,
काही सापडताना,काही गमावताना,
प्रश्न एकताना, उत्तर देताना,
विचार करताना, प्रत्यक्षात आनताना,
सदा साथ तिची,
तिच्यातील माझीच,माझ्या सावलीची।।-
मराठीचं पुस्तक उघडलं की, आठवण येते रासम बाईंची।
मराठीचा तास संपला तरी,उजळणी असे व्याकरणाची ।।
काठीचा वापर कधी केला नाही,शब्दांच्या तलवारीला धार होती।
रविवारच्या तासाला कधीतरी, छानशी गोष्ट ऐकायला मिळत होती।।
बाईंनी शिकवलेल्या कवितांतून, अलंकारांची ओळख पटली।
माझी पहिली तुटक कविताही, वर्गात त्यांनीच वाचून दाखवली।।
पाठ-कवितेच्या अर्थापेक्षाही, त्यांनी जग ओळखायला शिकवलं ।
समाजात स्वतःला सिद्ध कसं करावं, ह्याच ज्ञानही त्यांच्याकडूनच मिळालं ।।
बाईंनी घेतलेल्या उजळणीची,कधी भीती वाटली नाही।
त्यांची शिकवण्याची पद्धत, कोना शिक्षकात दिसली नाही।।-
आत्मसंवाद....
असलेल्या विचारांचा,आणलेल्या विचारांचा,
प्रवास....
चुकीच्या संशयाचा,गैरहजर विश्वासाचा।।
झाले सत्य दिसेनासे,
मनी चादर खोट्या अंधाराची।
बिना संवादाचे वाद,
किरणे कुठे अडती विश्वासाची।।
करावा थोडा विचार
बदलून काैल मनाचा,
होईल घट्ट विन नात्याची...,
प्रयत्न असावा...
एक दीर्घ श्वासाचा,थोड़ समजून घेण्याचा।।-
भेट अनमोल निसर्गाची,
तरी मनी अंधश्रद्धा।
अपमान करून स्त्रीत्वाचा,
का असावी देवावर श्रद्धा।।
मासिक पाळी एक चाहूल,
तिच्या जिवंत मातृत्वाची।
बहुरूपात वावरनाऱ्या स्त्रीला,
जाणीव देते विश्रांतीची।।
स्वतःची काळजी घेता,
का बुरसट समाजाचा विचार।
नको समजू शापित स्वतःला,
कर मोकळ्या मनाने संचार।।
देवाला स्पर्श नाही
तिला..
सणासुदीला कोपरा,
करा सन्मान स्त्री शक्तीचा
विसरून अशा परंपरा।-
थांबविण्या अश्रु,
सुटला सुतकी वारा।
गरजती आज अवकाळी,
पाहुनी बिभत्स विनाष सारा।।
ओंजळ आतुर नाही,
आज चिंतातुर आहे।
नाजुक भावनांचे वरदान तुला,
तरी बाप माझा रडताना पाहे।।
करूनी ऱ्हास सृष्टिचा,
जन जगती आलबेली।
निष्पाप्यास सत्वपरिक्षा,
जरी सेवा निसर्गाची केली।।-