आठवणीतली शाळा.....
धावपळीच्या जीवणापेक्ष्या,बालपणातली शाळा बरी होती,
प्रांगणात शाळेच्या,मुलांची रांगोळी जणू घातली होती.
पत्र्याच्या शेडमध्ये,आमची आठवी ते दहावी घडली होती,
काळ्याकुट्ट फळ्यावर,पांढऱ्या खडूने आमची भविष्य लिहिली गेली होती.
मराठीच्या तासाची भीती खूप वाटायची,कारण गृहापाठची वही अपूर्ण असायची,
काना,मात्रा ची कधीच भेट नसायची,अन सरांच्या हातात नेहमी छडी दिसायची.
हिंदीच्या विषयचं आम्हाला काही कळेना,सरांचं काय चाललंय हेच समजेना,
हिंदीचा व आमचा कधी बसला नाही मेळ,वर्गात नेहमी चाले शब्दांचा खेळ.
इंग्रजीच्या सरांना आमच्यात प्राणीच दिसायचे,वर्ग जणू त्यांना जंगलचं वाटायचे.
व्याकरणाची व आमची कधी झाली नाही भेट,सर म्हणे तू आता निघ घरला थेट.
गणिताच्या सरांचा दरारा मोठा,त्यांच्या वाळलेल्या हाडांवर समीकरणचा साठा.
प्रार्थनेच्या प्रांगणाला नेहमी एकचं धाक,'अरे कळलं का'हीच सरांची हाक.
भूगोलच्या तासाला जेवणाची सुस्ती असायची,सर क्षणार्धातचं फळ्यावर पृथ्वी साकारायचे.आणि इतिहासामधली दोन्ही महायुद्ध एकाच तासात घडवायचे.
प्रत्येक विषयांची तऱ्हाच न्यारी, आजच्या नोकरीपेक्षा आमची शाळाच लय भारी.
शाळेसमोरून जाताना आजही आठवते ती रंगीत कपड्यांची वेगळी रांग,
पुनर्जन्म झाला तर देवा,हीच देशील का मला आठवणीतली शाळा नक्कीच सांग.
#शोध मनाचा.....
:-अमोल पाटील.....
-
शाळा🏫
एक छप्पर कौलारू,आणि होत्या चार भिंती .
काय सांगू मित्रा तूला, अशीच माझी शाळा होती.
शाळेत वावरताना कधी कशाचीच तमा नसायची
दंगा मस्ती खूप असायची, पण शिस्त मात्र दिसायची.
शिक्षकांचा दरारा आणि भीती शाळेतही तेवढीच होती.
पण आदर देताना मात्र कशाचीच कमी नव्हती.
पावसाळ्यात गड्या एक, वेगळीच मज्जा यायची.
छपरातून पाणी गळताना बेंचची सारवा सारव व्हायची.
का आज अचानक मला माझ्या शाळेची आठवण आली.
डोळ्याची पापणी मात्र पाण्याने, अलगद थोडी ओली झाली.
शाळेतल्या त्या दिवसांना सर कशाचीच येणार नाही
आठवणींशिवाय आपल्या हातात काही उरणार नाही
कशीही असली तरी, शाळा माझी मस्त होती.
तिच्या सारखी दुसरी गोष्ट या जगात कोणतीच नव्हती.
शाळेबद्दल लिहीताना उर माझा भरून आला.
पण मीही काहीतरी लिहीले याचा आनंद वेगळाच झाला.-
पक्ष्यांची शाळा भरता,
मन माझे विद्यार्थी होऊ पाहते.
किलबिलाट ऐकू येता,
नयन हसू, हृदय गाऊ पाहते.-
सांग सांग भोलानाथ,कोरोना जाईल काय ?
परिस्थिती सुरळीत होऊन,शाळा सुरु होईल काय ?
भोलानाथ मास्कच राज्य जाईल काय ?
मित्रमैत्रिणींबरोबर डबा खायची मजा घेता येईल काय ?
