Chaitali Bari   (shubhangi)
368 Followers · 256 Following

read more
Joined 11 November 2020


read more
Joined 11 November 2020
18 OCT 2023 AT 20:31

आजकाल माझ्याच भावना मला कळत नाहीत
आजकाल दूःख आणि आनंद फारसे जाणवत नाहीत

-


19 JUL 2023 AT 13:53

शब्दच सूखावतात , शब्दच दूखावतात
आपल कोण आणि परक कोण ॽ
हे नात्यांच गणित शब्दच ठरवतात

जवळची माणस दूरावतात
अनोळखी ती आपलीशी वाटतात
हा खेळ शब्दच खेळतात

शब्द म्हणजे अमूर्त साथ
विश्वासाचा हाती घेतलेला हात
पाळला तर ऊरते किंमत
नाहीतर बोलाचीच कढी अन बोलाचाच भात

मग करायलाच नको उद्याची बात
कशाला ऊगाच पाडून
घ्यायचे आपण आपले दात

शब्द बांधतात निशब्द करणारी इमारत
शब्दच घडवतात रामायण अन महाभारत
शब्दच ठरवतात माणसाच माणसाविषयी मत

शब्दच काढतात ऊणीदूणी शब्दच आणतात आणिबाणी
शब्दांपूढे कधीकधी फिकी पडतात खणखणित नाणि
अन शब्दांशिवाय अबोलच सारी भावनांची येणीजाणी

शब्दच शिकवतात किती महत्व द्याव कूणाला
कूणासाठी किती जीव लावावा पणाला
दिलाच जर शब्द तर पाळावा क्षणोक्षणाला

शब्दच ठरतात कारण माणस दूरावण्याला
तर कधी कूणाच्या कायमच निघून जाण्याला
शब्दांशिवाय अर्थच नसतो जिवनगाण्याला

शब्दच ठरवतात कूणाचा किती असावा बोलबाला
शब्दांमूळेच होतात खोलवर जखमा मनाला
शब्दच ठरतात मलम दू:ख निवारण्याला
शब्दच देतात साद हसण्या रडण्याला

शब्द असतात बोल शांत वाणीला
शब्दांपलीकडे आवाजच नसतो लेखणिला
भावनांच्या कागदावर व्यक्त होण्याला

-


13 JUL 2023 AT 19:20

अभावाची आस जितेपणी झूरून मारते
दाखविता आरसा सत्यास गारठ्याविणा शहारते
समाधानात स्व ची जाणीवच अस्तित्वात आणते
नम्रताच जीवनात आदर बाणते

-


12 JUL 2023 AT 20:15

लेखणीने स्पंदनांची न ऐकलेली साद व्हावे
वादापलीकडील निनाद संवादातून काव्य हे गूंफावे

त्राग्यावीणा समाधानाशी जोडणारा धागाच असावे
भावनांनी शब्दरूपी जागा मिळवूनी मिरवावे

कधीकधी शब्दच अपूरे पडावे अन भावनांनी अव्यक्त रहावे
कधि भावनांना शब्दात न वोवता यावे

कधी भाव शब्दांची जागा घेण्यात मागे पडावे
अन अबोल अक्षरांना सारेगमग दिसावे

शब्द अन भावनांनी कधी जागेत न सामवावे
हे एकसूत्रीपणाचे कोडे उलगताना
काव्यप्रवासात कवीन स्वताला नव्यानच गवसावे

जीवनाचे अनोळखी वळणही आपसूक ओळखीचे व्हावे
अक्षूंनी कधी दाटून यावे अन शब्द काहीसे गोठावे

वेदनांनी अंतरंगात साठुनी कागदावर अवतरावे
मन काहीसे कोरे कोरे व्हावे शाईच्या रूपान
लेखणीतून काव्य हे स्फूरावे

भावनांशी यमक साधूनी शब्दांचे योग व्हावे
आलिंगण देवून रसिकमनाला नव्यान ओळखीचे व्हावे

मनाची खिडकी बंद होता शब्दांचे वारेही थांबावे
शब्दांनी रूसून बसता लेखनीचेच श्वास सूटावे

जीव मेतकूटिस येता कधी कासावीस होऊनी पदरिचेच उसने घ्यावे
असे काहीसे कविन काव्यात बूडाबे

न हरवता भान भावनांशी घालून सांगड शब्द मोजके वेचावे
रचनेमागेही गूढ मतितार्थ असावे

-


24 JUN 2023 AT 21:09

कधिकधि व्यक्त होतो हा जीव
तेव्हा वाटू लागते स्वतालाच स्वताची किव

सारखी जाणवत असते तूझीच उणीव
का रे गमावली नात्यान विश्वासाची निव

-


24 JUN 2023 AT 20:58

स्वतसमोर हो रोज थोड व्यक्त
आता कर स्वताच स्वतला सक्त

नाही या जगात खरा कूणीच प्रेमभक्त
स्वतासाठीच जगायच आणि मरायच फक्त

का जाळतेस क्षणोक्षणी रक्त
उरल ना या जगती कूणी कूणासाठी आसक्त

लोक करतात क्षणाची मदत
आणि बोलून दाखवतात वारंवार अग फक्त


-


24 JUN 2023 AT 20:45

जेव्हा जाणवत आहेत शरिरात प्राण
सारख वाटत हरवलेत आता सारे त्राण

खर आहे हे तूला गमावल आणि गेली सारी आनबान
ना उरला कूठेही कवडीचा मान

लिहली का या नशिबात एवढी देवा वनवन
झाल का उब्रूच अस हरण

कर ना आता तरि संकटातून तारण
असेलच ना काहीतरी समस्यांच तूझ्याकडे निवारण

-


18 JUN 2023 AT 19:12

तूझ्या हितासाठी झटतांना विसरून स्वतला आयूष्य हा झोकेन
वाट तू चूकलास जरी हाच वठणीवर तूला आणून वळणार लावेन
चूक तूझी असता काळजीपोटी चार लगावेन

पण तूझ्या डोळ्यातून पाणी आले तर शञूलाही फोडेन
सार्या जगान लाथाडले तरी जन्मदाता तो एकट कस पाडेन
मागण्याआधी हात आधाराला असेन

स्वताच्या धूंधीत जगतांना कसाही घाण झालास
धडपडून पडलास जरी अलगद वर जपणाराच काढेन
काटे तूला बोचण्याआधी त्यालाच तूझ्याआधी कळेल

मागण्याआधी तयार जिथे सारे आभाळभर माया
अन प्रेमासोबत काळजीचे भोवरे
दूसरा कूणी कुठे कशाला शोधतो तोच देव ना रे

मित्रपरिवार अन नाते सोयरे असतीलच
पण बापाची जागा दूसर कशान भरेन का
बाप म्हणतात तरी का
तूला मला या तरी जन्मी कळेल कारे

आईएवढा त्यालाही जरा जपा ना रे
हाच देवमाणूस पून्हा शोधून तरी मिळेन का
राबतांना गर्दीत हरवत चाललेला पिता
आपल्या नव्या पिढीलाही कधी दिसेल कारे

-


28 APR 2023 AT 19:16

..........

-


23 APR 2023 AT 21:35

......

-


Fetching Chaitali Bari Quotes