दुसऱ्यांच्या परिस्तिथीची जाणीव आपण स्वतः त्या परिस्थितीतून गेल्याशिवाय होत नाही
आणि तोपर्यंत आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सोयींची किंमतही कळत नाही-
आई वडील आपल्यासाठी काय करतात याची जाणीव, उणीव भासायच्या आधी झालेली बरी असते...
::आई तुझे उपकार::-
।। रिकामा खिसा ।।
बघा,रिकामा खिसा काय काय शिकवतो?
दाखवतो दुनिया अन् चार जागी झुकवतो,
शांत होतं पोट,जेव्हा जळायला लागतं,
पैसे नसतात खिशात,जेव्हा कळायला लागतं,
कधी कधी परिस्थिति, अशी देखील असते,
भरलेला असतो खिसा, तेव्हा भूक देखील नसते,
रिकाम्या खिश्यामुळे तर आजवर,
बाबाला हताश पण पाहिलयं,
रिकाम्या खिश्यामुळेच तर,
बाबांचं आजवर हसायचं राहिलंय,
आज स्वतः थोडं कमवतो आहे,
गमवतोय थोडं,थोडं जमवतो आहे,
म्हणूनच तर जेव्हा जेव्हा,
रिकामा माझा खिसा आठवतो.
भरपूर तर नाही पण,
चार पैसे घरी जरूर पाठवतो.
अन् एकटयात बसून आजही,
जेव्हा बाबांचा रिकामा खिसा आठवतो,
भरपूर तर नाही पण,
चार पैसे घरी जरूर पाठवतो. (२)
बघा,रिकामा खिसा काय काय शिकवतो?
दाखवतो दुनिया अन् चार जागी झुकवतो. (२)-
मी फक्त नितळ मनाने तुझ्या समाेर उभी आहे
मग तुला माझ्या आठवणींची गरज काय आहे
फक्त आज माझ्याशी गाेड बाेलण्याची ठेव जाणीव
मी नसताना भासेल तुला त्याच आठवणींची उणीव-
जेव्हा समजदारी ने जबाबदारी हाती
घेतली...!
तेव्हा परतफेड कौतुकाने पाठ माझी..
थोपटली...!-
तूझ्या पासून लांब झाल्यावर,
एक खंत सतत छळत असते..!!
खूप काही सुरळीत झालं असत रे...
फक्त शाब्दिक निखाऱ्यांना आवरायला हवं होत..!!
-
जाणीव...
जाणीव झाली की तो नसल्याची,
उर भरून येतो।
जाणीव झाली की तो परत न येण्याची,
मन अजून खंबीर बनतं।।-
संथ वाहते शब्दसखीच्या लेखणीतील शाई
तीरावरल्या सुखदुःखांची जाणीव तिजला नाही-
श्वास गुदमरतो कधीकधी
एकटेपणाचा ताण घेवून l
अश्रू लपवून हसावं लागतं
परिस्थितीचे भान ठेवून ll
Sanket-
मन लावून वाच
माझी प्रत्येक चारोळी l
मिटून जाईल बघ
तुझ्या माझ्यातील दूरी ll
शब्दांत गुंफलेत भाव
जे होते अंतरी l
दुसऱ्यासही मन असतं
हे जाण कधीतरी ll
© Sanket
-