आयुष्याच्या वाटेवर निरंतर चालत रहावं.
निरागसतेच्या लाटेवर चिरंतर स्वार व्हावं.
कधी अबोल भावनांचं आभाळ व्हावं,
तर कधी मोकळ्या शब्दांचं वादळ व्हावं.
कधी समजदारीचा आधार व्हावं,
तर कधी वेंधळा पाऊसाची संततधार व्हावं.
कधी क्षितिजावरचा कठोर सूर्य व्हावं,
तर कधी मधुराचा मऊ चंद्र व्हावं.
कधी स्वप्नांच्या जगात हरवून जावं,
तर कधी भावनांच्या गर्दीत स्वतःला पहावं.
सुख दुःखाच्या ऊन सावाल्यांतून सावरत स्वतःला, मनसोक्त जगत जावं,
आयुष्याच्या वाटेवर निरंतर चालत रहावं,निरंतर चालत रहावं...!!
#शोध मनाचा...!!-
प्रिये...!
मी झाड होतो, तू फांदी हो,
मी पाऊस होतो, तू माती हो.
मी चंद्र होतो, तू चांदणी हो,
मी साथ होतो, तू संगिणी हो.
मी सूर होतो, तू ताल हो,
मी लय होतो, तू चाल हो.
मी दिवस होतो, तू रात हो,
मी दिवा होतो, तू वात हो.
मी ऊन होतो, तू वारा हो,
मी आभाळ होतो, तू धारा हो.
मी सुई होतो, तू धागा हो,
मी कृष्ण होतो, तू राधा हो..❤️😊
-
पाऊसाची भेट क्षणभराची जरी असली,
तरी आठवणींचा गारवा कायम असावा.
ओठांवरच्या शब्दांनी अबोलका का होईना,
पण नात्यांचा मोगरा कायम हिरवा दिसावा....!!-
"काळ" ओसरून जातो,पण
काळाने दिलेले घाव कायम जिवंत राहतात...!!-
पेरणी.💚
पडला पाणी, माती झाली ओली,
शेत आलं रांधायाला, पेरणी आली.
लगबगीची सगळीकडे धांदल झाली,
पाखरांच्या पंखांनाही नवी बोली आली.
बहरेल रान आता गुलमोहरासारखं,
उजळेल मन आता मोरपंखासारखं.
गातील गाणं वारा कोकीळासारखं,
फिटेल पारणं डोळ्यांचं चातकासारखं.
उधळेल मातीतुन हिरव्या रंगाचे सडे,
वाजतील चाहुदिशांना घागरमाळांचे चौघडे,
फिरतील बंधांवरून भविष्याच्या दिशा,
बहरून जाव्यात सगळ्या स्वप्नांच्या आशा.
#शोध मनाचा.....!-
"प्रेम" ही एक खूप सुंदर "संकल्पना" आहे, फक्त तिला तितक्याच "सोज्वळतेनं" जपता यायला हवं...!
-
वाटा चुकीच्या नसतात कधी,
चुकतो तो प्रवास,
दिशा चुकीच्या नसतात कधी,
लाभतो तो सहवास.
वेळ चुकीची नसते कधी,
चुकते ती निवड,
माणुस चुकीचा नसतो कधी,
चुकते ती आवड.-
पाऊस आहे खिडकीच्या
बाहेरही,अन मनाच्या आतही.
ओली झाली झाडांची पानं, दारावरही,
भळभलेली जखम, काळजावरही.
कोसळतो आहे पाऊस, ढगांतूनही,
ओघळतो आहे पाऊस, डोळ्यांतूनही.
दाटलेले काळे ढग, अभाळातही,
कोसळलेले अश्रूनभ, हुंदक्यातुनही.
#शोध मनाचा.....!-