जितुके कांचन अंगावरी...
तितुकी मन-बुद्धी अहंकारी!!
जितुका मोहपाश न सोडीविसी...
तितुका देहासी अधिक गुंतविसी!!
जितुका जीव गुंतागुंत...
तितुका कठीण देहातीत!!
मुखी जितुके स्वामी नाम...
निर्मळ तितुके अंतर्मन!!
आर्जवी स्वामीसूत गजानन...
स्वामी नामाची आळवण!!
गित_कौस्तुभ(बाबूजी), सिंधुदुर्ग.
२६०५२०२२-
अरे बा विठ्ठला...
युगे अठ्ठावीस, उभा तू एकला...
तरी भोग नाही का रे तूझा संपला?
तू तर, सर्व व्यापी परमेश्वर...
मग हक्क का सांगतो (वा..)नर?
जन्म दिलास तू मानवा...
पदरी बुद्धीमतेचा जोगवा!!
नर जाहला बुद्धीमान...
सर्व अभ्यासिले विज्ञान!!
परी अहंकाराचे मूळ....
शोधुनिया नाही सापडे कुळ!!
मंगळी पत्रिकेच्या पोहोचला...
तरी षडरिपुतं तो गुंतला!!
अरे बा.... विठ्ठला....
गित_कौस्तुभ(बाबूजी), सिंधुदुर्ग.
२५/०५२०२२
-
सोनपिवळी पुष्पमाला
फुलवितो अंगावरी!
ग्रिष्म ऋतुराज "बहावा"
भुषवितो राजवृक्षापरी!!
.......गित_कौस्तुभ(G), सिंधुपुत्र.
ऋग्वेदात ज्याला राजवृक्ष म्हणून गौरविलेला भारतीय वृक्ष "बहावा" ग्रिष्म ऋतुत सोनपिवळ्या फुलांनी बहरतो. असं म्हणतात बहावाचा बहर चांगला झाल्यास पाऊस ही व्यवस्थित पडतो.-
#बालपण_माहेरच
पाऊस मनातून कोसळला...
नी डोळ्यातून उसळला!!
गंगा यमुना रित्या झाल्या...
नी पापण्याही ओलावल्या!!
हुंदका उमाळून आला...
नी माहेरी जीव विसावला!!
तन जरी होते सासरला...
तरी मन गुंतले माहेरला!!
केसातली वेणी-फणी...
शेतातल्या पाटातले पाणी!!
घरामागची पसरलेली परसबाग...
दूर कुठेतरी ओरडणारा वाघ!!
माटवावरच्या जाई-जुईच्या वेली...
नी खुणावणारी अबोल आबोली!!
खुण ओळखीची वाटेवरी...
पायवाट नकळत पोहोचवे घरी!!
हंबरणारी गोठ्यातली गाय...
आईच्या पान्ह्यानंतर दुधावरची साय!!
मागच्या दाराची न्हाणी...
सांजवेळीस आंघोळीचे पाणी!!
पश्चिम क्षितिजावर कातरवेळ...
तुलसी वृंदावनाची दिप वेळ!!
आठवणीतलं सार काही...
बालपण माहेरच पुन्हा न येई!!
श्री.गजानन परब(बाबू_G) , सिंधुदुर्ग.
२१०५२०२२
-
#आता जगायचं तरी कसं? #
आता जगायचं तरी कसं?
सा़ंगा रावसाहेब, गरीबानं जगायचं तरी कसं?
सतत आपटणारी "महागाईची लाट"
₹ महाग झालाय, भागवायच तरी कसं?
शाळेची फी की, महिन्याच वाण सामान?
तुटपुंज्या पगारात, घर चालवायचं तरी कसं?
पालकांची औषध की, मुलांची हौस?
महिन्याच्या बीलाबाहेर, खर्चायच तरी कसं?
महागाईचा आगडोंब, पण पगार वाढ नाही!
जीव जात नाही, म्हणून जगायचं तरी कसं?
©श्री.गजानन परब(बाबू_G) सिंधुदुर्ग.
१२०५२०२२
-
रखरखत्या उन्हापेक्षाही
ताप तुझ्या विरहाचा जाणवतो!
कधी तरी त्या अवकाळी
पावसासारखा बरसून जा जरा!!
गजानन परब (बाबू_G)-
तूझे क्या बताऊं, ओ मेरी जान
तूं क्या चीज है, मेरे लिए सनम!!
तेरे नयनों से, चल गयी जादू...
और सांसो से, निकले तीर...
बेकाबू हो गया, मेरा दिवाना दिल...
मुझे मील गयी, मेरे प्यार की मंजील!!
वो चेहरा तेरा, बिलकुल है गेहरा...
जैसे शर्माये, संमदर की लहर...
ईश्क के भंवर, हर तरफ से मंडराये...
