Rupali Jadhav   (रुपाली..... (सायरा✍️))
522 Followers · 235 Following

read more
Joined 20 March 2019


read more
Joined 20 March 2019
25 FEB AT 10:55

आज मी अडगळीची खोली पुन्हा उघडून पाहिली,
त्यात रचून ठेवलेल्या ग्राहांचे थर कदाचित वाढलेत आणि.....
वेदना मात्र बेवरीस सारख्या अस्त व्यस्त तश्याच सांडल्या आहेत!

-


15 JAN AT 11:25

तुझा राग जास्त ताणून ठेव
आणखी खेचले जाऊ!

-


11 JAN AT 18:44

प्रिय ....
एक सांगायचं होतं तुला....
केवळ फुलं,
पानं,
हिरवळ...दरवळ
चंद्र... तारे
इतकंच अपेक्षित नसतं अरे कवितेला
तिला हवं असतं

शब्दातून ओतलेलं मर्म
जाणीवांनी भिजलेलं वर्म

भावनांना स्पर्शलेलं कैवल्य
संवेदनांचं प्रांजळ कारुण्य

मळभ साचल्यावर इतकं भिजावं
मुक्या वळणावर नुसतं लिहावं

जीव पिळवटून जाईल
इतकं ओथंबून वाहणं

ऐलतिरिहून पैलतीरी
अबघं व्यासंग राहणं  

या पुढेही एक खूप सुंदर गोष्ट असेल ना...
तर ती म्हणजे
तू...!

©शब्दाळू

-


25 DEC 2024 AT 11:52

किती भयानक असतं ना....?!

ज्या व्यक्तीसाठी आपण वेळेची आहुती अर्पली असते,
त्या व्यक्ती साठी आपण फक्त वेळ घालवण्याचं साधन असतो!

किती भयानक असतं ना....?!
भावनाहीन माणसापुढे आपण भावानांची यादी मांडायची
आणि त्या व्यक्तीला या गोष्टी केवळ कटपुथलीचा खेळ वाटावा!

किती भयानक असतं ना....?!
आपण काळजाला पीळ देऊन किंचाळी फोडावी
आणि आपण ऐकणाराच्या हसण्याचा विषय बनवा!

किती भयानक असतं ना....?!
ओठांच्या आड दबक्या हुंदक्यांचा बांध साचलेला असतो
दातांमध्ये वेदना घट्ट चावून आवळलेली असते
आपण ना व्यक्त होऊ शकत,
ना कोणाला सांगू शकत,
ना ओठांवर आणू शकत
ना डोळ्यांच्या काठावर वाहू शकत
प्रश्नांच्या ठिणग्या डोक्याला सतत चावत असतात
इतक्या गर्दीतही आपण एकटेच भरकटलेलो असतो.
कुठे आहोत..? का आहोत..? कसे आहोत..? कुठवर आहोत..? काहीच पत्ता नसतो...
तोवर हातात जेमतेम जी निस्वार्थ नाती असतात, त्यांच्यात
आणि आपल्यात आपण नकळत दरी कोरलेली असते
आणि हेच शल्य शेवट पर्यंत आपल्याला गुदमरवत ठेवत असतं
किती भयानक असतं ना....?!
किती भयानक असतं ना....?!

-


9 DEC 2024 AT 10:43

चांदण्यांना अलगद स्वप्नात पेरण्याची सवय तुझी..,
अजूनही गेली नाहीये...!
आणि मला ती कवितेतून उतरवण्याची...!

-


19 NOV 2024 AT 12:00

तुला आठवतंय...?
आपल्या त्याच ठिकाणी आपण आभाळाला किती एकटक पाहत राहायचो ना? ....
आणि शोधत राहायचो, समजत राहायचो तुझं, माझं आभाळ...
तसंतास हरवून जायचो आपण...
कधी गवतावरून,
कधी डोंगरावरून,
कधी नदीवरून,
कधी मेघांवरून,
कधी चंद्रावरून,
कधी चांदण्यांवरून...
गर्द धुक्यांना मागे टाकत विहरत जायचो आपण...
दुरवर कुठेतरी अगदी खोल खोल तरंगत तरंगत जायचो...
ताऱ्यांना माझ्या अगदी पायदळी आणून ठेवायचास तू! आठवतंय ना तुला?



उर्वरित साहित्य मथळ्यात वाचा 👇

-


16 NOV 2024 AT 14:41

मी नित्याने वृंदावनी तुळशीला पाणी घालत राहिले आणि
ती अल्लड रुणझुणत्या पावलांनी बहरत राहिली घराला तिच्या तेज्याने....
घराला पावित्र्य परत गेली तिची सावली..
इवलीशी मंजिरी आज किशोर जाहली आणि आता.....
आता ऊन, वारा, पावसाची सर सगळं काही नव्याने समजतेय ती, अडखळतेय ती, धडपडतेय ती आणि मी?!....
मी घट्ट रोवून ठेवलेयत तिची मुळं माझ्या आईच्या नाळेने आणि फुंकरतेय हळूच तिच्या कानात दाटणाऱ्या कंठाणे...
"काळजी घे चिमणे!"

-


4 OCT 2024 AT 9:26

स्वयंस्फूर्त भाषा...
स्वयंभू भाषा...
अभिजात भाषा....
माझी "मराठी भाषा"

भाषेची संस्कृतीच तिला मोठं करत असते, राजकारण नाही!

🙏🚩 "माय मराठी चिरायू होवो" 🚩🙏

-


31 AUG 2024 AT 17:10

वाटेतील कित्तेक क्लिष्ट निंदांना ती लाथाडत, अस्मितेवर विश्वास ठेवत कित्तेक काट्यांवरून आणि निखाऱ्यांवरून अजूनही चालण्याची तिची कला आणि धाडस ठरवून सुद्धा कोणालाच थांबवणं जमलं नाही!
समृद्ध असण्याचं आंदन तिला पवित्र करून जातं! आणि ती पुन्हा चैतन्य पेरत पुढचं पाऊल टाकत असते!


(भाग ३)

-


31 AUG 2024 AT 17:05

निरागस डोळ्यांची झेप कुठवर समजावी?... तिची दृष्टी तर वाईट नसते. "तिला फक्त शोधायचं असतं तिचं मुक्त आभाळ, कुठलीच ईर्षा मनात नं धरता.." ती सांधत असते नवनवे पर्व विचारांनी आणि स्वैर करत असते स्वतःला स्वतः चे प्रतिबिंब शोधत... नेणिवेच्या गर्भातून ती किंचाळत असते प्रसूती कळा आणि शब्दा शब्दातून जोडत असते चैतन्याची नाळ!
तरीही.... तरीही... कुठूनतरी शंकांचे आणि निंदांचे वार तिच्या निरागस पापण्यांना चिरत असतात आणि तिच्या भळभळणाऱ्या दुःखातून समाज नुसताच शोधत असतो त्यांच्या मनातील निरर्थक क्लेश ज्याची कसलीच निशाणी तिच्या डोळ्यात त्यांना कुठेच सापडत नाही, पण सापडतं ते फक्त त्यांना स्वतःचं न समजणारं मलूल प्रतिबिंब!


(भाग २)

-


Fetching Rupali Jadhav Quotes