sachin dhere   (सका)
933 Followers · 2.7k Following

read more
Joined 8 August 2018


read more
Joined 8 August 2018
17 DEC 2018 AT 20:06

उत्तरदायित्वा परि अस्तित्व.

-


9 DEC 2018 AT 23:10

चाहूल

दोघांच्या प्रेमाला प्रकृतीची साद,
मिटून सारे वाद, मिळतो आशीर्वाद.

अवचित सासूच काढते सुनेची दृष्ट,
भासणारं सारं कष्ट क्षणातच होते नष्ट.

उमटते हसू, मिटून कपाळाची आटी,
आनंदाश्रू टिपते गालांची हासरी वाटी.

इवल्याश्या चिमुकल्याचे ते इवलेशे पाऊल.
साऱ्याच चिंतांना जणू पूर्णविरामाची चाहूल.

बाईच्या आरामाचा फक्त एकच सण,
बाईचं आईपण म्हणजेच बाईचं बाईपण.

असह्य यातना हसत सहन करते,
म्हणूनच तेव्हा ती बाईची आई बनते.

-


11 NOV 2018 AT 7:33

कविता

कविता म्हणजे अनुभव 
एखादी सुखद अविस्मरणीय आठवण किंवा एक 'जखम' II1II 

कविता म्हणजे व्यथा 
एखादा अभिमान आणि गर्व वाटणारा विजय किंवा एक 'अयशस्वी संघर्ष' II2II

कविता म्हणजे स्वप्न 
एखादी मनाला आकर्ष्णारी ओढ किंवा एक 'जगण्याची गरज' II3II 

कविता म्हणजे अवस्था 
गर्दीतला एकटेपणा किंवा एकटेपणातला कल्लोळ II4II

कविता म्हणजे आवड 
एखादा जोपासणारा छंद किंवा हावरी अपेक्श्या II5II

कविता म्हणजे ओढ
एक वेडावणार प्रेम किंवा नुसताच मोह II6II

कविता म्हणजे अबोल 
मला आवडलेली तू का एकटाच मी II7II

कविता म्हणजेच सर्वकाही अन्यथा काहीच नाही ...........

-


11 SEP 2018 AT 7:48

#100

ते अश्रु ...
जिवनाच्या सुरुवातीस आणि अंतास साक्षीदार आहेत
ते अश्रु....

मथळा वाचा

-


8 JUL 2021 AT 0:45

एक दीर्घ श्वास एक परिवर्तन

एक दीर्घ श्वास
प्रतिक्रियेस प्रतिसादामध्ये परिवर्तीत करु शकतो.
एक दीर्घ श्वास
संशियतास निष्पापामध्ये परिवर्तीत करू शकतो.
एक दीर्घ श्वास
अनर्थास समर्थनामध्ये परिवर्तीत करू शकतो.
एक दीर्घ श्वास
गैरसमजास समजामध्ये परिवर्तीत करू शकतो.
एक दीर्घ श्वास
त्रागास तहामध्ये परिवर्तीत करू शकतो.
एक दीर्घ श्वास
अबोलास सुरामध्ये परिवर्तीत करू शकतो.
एक दीर्घ श्वास
मोहास स्मितहास्यामध्ये परिवर्तीत करू शकतो.
एक दीर्घ श्वास
एकटेपणास स्वप्नामध्ये परिवर्तीत करू शकतो.
एक दीर्घ श्वास
तुझ्यामाझ्यास आपल्यामध्ये परिवर्तीत करू शकतो.

-


18 MAR 2021 AT 19:57

कोणतीही गोष्ट आनंदासाठी नाही तर आनंदाने करा.


~ डॉ. मैथिली सावंत


-


6 JUN 2020 AT 11:19

स्वस्थ आणि आनंदी
राहण्याचे
८० / २०
सूत्र

मथळा वाचा

-


18 MAY 2020 AT 22:19

LOCKDOWN एक अवसर

क्या करे? समय कठिन है ! चलिए कुछ सरल विकल्प ढूंढते है !

बरसोंसे ना कर सके जो बात खुदसे,
चलिए अब थोड़ी खुदसे ही पहचान कर लेते है !
भागदौड़ की जिंदगी में ठहराव का सन्मान कर लेते है !!१!!

क्या करे? समय कठिन है ! चलिए कुछ सरल विकल्प ढूंढते है !

दिल की वो सारी अधूरी तमन्नाये,
चलिए अब कुछ बयां करनेकी कोशिश करते है !
कागज कलम से सजाते या फिर पुराना कोई गीत गुनगुनाते है !!२!!

क्या करे? समय कठिन है ! चलिए कुछ सरल विकल्प ढूंढते है !

बचपन की वो भूली बिसरी यादें,
चलिए अब कुछ पल ताजा कर लेते है !
दोस्तों और रिश्तेदारोंको इसी बहाने याद कर लेते है !!३!!

क्या करे? समय कठिन है ! चलिए कुछ सरल विकल्प ढूंढते है !

अजीबसी उलझन में उलझे है सब,
चलिए सबकी खुशहाली की आराधना कर लेते है !
मिले सारे सबक सुलझनेके अब तो समझधारिसे अपना लेते है !!४!!  

क्या करे? समय कठिन है ! चलिए कुछ सरल विकल्प ढूंढते है !
आजतक किये अनगिनत संकल्प का Lockdown एक अवसर बनाते है !

-


17 MAY 2020 AT 18:44

माझी ओळख

मथळा वाचा

-


4 MAY 2020 AT 7:06

Happy Marriage Anniversary Dear

बघता बघता लग्नाला आठ वर्षे कधी झाली कळलंच नाही.

पहिल्या दोन वर्ष्यात खूपच घुसमट झाली होती.
दोन वर्ष्यात सगळ्या भावना थैमान घालून गेल्या. प्रेम, ओढ, काळजी, अस्वस्थता, अनामिक बैचेनी साराच गोंधळ होता.
नंतर मात्र तू सारं सांभाळून घेतलंस अगदी नेहमीसारखं.
आता कुठं सवय झाली होती, आता कुठं सगळं नीट चालत होतं पण त्यात कोरोना आला. जसा जसा कोरोना वाढतोय तुझी काळजी वाढतेय.

तू सुरक्षित आहेस ना?
स्वतःची काळजी घे, मला माहित आहे की तू स्वतःला कितीही निर्भीड दाखवलंस तरी तू छोट्या छोट्या गोष्टींना खूप घाबरतेस.

-


Fetching sachin dhere Quotes