मेरे दिल की कश्ती, यु ही डूंब जाये!!
ईंतजार है, तेरे ईश्क के मौसम का...
गरजते है बादल, मीलन की बरसात के...
चली आ तूं, मेरे यार... मेरे यार...
जीन्दगी भर की प्यास, बुझा दे एक बार!!
©गितकार: श्री. गजानन परब (बाबू_G)
-
#शहराकडसून_गावाकडे
झील जेव्हा घर सोडता...
शहराकडसून गावाकडे वळता...
कालेजाच्या शिक्षणासाठी...
वाडीतल्या एसपीकेक जोडता...
गावाकडेच येकटो रवान...
स्वता रांधून पोट भरता...
आवशीच्या काळजाचो तुकडो...
आठवणीर गावाक दिस काढतां...
कोकणाच्या ओढीक लागान...
बरे वाईट अनुभव जोडता...
ऐन तारुण्यातलो झील...
एकटो रवान शिकता-सवरता...
आवशी बापाशीच्या...
पंखांचा बळ सोडता...
बऱ्या-वाईट अनुभवाची...
शिदोरी गाठीक जोडता...
नोकरीवाल्या बापाशीकय...
गावाकडची ओढ ओढता...
झिलाच्या ओढीक लागान...
बापूसय कोकणात वळता...
झीलाच्या शब्दाक लागान...
नोकरेचा गाठोडा जमिनीत मोडता...
नी लाखाचे खाक नाय...
२ लाखाचे २ कोटी करुन सोडता....
कोकणात काय नाय रे हुननाऱ्यांनू...
उगीचचं भायलो नोटी सोडता?
बाबू_G_Parab
08042022
-
येवजलेला सादात तर.. कायपण मस्त प्ल्यान आखलेलो.दोन म्हयन्याआदीच रेलये ची टिकटा काढून ठेय्यली. नशिबान कनफम मेळलेली सगळी. नाय हुटला, येस्टेर वाको ईलो हुनान. मिळतीत की नाय...जरा पालच चुक चुका होती.त्याचा काय झाला, मांजार आडया गेल्ला ना तिकटा बुकींग करु च्या टायमाक हुनान. आणि कालच बातमी कानार आपाटली..काय तर एपरिलात शाळा चालू रवतले. सरकारान तसा ठरयला. कायतर अभ्यास जाउक नाय पोरांचो.जाव भायरे.मेले. वायच खय ईचार केल्लयं गावाक जावचो..दोन वरसा झाली हत गावातल्यांचा त्वांड बगल्यार..गावाकडल्या नाणीच्या गजालीक बसाक गावल्यार. खय तरी खाची खोलप्यातले काजी ईसकुन वायच भाजूक गावतले असते.उकड्या तांदळाची पेज.तोंडक वाली नी वांयग्याची भाजी. कधीमधी फणसाची भाजी शिरोड्याच्या बांगड्यांचा तिकला.पोरा टोरांच्या तोंडात खय तरी टोकयेचो आमो, नायतर नशिबान एखाद दुसरा गाराप पडतला असता. माटयेर वायच फिरान ईलो तर खयतरी झाळकेतली करवना उष्टाउक गावातली असती... सोमवारचो बान्याचो बाजार फिराक गावतलो असतो. कापो नाय तरी निदान बरक्या फणसाचा श्येडान तोंड माखवक गावतला असता. खुप. खुप काय..काय येवजलेला. ता हुनतत ना येवाजलेला सादात.तर. दळिदर कित्या बादात...खराच आसा ता.जेणी कोकणातल्या सुजलाम सुफलाम भुमीचा दर्शन घेउक नाय तो खरो दळभदरीच.कोकण म्हणजे स्वर्ग लोक... या स्वर्ग लोकाचा सुक तसा कोणाचाय नशिबात नाय...
बाबूG_Parab@sindhudurg.kokan-
#बरसात_करशील_का_एक_बार?
उंच तू ही, उंच मी ही...
गगनभेदी आस आपुली...
व्याकुळलेले जीव दोन्ही...
बरसात करशील का एक बार?
सहज भेदूनी नभाला...
विनंती विशेष गगनाला...
बरसात करशील का एक बार?
तृष्णा बुजविणारा नभ एक...
रिता करशील का या क्षणाला...
बरसात करशील का एक बार?
प्यास माझी तृप्त होईल...
दिर्घ श्वास मोकळा होऊनी...
आंनदाने बागडेन मी ही...
बरसात करशील का एक बार?
तापलेली धरती माय...
तापलेले कडी कपारे...
व्याकुळलेले जीव सारे...
बरसात करशील का एक बार?
धरेलाही सुख लाभेल...
व्रुक्षवल्लीही सुखावेल...
बरसात करशील का एक बार?
बाबूG_Parab24032022
-