अंतरातून माझ्या उमलले होते काही
जोडले गेले होते नाते माझे दुःखाशी
आनंदावर नेहमी येते घालता पांघरूण
हि जात व्यथेची नेहमी उघडी कशी
सुख दुःख व्यथा नी वेदनांनी भरलोय सारा
तरी म्हणती लोक काही नाही तुझ्यापाशी
तिला लिहिणे हा ध्यासच झाला आहे माझा
ती तर कधीच काही बोलत नाही माझ्याशी
काय करावे या आयुष्याचे कळत नाही
स्विकारायचं की लढायचं असतं दैवाशी-
कविता लिहीनं म्हणजे माझ्यासाठी ... read more
असे कसे रे काय होते तुला पाहील्यावर
तुझे तेच माझे होते तुला पाहील्यावर
स्वतःला कसे समजावू 'ती सोबत नाही'
मनाची घालमेल होते रे तुझे चित्र पाहील्यावर
कधी काळी भेटलो होतो आपण त्या बागेमध्ये
ती फुलेही लाजली होती तेव्हा तुला पाहील्यावर
तुझ्याशिवाय काहीच नाही रे आयुष्यात माझ्या
माझे अस्तित्व जाणवते मजला तुला पाहील्यावर
आयुष्याच्या पानावरती काहीच लिहिले नाही
जग जिंकल्याचा आभास होतो तुला पाहील्यावर
तु गेल्यावर इतरांशी नी स्वतःशीही मौन झालो
बोलणे माझे संपत नाही तुला पाहील्यावर
शब्दांचे मी जाळे विणतो मनाच्या पटलावर
न पीताही चढते धुंदी अशी तुला पाहील्यावर-
अंतरीचा साप
नाचवितो रोज
कोण आता मज
सावरी रे
ठेविले तू तुझे
दुःख जरी लांब
किणाऱ्याशी थांब
बंधनात
अत्तराची कुपी
भेटावी निर्मळ
नित्य दरवळ
चोहीकडे
तुला नाही माझे
इतके डोहाळे
जितके उन्हाळे
माझ्यात गं
कल्पना विश्वात
घालू नको रात
माझे तिथे हात
गुंतलेले-
इतके सारे जीवन मजला नको ना गं आई
तुझ्या विना या जीवनाची होते फक्त वारी
कुशीमध्ये घे ना जरा गा ना गं अंगाई
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
आयुष्याचा प्रवास आहे खुप दुःखात आई
सुखाच्या आहेत इथे खुप थोड्याच प्रहरी
फक्त तुझी साथ लाभो आयुष्यभर आई
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
असनेही व्यर्थ इथे नसनेही व्यर्थ
पण तुझे प्रेम आहे सर्वस्व गुणकारी
जन्मोजन्मी भेटावी आई तुझीच सावली
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
तुझी माझी आहे ही पवित्र नात्याची कहाणी
किती लिहीली तरी अपुरी पडेल कादंबरी
कधीच कळनार नाही आम्हा आई तुझी महती
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
तुझ्या ठाई दिसते मजला माय रखुमाई
तुझ्या मायेने व्यापली अवघी दुनिया सारी
तुझीच आठवण येते बघ संकटाच्या वेळी
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी
जीवनाचा स्वर्ग बनतो सोबत तुझ्या आई
आयुष्य नरक आहे आई तुझ्या माघारी
सटवाई जरी गेली गोंदुण नशीब आपले भाळी
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी-
गुंतलो मी आहे | माझ्याच पाशात |
सर्वकाळ आत | कासावीस ||
कळेना कसा मी | वाहवत गेलो ||
तुला विसरलो | भगवंता ||
जडले विकार | उन्मादले गात्र |
कुठे ना आधार | आईबाप ||
मनी आहे मोह | क्रोध लोभ ईर्षा |
एवढी ही तृषा | नको देवा ||
आतातरी दाव | विठू तुझे रूप |
माझे सारे ताप | सरू दे रे ||
आता नको देवा | निराशेची झळ |
अंतरीचे बळ | वाढु दे गा ||-
दव ओल्या पहाट दिशी
लाजऱ्या वेली जैशी
मुक्त तू माझ्यात फुलावी
असेही एकदा व्हावे
कधी मोहरून जावी
कधी बिलगून यावी
तुझी लाली माझ्या गाली उमटावी
असेही एकदा व्हावे
कधी तू सोबत नसताना
तुझ्या मनाशी संवाद साधताना
माझी हाक तुझ्या कानी पडावी
असेही एकदा व्हावे
तुझी भक्ती करताना
स्वतःला तुझ्यामध्ये पाहताना
माझे 'मी'पण सरावे
असेही एकदा व्हावे
कधी सांजेला तुला लिहीताना
मग हलकेच हळवे होताना
तुझी सर माझ्या डोळी वहावी
असेही एकदा व्हावे
कधी मौनाचे संगीत ऐकताना
स्पर्शाची तार छेडताना
तुझे माझे सुर जुळून यावेत
असेही एकदा व्हावे-
या आयुष्याचे कळो मला प्रयोजन देवा
या वेदनेचे कळो मला कारण देवा
तिन्ही काळ असते केवळ ऊन माथ्यावर
या दुःखाचे कळो मला मर्म देवा
आपुलकीने किती वागलो मी तिच्याशी
तिनेच मग मला दिले हे एकटेपण देवा
दंश केलेला सर्प विषारी ही नव्हता खरा
कसे पसरले हे विष माझ्या आत देवा ?
जरी वनवासी झाले राम, लक्ष्मण, जानकी
कळले नाही मला नशीब उर्मिलेचे देवा
मी प्रेमगीत लिहिले होते माझ्या आयुष्याचे
त्याला सुर विरहाचे कसे जुळले सांग देवा ?-
हि ओढ तुझी वेडी व्याकुळ करते मजला
मी रंग तुझ्या नभाचा या देहामध्ये माळला
माझे 'मी'पण विसरलो तुला शोधता शोधता
'मी' मला गवसलो शोधत शोधत तुला-
आतातरी कुणीतरी भेटायला हवे
माझ्यातले एकटेपण सरायला हवे
एकल्या प्रवासाचा आला किती क्षीण
तुझे माझे नाते आता बहरायला हवे-
आईने में खुद को कौन देखता है आजकल
अपने आप से बातें कौन करता है आजकल
दर्द सीने में छुपा कर वह पत्थर बन गया
दर्द पर मरहम कौन लगाता है आजकल
दिल की बात उनसे कभी कह नहीं पाए
दिल की बात सुनता कौन है आजकल
अर्से बाद कुछ पल शांति से बैठे है
चैन से नींद लेता कौन है आजकल
जिंदगी के सफर में अकेला कर दिया लोगों ने
वफा की सैर कौन कराता है आजकल-