QUOTES ON #दुरावा

#दुरावा quotes

Trending | Latest
23 FEB 2021 AT 15:38

आज हरवली नाती
करपली माणुसकीची काठी
शब्दाने शब्द वाढले
अंतर मनात साठले
न जाने कसे .....

-


2 JUL 2020 AT 22:30

लांबूनच पाहून समाधान मानावे,
पत्रांच्या शब्दांत गुंतून राहावे...
प्रत्यक्ष भेटीलाही अपवाद नसावा,
सांग ना रे,का हा दुरावा?????

-


3 JUL 2020 AT 13:52

तुझ्यापासून दूर जाऊन मी जगायला शिकतेय,
ह्या निष्ठुर जगाकडे नव्याने बघायला शिकतेय...
तुझ्या नजरेत खोळंबल होत माझ जग सार,
पण या विस्तृत जगाकडे तुझ्या नजरेतून पाहायला शिकतेय...

-



आजही हृदयामध्ये तुझ्याचसाठी
आसमंत प्रेमाचा बहर येतो,
दुराव्याची हुरहुर दाटता मनी
मग डोळ्यात असवांचा कहर येतो.

-


20 SEP 2019 AT 16:25

"सवय" लागली सखे तुझी मला,
नको न आता हा दुरावा ..!

चुकलेल्या माझ्या या "मनाने",
अजून किती "पच्छाताप" करावा.. !!

-


27 DEC 2018 AT 10:48

मीचं आपला म्हणतो तिला की
माझी आठवण नाही का आली,
तिचं त्यावर उत्तर
" तुझी आठवण सारखी यायला
मी काय तुझ्या लय लांब नाही गेली.

असं काही ऐकून मग पुढे बोलायला
धिरच होत नाही,
भांडाव तरी कसं आता कारण
तिला भांडणाच कारणच कळत नाही.

मी रागात देतो उत्तरं तरी
तिचं सारं नॉर्मलच असतं,
इतक्या दिवसांच्या अबोल्यानंतरही
तिला काहीच कौतुक नसतं.

मी आपला गप्प होतो अन ती
बोलायचा विषय बदलते,
माझ्या मनाची मीचं घालतो समजूत
कारण दरवेळी हे असंच घडते.

-



दुरावा म्हणजे नात संपलं
अस होत नाही
पुरावे लागतात तुला कारण,
दुराव्यात तुला प्रेम दिसंत नाही..!!


-


25 SEP 2018 AT 9:10

ओळख ना मन, का हवा प्रेमाचा पुरावा ..

-


23 JUN 2018 AT 0:18

पुन्हा एकदा तुझ्या रुपात
आयुष्यात माझ्या प्रेम जागृत झाले...
परंतु जुन्या काही आठवणींने
माझ्या हृदयाचे‌ ठोके वाढू लागले....
आता तरी चूक पुन्हा होणार नाही
आणि मैत्रीत दुरावा कधी दिसणार नाही..‌...

-


20 SEP 2019 AT 22:05

जिंकायचय तुझं मन प्रिये
मग का हा प्रियकर हरावा...?

केवढा तो स्वाभिमान प्रिये
किती हा अट्टहास धरावा ...!

-