पाखरांना इतकं बोलकं आणि आंनदी
पाहिलच न्हवतं मी कधी...
कदाचित....आत्ताच 'त्यांना मोकळीक'
आणि 'मला सवड' मिळाली असावी...!!
-
रोजच्या धबडग्यात वेळ पुरत नाही,
आवड असली तरी सवड मिळत नाही.......
बरंच काही करणं शक्य पण,
कर्तव्याच्या चक्रव्यूहातून सुटता येत नाही.....-
मी आठवून येतो इकडे
तुझ्यासाठी चार ओळी
तुही इकडेच येऊन बघ
सवड काढून थोडी...-
आवड - सवड
आवड असली की सवड ही मिळते,
हे विधान कितपत योग्य वाटते.
कधी कधी आवड खूप असते,
पण प्रयत्न करूनही सवड काढता येत नाही.
आणि सवड न मिळाल्याने आवड ही पूर्ण होत नाही,
मग ती आवड एक इच्छा म्हणून मनात शिल्लक राहते.
कधी कधी ही इच्छा मनातून बाहेर डोकावण्याचा प्रयत्न करते,
पण कामाच्या व्यापापुढे तिचे एकही न चालते.-
अधीर मन..
पाहिजे तितका वेळ मिळत नाही,
तरी क्षणात काही सुचलं की लिहितो.
वाचतो तेव्हा वाटतं, उगाच मी लिहितो,
असं घाईघाईत लिहिण्याला काही अर्थच नसतो.
वाटते सवड मिळेल तेव्हाच काही लिहावे
पण व्यसनच लिहण्याचे असे लागले आहे,
क्षणाची जरी उसंत मिळाली की लगेच काहीतरी लिहिण्या मन धावत आहे.-
सजावट माझ्या मर्जीची
फुलं सुवासित रंगी बेरंगी हंगामाच्या सोई नुसार
धूप आणि अगरबत्ती माझ्या आवडीची
टाळ मृदुंग वादकांच्या सोई नुसार
मूर्ती वा चित्र माझ्या निवडीची
सजावट आणि आरास दुकानदाराच्या सोई नुसार
पूजा, अर्चना, श्रद्धा माझ्या सवडीची
निमित्त मात्र अडचण अथवा कठीण काळातील भक्तीच्या सोई नुसार-
प्रेमासाठी वेळ काढणे,
... नसे अवघड,,
खरंय... जिथे आवड...,
...तिथे सवड,,-
सवड काढून वेळ तर कोणीही देत...
वेळ नसताना सवड काढली...
तर खास आहे...
-