विठ्ठल विठ्ठल l करी गुणगान l
पायी चाले जन l आवडीने ll१ll
राम कृष्ण हरी l वदावे अंतरी l
मंत्र जाप करी l नित्यनेमे ll२ll
भक्ताचीये साठी l उभा विटेवरी l
कर कटेवरी l पांडुरंग ll३ll
तन मन धन l वाहे सर्व प्रजा l
पंढरीच्या राजा l अर्पियले ll४ll
तुझे नाम घेता l सर्वकाळ चित्ती l
उत्तमची मती l लाभतसे ll५ll
पांडुरंग नाम l एकची आचार l
सुटतो विकार l तातडीने ll६ll
विठ्ठला चरणी l इतके मागणे l
जगाचे गाऱ्हाणे l सोडवावे ll७ll-
युध्दभुमीवर रक्ताच्या नद्या वाहतात,
अनेक परिवार तिथेच हरवतात,
नर्क यातना भोगावी लागता तिथे,
अरे विठ्ठला, ही वाट जाते कुठे...?
रस्त्यावर लोक भुकेने मरतात,
उन-पावसात तिथेच राहतात,
मानुसकीही विचारत नाही तिथे,
अरे विठ्ठला , ही वाट जाते कुठे...?
अन्नदाता त्यांच्या शिवारात राबतात,
पुर्ण जगाचे पोट खाऊ घालुनी भरतात,
तरी देखील आत्महत्या करावी लागती तिथे,
अरे विठ्ठला , ही वाट जाते कुठे...?
अनेक वारकरी पंढरपूरडे चालतात,
मनापासून भक्त तुझी पुजा करतात,
दर्शन मिळत नाही तुझ्या भक्तांना तिथे,
अरे विठ्ठला, ही वाट जाते कुठे...?
तुझे रुप पाहुन होतो मी देखील दंग,
नेहमी असते मुखी तुझे नाम पांडुरंग,
तरी देखील भोगतो आम्ही दुःख ईथे,
अरे विठ्ठला , ही वाट जाते तरी कुठे,
जाते तरी कुठे...??-
उभा कमरेवरी हात ठेवुनी
विठू माझा सावळा ....
वाट पाहे वेड्या भक्तांची
कधी घडेल वारकरी सोहळा. ..⛳️
पंढरिच्या वाटेवर..
# प्रणाली मोरे (कोल्हापुर)-
ऐसे भक्त को मैं आसानी से प्राप्त हो जाता है जो मुझमें लीन रहता है। मेरे भक्त का दृढ़ विश्वास है कि वह मेरा है और मैं केवल उसका हूँ। उसकी इंद्रियाँ, मन, बुद्धि आदि उसके नहीं हैं। तथ्य यह है कि हमारी पहचान है प्रभु, संसार नहीं।-
विठू नामाच्या गजरात
अवघा अंतरंग भिजला...
वारकऱ्यांचा मेळात नाचतांना
🚩 मला पांडुरंग दिसला 🚩-
दिसेना वैष्णवांचा ताफा ,वाट पाहतात वाटा सुन्या-सुन्या पंढरीत ,विठू पडला एकटा..!
वाहते चंद्रभागा त्याच्या आसवाने,
देव पडला कोरडा लेकरांच्या विरहाने 🚩
व्याकुळले मन घेण्या विठूची गाठ,
तुच सांग रे बाबा कशी झाली आपल्या मायलेकरांची ताटातूट...-
दूर वरून दिसते
माझ्या कडेच येते
सूर्याचे ते पहिले किरण
पडती अंगावर्ती स्वेदनाही जाणवते
गाढ झोपेला जगावते
सूर्याचे ते पहिले किरण
पडती दवबिंदूंवर्ती , अलगत पाजरते
गोठ्यातले ते वासरू दुधापाई हंबरवते
सूर्याचे ते पाहिले किरण
सूर्याचे ते पहिले किरण येति सोन्याच्या पाऊलाने
स्वागत करती प्राणी ,पक्षी किल्बीलाच्या रूपाने
येति सूर्याचे पहिले किरण
फुले उमलू लागती
आईचे ते वात्सल्याचे हात पडती अंगावर्ती-
#विठ्ठलमय
पांडुरंगा माझ्या विठ्ठला
वेड लागले या भक्ताला।।
गुलालाची केली उधळण
भक्तीमय अवघे हे क्षण।।
विठ्ठल अभंगाची वाणी
टाळ-म्रुदुंगी विठ्ठल ध्वनी।।
नाद घुमे विठ्ठल विठ्ठल
भाव स्फुरे विठ्ठल विठ्ठल।।
विठ्ठल भक्तीचा फुले मळा
विठ्ठल नाम गायी गळा।।
विठ्ठल नामे संचित कर्म
विठ्ठल नामे दान धर्म।।
माय विठ्ठल बाप विठ्ठल
बंधु विठ्ठल सखा विठ्ठल।।
अवघे जग हे विठ्ठलमय
विठ्ठल नामे व्हावे जलमय।।
श्री. गजानन रा. परब(बाबूजी), सिंधुदुर्ग.
-
तो हा विठ्ठल....
तो हा विठ्ठल बांधील झाला
भक्तांसाठी पुन्यांदा व्याकुळ झाला
तो आता विटेवर च थांबला
सांगा ना तो इतका का निष्ठुर झाला
नेमका गुन्हा कोणाचा ठरला
का देव इतका हताश झाला
तो गंमत नाही पाहत उभा राहून
सांगतोय काही तरी शांत राहून
काय सांगत असेल रे नरा
शोध घेणं आता तरी जरा
तुझी पंढरीची वारी नसेल
चुकली कधी हे असेल जरी खरे
सांग ना तू कधी अंतर्मन झाकले
की नुसते देवा पुढे वाकले
तो संत तुकाराम महाराज
संत ज्ञानेश्वर किती काही सांगून गेले
आपण नुसते अभंग आळविले
त्यातील मर्म ना कधी जाणले
विपुल ग्रंथ संपदा नुसती मिरवली
ना कधी ती जगली ना रुजवली
थांबून या वारी घरी
दाखव जगा का श्रेष्ठ आहे वारकरी
जरी नसेल पुढ्यात पंढरी
करू याचना महामारी पाठवण्या देशांतरी-