मनातलं वादळ, आज पुन्हा इकडे आहे,
सोबतीला दिसे क्षण, होते जे गमावले!
किती काही, काही नाही, मन भीत आहे,
चेहऱ्यावरचे बघा हे, कसे स्मित हेरावले.
मला नाही फिकीर, जो वारा तिकडे वाही,
मिठीत मज घेऊन, संग उभी माझी राणी!
माझं अदृश्य वादळं, कसं दिसतं तिलाही?
घट्ट बिलगून पुसलं, माझ्या डोळ्यातलं पाणी.
-