QUOTES ON #पाडवा

#पाडवा quotes

Trending | Latest

काय मागू तुझ्याकडे पाडव्याचे दिनी
हवी फक्त मला तुझ्या प्रेमाची ओवाळणी l
नको मला दागिने अन् नको ती पैठणी
सोबत रहा आयुष्यभर तू प्रत्येक क्षणी ll

© Sanket

-



अधर्माची अवघी तोडी । दोषांची लिहिली फेडी ।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवी ।।
~संत ज्ञानेश्वर

सर्वांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

-


28 OCT 2019 AT 6:44

**"पाडवा"**
माझ्या आनंदाचा ठेवा म्हणजे "अहो" तुम्ही आहात...
माझ्या हसण्याच गुपीत.. चैतंण्याचा अखंड झरा केवळ
तुमच्यामुळेच सदैव खळाळतो माझ्यात.. मला त्या... विधी लिखीताने दिलेली अमुल्य भेट म्हणजे "जी" तुम्ही आहात... मला सतत प्रोत्साहन देऊन विश्वासाने
जी साथ देता न तेव्हा न तर स्वर्ग फक्त दोनच बोट राहिल्याचा भास होतो.. संसार वेलीवरील दोन गोंडस फुले... जगण्याच मर्म झिरपवतात जीवनात.. तुमच समाधानान भरलेल मन तृप्ततेची शाश्वती देते... तुमच्यातील भूतदया मला ममत्व शिकवून जाते.. शब्द ठेवा नाही हो माझ्याकडे ... तुम्हाला सांगण्याकरिता.. बरोबरीने सन्मान देण्याचा तुमचा गुण... त्यावर जीव ओवाळुन टाकावासा वाटतो.. शतदा झुकतो माथा तुमच्यातील मातृकर्मा पुढे.. माझ्या प्राक्तनाचा अनमोल बंध आहात तुम्ही... या पाडव्याला .. इतकच मागते त्या करूणा कराला... हा अनमोल ठेवा माझा.. जपुन ठेव... शेवटच्या श्वासापर्यंत... आणि केवळ तुझ्यामुळेच या सुंदरशा जीवनावर हजारदा प्रेम करावे वाटते... नव्हे करतेच...🙏🙏🙏❤️❤️🌹🌹 तुमचिच कल्पना...

-


16 NOV 2020 AT 15:00

नवऱ्याने कपाळी लावलेलं कुंकू
बायको जन्मभर आनंदाने मिरवते.
बायकोने कपाळी लावलेलं कुंकू
मिरवायला नवऱ्याला वर्षातून एकच
दिवस असतो....पाडवा...

-


18 MAR 2018 AT 0:07

आला चैत्राचा महिना, नववर्षाचा नवदिनं,
नवा अध्याय प्रारंभु, पाडव्याच्या साक्षीनं.

स्वप्नांच्या आकाशी, सजवू कर्तव्याची गुढी,
काठीपरी ताठ माना, अन् सुवास चंदनी.

चढवू समृध्दी ची साडी, वर भाग्याचा पेला,
गिळू लिंबाची कटूता, कंठी गोड गाठी माळा.

नको गर्वाचा लवलेश, मान-अपमानाची वाणी,
'स्नेह' शाईने लिहूया, नववर्षाची कहाणी...

-


13 APR 2021 AT 20:14

गुढी आपल्या नात्याची, उभारू दोघे सोबतीने
साथ दे अशीच कायम, संसार करू गोडीने
प्रेमाचे नाते आपले,बांधू रेशमी धाग्याने
हाती हात घेऊनी, आयुष्य जगू जोडीने.

-घाडगे सलोनी

-


13 APR 2021 AT 7:40

जर तुझी साधी...
पुसटशी चाहूल...
वाढवत असेल माझ्या...
जगण्यातला "गोडवा..."

तर म तुझे हे असे...
सजून..सावरून..मोहरून...
अवतरणं म्हणजे...
तुझ्यावर पुन्हा भाळण्या...
नयनांचा "पाडवा"...

-



धरीच साजरा करा पाडवा
कराेनाला बाहेरच अडवा

-


25 MAR 2020 AT 1:09

शुभ

युगादी
उगडी
चेटीचंद
नवरेह
संवसर पाडवो

इति

"गुढी पाडवा"

-


27 OCT 2019 AT 23:57

प्रिय बाबा,

तुमच्या सारखा 'बापमाणूस' लाभायला
देखील भाग्य लागतं..!!

पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..🙏

-तुमचीच लेक

-