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा,
आठवड्यातला रविवार गायब होऊन सोमवार येतील का रे तीनदा ?
भोलानाथ कोरोनाला लवकर हाकलता येईल का ?
शाळेत जाऊन शिक्षकांकडून ज्ञानामृताची चव नव्याने चाखता येईल का ?
भोलानाथ आमची ऑफलाईन शाळा सुरु होईल का ?
शिक्षकांसमोर बसून जोमात पेपर देता येतील का ?
भोलानाथ जादूच वरदान मिळेल का ?
पापणी माझी लवेपर्यंत कोरोनाला गायब करता येईल का ?-
खूप काही घडून गेलं..आता कुठे जीवन समजतं आहे,
लहानाची झाले मोठी पण आता खरी शाळा शिकते आहे....
अर्थ एक एक लावता लावता सावधानतेचा टोल पडतो आहे,
मनाचा डब्बा भरलेला तरीही मी मात्र अजुन उपाशीच आहे..
गिरवताना आयुष्याचे धडे, अनुभवांचा मार पडतो आहे,
मार खाऊन रडत न बसता,नवनवीन विषयांचा अभ्यास रेटते आहे..
गोड स्वभावाच्या माणसांना भेटून चॉकलेटची गोडी चाखते आहे..
आयुष्याच्या शाळेत दांडीच नसते, याचीच मनाला जास्त खंत आहे..
चार भिंतींची नसली तरी खरंच प्रत्येकाचं आयुष्य एक शाळा आहे..
लहानाची मोठी झाले तरी,
मनावरचं ओझं उतरवण्याची जागा अजूनही आईची मायाच आहे..
अजूनही आईची माया आहे...-
हाती पुष्पगुच्छ देऊन
स्वागत त्या लाडुल्यांचे
शाळेच्या प्रवेशात्सुक विद्यार्थ्यांनी
नमन केले शिक्षकांचे
सुंदर रांगोळी अन् फुगाची आरास
तुमच्या स्वागतासाठी सारे खास
बालगोपालांचा सजला मेळा
शाळेभावती झाला गोळा
घंटा पाहिली होईल शाळेची
नवी खुमारी पहिल्या दिवसाची
पुस्तके नवी पाटी नवी
आई दप्तर व छत्रीसुद्धा घेऊन दे ना नवी
हट्ट सुरु बालकांचा
सुंदर हवा असा कल्ला शाळेचा .-
फळा आणि खडू
लागलेत रडू....
विचारत आहेत प्रश्न शाळा कधी सुरू...?
छम छम छडीचा नाही राहिला धाक
ढीगभर सुट्टी आणि परीक्षाही माफ ...
Digital फळ्यावर
online शाळा
goggle. वर हजेरी
YouTube. चा लळा
मोबाईल च्या स्क्रीन वर
मैदान गाजत आहेत...
Pubg तल्या बंदुका
रातभर वाजत आहेत...
आता वाजेल का घंटा
शिजेल का सुकडी...?
लक्षात तरी राहील का
इयत्ता आणि तुकडी...?-
जून महिना आला
की लगबग सुरू व्हायची.
सुट्या संपून शाळेची ओढ लागायची.
नवा वर्ग, नवे शिक्षक, गणवेश नवा.
वह्या पुस्तके अन दफ्तरही नवे.
पावसात रेनकोट आणि गमबूटही हवे.
गावची शाळा मात्र जरा निराळी होती,
नव्याची नवलाई त्यातही होती.
नवं रान ,नवं शिवार, पानकाळा नवा.
शेतातली कामं उरकून,
मंग शाळेत जावा.
मास्तरबी त्योच अन त्याचा
मार बी कचकून खावा.
बाकी सगळं जुनं असलं,
तरी शिकण्याचा ध्यास नवा.
शिकण्याचा ध्यास नवा...-
आख़री बार जो किए थे पक्के वादे
महज़ तस्वीरों में कैद होकर रह गई यादे-