🅢︎🅤︎🅜︎🅘︎🅣︎ 🅡︎🅐︎   (सुमीत्रा G इबितदार)
853 Followers · 76 Following

read more
Joined 28 April 2020


read more
Joined 28 April 2020

लेक म्हणजे सोनं
लेक म्हणजे कुणाचं तरी देणं
लहानपणापासून तीला जीव लावून
काही दिवसांनी तीच्यासाठी परक होणं

लेक म्हणजे मायेचा पिटारा
लेक म्हणजे आनंदाचा वारा
लेक म्हणजे बापाचा श्वास
लेक म्हणजे म्हातारणाची आस

लेक म्हणजे कुणासाठी भार
लेक म्हणजे कुणासाठी आधार
लेक म्हणजे तीच ती हो
जीच्या मुळे एक होतात दोन परिवार.

लेक म्हणजे वात्सल्याची सुरुवात
लेक म्हणजे लक्ष्मीचे स्वरूप घरात
लेक सु-संस्कारांचा जणू पूर
लेक म्हणजे वंशाचा अंकुर

-हो प्रेमात आहे मी आता कशाचेही भान नाही
तुझ नाव माझ्या कवितेत नाही अस एकही पान नाही !

-येशील जेंव्हा तु मला भेटायला
सोबत मला तु घेऊन ये
होऊन थोडासा बिनधास्त माझ्याशी
लाजणे तुझे तीथेच ठेवून ये

अजूनही थोडीशी बालीश आहे मी
तुझ्यातला तो समजुतदारपणा तसाच राहू दे
माहित नाही मला काय भेटते तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून
जगातले सर्वात मौल्यवान सुख भोगण्यासाठी मला तुझ्या मुखाकडे पाहू दे

मी आहे इथेच प्रतिक्षेत तुझ्या
लवकर माझा आनंद घेऊन ये
नको कोणते सुख मला आयुष्यात
तु ये लवकर आणि मला सुखावून जाऊ दे..

-हुंदक्यांची गर्दी दाटते तुझी आठवण येता
मी माझीच न राहते तुझ्या प्रेमाची झुळूक येता

कोण जाणे कधी येवढा माझा जीव तुझ्यावर जडला
तुझ्या आठवणीत विरुन जाता एक एक आसू रडला.

आज थोडासा जास्तच रे ह्रदयाचा ठोका धडधडत होता
तुला भेटण्याच्या ओढीमध्ये हा जीव माझा तडफडत होता.

-पावसाच्या गारव्यात अंग शहारून येताना
तुझी एक गोडशी मिठीही पुरेशी आहे
तुझ्या प्रेमाच्या पावसात नेहमी भिजताना
तुझी एक गोड हसरी छबीही पुरेशी आहे.

-खट्याळ इशारा हा पावसाचा
मज आज काही सांगतो आहे
बरसणाऱ्या ह्या सरीमध्ये रमायला
तो सहवास तुझा मागतो आहे.

-बिना हतियार के ही वार करती है
ये मोहब्बत भी ना जहर का काम करती है!

-फुलला मोगरा अंगणी माझ्या जेंव्हा आज तुझी याद आली
माळला होता मी गजरा तुझ्यासाठी त्या क्षणाची आठवण झाली.

-हास्य तुझ्या चेहऱ्यावरचे माझ्यासाठी खास आहे,
तुझ्या त्या हास्यामुळे माझ्या आयुष्याला आरास आहे.

-


Fetching 🅢︎🅤︎🅜︎🅘︎🅣︎ 🅡︎🅐︎ Quotes