अर्जुन तर आपण सर्वजण आहोतच ,फक्त आपल्या आयुष्यात आलेल्या कृष्णाला आपण वेळेवर ओळखायला हवं ..!!!
# मोरपंखी
# प्रणाली मोरे♥️
-
"ShivohAm"
माणसा,स्वतःला आनंदी दाखविण्याचा अट्टाहास अजून किती दिवस!!!
पटाशिचे दात पडत नाहीत तोवर की ,आयुष्यातील मुखवट्याचे रंग समाप्त होत नाहीत तोवर...
बाकी पात्र खरतर सर्वांचीच छान आहेत 'स्व'ला विसरलेली आणि निरंतर दाहीदिशा भरकटलेलि...तरीपण जिंदगी अपनी मौज मे अस चाललंय 😄
Confuse झालात का? व्हायलाच पाहिजे!!!!
-
भरून आलेल्या आभाळापुढ,
कधितर आपल दाटून आलेल मन ही मोकळ कराव...
साचलेल्या हुंदक्यांना,
शब्दांची जोड न देता तसच वाहू द्याव...
प्रणाली मोरे (कोल्हापूर)-
माणसाने आयुष्यात ईतक पण अति शहाणे होवू नये की
त्याला समजवताना समोरच्या व्यक्तीला वेड व्हाव लागेल...😇🤨😏
#ग्यान 😄की बाते
-
विचारांची व्यापकता वाढली की,
विभागल्या गेलेल्या समाजाची दुर्गंधता
आपल्या विचारांना लागत नाही...
सत्याचा आग्रह धरणारी मानस आता निघून गेली, निदान त्यांच्या विचारांचा आग्रह धरणाऱ्या पिढीचा तरी उदय व्हावा..
(जे घेण्यासारख आहे ते नेहमीच घ्याव मग ते कुठूनही मिळो!!!)
#अकलेची दुनिया
प्रणाली मोरे (कोल्हापूर )-
दुसऱ्यासाठी आयुष्य जगणारी व्यक्ती कधीतरी स्वतःसाठी एक पाऊल पुढे टाकते ,तेव्हा त्या एका
पाऊलासाठी त्या व्यक्तीला स्वार्थी ठरवल जातं...
पण या अगोदरच्या निस्वार्थी राहण्याची किम्मत त्यावेळी झिरो होवून जाते...
'माणसं नेहमी आपल्यात तेच बघत असतात जे त्यांना हव असत ,त्यामुळे तुम्ही कठपुतली होवू नका '...
# observation
•••प्रणाली मोरे...-
साथ देण्याची कबुली प्रत्येक वेळी शब्दात सांगायची नसते....
आयुष्यात येणारे खडतर अनुभव, पेचप्रसंग,दुर्भाग्यचे क्षण अशाच क्षणांची परीक्षा घेण्यासाठी असतात...
त्यावेळी पोकळ शब्दांची आश्वासन देणारी वलय आपोआप पुसट होतात...आणि न बोलता शब्द निभावणारे आपले खरे हिरे सोबत राहतात..फक्त
वेळेवरच खरे हिरे आपण निवडायला हवेत..अनुभवाने येणारी नजरेची योग्य पारख त्यासाठी गरजेची असते...
# मुखवटी चेहरे
प्रणाली मोरे (कोल्हापूर)-
आयुष्यातील निरामय अंधाराकडे पाहावं की ,
जिवनाला नवीन वळण देणार्या एका प्रकाश
किरणाकडे ...???,
आपण मात्र दृष्टीची दालनं नेहमीच उघडी ठेवावीत,
कारण
"आयुष्य नेहमीच आपल्या समोर आनंदाचा
'कवडसा 'घेवून उभ असतं"...
# कवडसा मनातला
प्रणाली मोरे (कोल्हापूर)-
मला वाटत,
प्रत्येक धर्मातील सण समारंभाला शासकीय सुट्टी दिली जाते तशीच प्रत्येक धर्मातल्या माणसाला कोणताही जात,धर्म न लावता वर्षातून फक्त
'माणूस 'म्हणूनच जगण्यासाठी दोन सुट्ट्या तरी जाहीर कराव्या सरकारने...सध्या गरज आहे...
#उपयोगी लस
प्रणाली मोरे (कोल्हापुर)-