Apurva K.   (Apurva N.)
42 Followers · 10 Following

Fresh own content mostly in Marathi & English
Joined 5 March 2019


Fresh own content mostly in Marathi & English
Joined 5 March 2019
23 MAY 2022 AT 10:45

कुणी इतकंही
समजूतदार असू नये,
की त्याच्या समजून घेण्याची
जगाला सवय व्हावी..


कुणाला इतकंही
गृहीत धरू नये,
की पावलं सोबत असूनही
संवेदना शून्य व्हावी..!

-


28 APR 2022 AT 17:30

करड्या ग्रीष्माच्या अंगाऱ्यानंतर,
घनघोर गहिऱ्या मेघांसारखा तू आलास,
मी ही आतुर झाले,

तुझ्या मिठीत सुखाने विसावत,
सगळ्या भावनांचा काठावर निचरा करत,
मी ही शहारून उठले,

प्रेमाची नि:शब्द बरसात करून,
निरभ्र तारांगण ओढून तू शांत निजलास,
आणि
तुझ्या भेटीने तृप्त झालेली मी ही
तुला निरखत निवत जातेय...!!

-


14 DEC 2021 AT 23:17

एक शांतता.. अंगावर येणारी
आणि एक ही...

यंत्रांचं जग थांबल्यावर,
झाडांची पानं मिटल्यावर
आणि..
सतत पळणारी माणसं थकून निजल्यावर..


निसर्गाचं दुसरं मोहक रूप ठळक करणारी,
रातकिड्याच्या लयीत,
घड्याळ आणि हृदयाचे ठोके विसरायला लावणारी
दुसरी शांतता...

मनाच्या आत खोलवर झिरपत जातेय नं?

-


14 NOV 2021 AT 18:12

जडावल्या पायांनी चालता चालता जाणवलं,
पावलात बळ असलं तरी ओझं मनावर होतं,

मग खूप मागे पडलेली लहानगी मीच मला दिसले,
नवीन पाऊलवाटा ओळखीच्या करताना जिला विसरले,

मला म्हणाली, 'काय झालं? कशी गं झालीस,
कधी काळी माझ्या सारखी धीटूकली होतीस?

वय वाढत गेलं तशी एक एक पाकळी मिटत गेलीस,
कापसाची म्हातारी सुटी होत जावी तशी विखुरत गेलीस'

तिचं बोलणं ऐकून मग मलाही जाणवत गेलं,
माझ्या मनाकडे ही जगाच्याच चष्म्यातून याआधी पहिलं,

तेव्हाच ठरवलं, स्वतः कडे बघायला चष्मा कशाला हवा,
फार काही नको फक्त लख्ख चमकता आरसाच ठेवा!

-


19 OCT 2021 AT 22:01

पूनम के उस चाँद को
आज सबने पुकारा होगा,
ए मेरी शर्मीली चाँदनी
तेरा साथ भुलाना बे-उसूल होगा।

-


17 OCT 2021 AT 1:00

पूर

पूर ओसरला,
गावी पुन्हा जाग आली,
किलबिलाट झाला,
नव्याने बाजार सजला,
सण ही साजरा झाला,
गोडधोडाच्या पंगती उठल्या...

सारं तसं पूर्वी सारखंच खरंतर...
काही थोड्याच गोष्टी घडल्या...
१. तीव्रता मंदावली,
२. पुराच्या पुसटशा खुणा उरल्या
आणि....
३. गंभीरता वाढली... पण..
प्रवाहाची की.. गूढ स्मितामागची..??

-


3 OCT 2021 AT 1:46

ओळखीचं 'अनोळखीपण'


हे असं सोबत असूनही
दोघांत शांततेने मुक्काम ठोकणं,
सरकत्या घड्याळ्याच्या काट्यांचा,
संथ लयीतल्या श्वासांचा किंवा
फक्त मोबाईलच्या की-पॅडचा येणारा आवाज,
मध्येच कधी तरी लटका खटका उडणं,
मिठाईदार प्रेमळ कवितांच्या रंगीत कागदांपेक्षा
कोरडे हिशेबाच्या कागदांची रद्दी वाढणं..

हे सगळं नक्की प्रत्येक नात्याच्या प्रवासात घडत असेल का?
की तू आणि मी पुन्हा ओळखीचे अनोळखी होत आहोत..??
प्रेमात पडण्याचं हे ही एक नवीन वळण असेल बहुधा......!!!

-


8 SEP 2021 AT 14:52

Each fingerprint
and every heart
is unique,
let's accept it's
individuality..!

-


14 JUL 2021 AT 16:48

नजरेत गूढ भासले की,
कलीजा खलास झाला
शब्दांत पेरलेस ते तारे,
नभीचा चंद्र करी आला..

अस्तित्व तुझे भवताली,
आश्वस्त मजला करते
सात पावला पलीकडचे,
नाते पुरून उरते...

-


10 JUL 2021 AT 21:14

To those crazy people..

who used to count shining stars,
who used to share deep secrets
and find a peace
staring at that moonless starry sky.

May be they all have found stars
pasted on bedroom ceiling
more eye catchy.
Or may be technology and gadgets
have done some magic on them.

And that's why the sky must be looking
with lonely eyes towards the planet
in the search of new crazy friend..

-


Fetching Apurva K. Quotes